Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 2:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 ती म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे, आम्हांला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाश्यांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला माहीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणि त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हांला दिला आहे. आम्हांला तुमची दहशत बसली आहे, आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला ठाऊक आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आणि त्यांना म्हणाली, “मला माहीत आहे की, हा देश याहवेहने तुम्हाला दिलेला आहे आणि तुमच्या भीतीमुळे आम्ही धास्तावून गेलो आहोत, म्हणून या देशात राहणारे सर्व लोक तुमच्या भीतीने थरथरत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 2:9
39 Iomraidhean Croise  

ते तेथून निघाले, त्यांच्या सभोवतालच्या नगरावर देवाने भीती उत्पन्न केली, म्हणून त्यांनी याकोबाच्या मुलांचा पाठलाग केला नाही.


मग तर सिंहासारख्या शूरलोकांचेही धैर्य खचेल कारण तुमचे वडील पराक्रमी आहेत आणि त्यांच्या बाजूची माणसे शूर आहेत हे सर्वच इस्राएल लोकांस ठाऊक आहे.


नामान व त्याच्याबरोबरचे लोक देवाच्या मनुष्याकडे परत जाऊन त्याच्यासमोर उभे राहिले. तो म्हणाला, “पहा, सर्व पृथ्वीवर इस्राएलाबाहेर देव नाही हे आता मला कळाले आहे. माझ्याकडून कृपया, ही भेट घ्यावी.”


परमेश्वराच्या करणीने अरामी लोकांस आपल्यावर घोडे, रथ, विशाल सेना चालून येत आहे असा भास झाला तेव्हा ते आपापसात म्हणाले, “इस्राएलाच्या राजाने हित्ती आणि मिसरी राजांना द्रव्य देऊन आपल्यावर चाल करण्यास पाठवलेले दिसते.”


हे आमच्या सर्व शत्रूंनी व आमच्या भोवतींच्या सर्व राष्ट्रांनी पाहिले तेव्हा त्यांना भीती व लाज वाटली. कारण आमच्या देवाच्या मदतीने हे काम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.


ज्या प्रांतात आणि ज्या नगरात राजाची आज्ञा पोहोचली तिथे यहूद्यांमध्ये आनंद झाला आणि त्यांनी भोजनसमारंभ करून शुभदिन म्हणून पाळला. त्या देशाचे बरेच लोकही यहूदी झाले. कारण त्यांना यहूद्यांची भीती वाटू लागली.


माझा तारण करणारा जिवंत आहे याची मला खात्री आहे. आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील.


दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील; तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल; दुष्टाची इच्छा नाश होईल.


स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण त्यांने मानवजातीला पृथ्वी दिली आहे.


परमेश्वर सर्व देवांहून श्रेष्ठ आहे हे आता मला कळले. इस्राएल लोकांपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानत असलेल्या मिसरी लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.”


ज्या ज्या लोकांच्या विरूद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करीन. आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुला पाठ दाखवयास लावीन.


पापी शंभर दुष्कृत्य करेल आणि तरीही तो भरपूर आयुष्य जगला. असे असले तरी मला माहित आहे जे देवाचा सन्मान करतात, जे त्याच्यासमक्ष त्यास मान देतात हे अधिक चांगले आहे.


मिसराविषयी घोषणा. पाहा, परमेश्वर, वेगवान मेघावर स्वार होऊन मिसराकडे येत आहे; मिसराच्या मूर्ती त्याच्यापुढे थरथरतील आणि मिसऱ्यांचे हृदय आतल्या आत वितळेल.


मिसर देशात हे वर्तमान कळेल तेव्हा तेथे सोर निवासिया साठी मोठा शोक केला जाईल.


मी आपल्या महासामर्थ्याने आणि आपले भूज उभारून पृथ्वी निर्माण केली. मी पृथ्वी व त्यावरील प्राणीसुद्धा निर्माण केले आणि माझ्या दृष्टीने जो कोणी योग्य आहे त्यास मी देतो.


निनवे रिकामी आणि ओसाड झाली आहे. तिच्या हृदयाचे पाणी झाले आहे, पाय लटपटत आहेत, आणि प्रत्येकजण यातनेत आहे; त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडले आहेत.


मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमाच्या राजाकडे काही लोकांस एक निरोप देऊन पाठवले. तो निरोप होता, तुझे भाऊ, इस्राएलचे लोक तुला म्हणतात, आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच.


अहरोन आता आपल्या पूर्वजांस जाऊन मिळेल. मी इस्राएल लोकांस ज्या प्रदेशात नेण्याचे वचन दिले होते त्यामध्ये त्याचा प्रवेश होणार नाही. कारण तुम्ही मी मरीबाच्या पाण्याजवळ दिलेल्या आज्ञांचे उल्लघन करून बंड केले.


मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’


कोणीही तुमचा सामना करु शकणार नाही. परमेश्वर देवाने तुम्हास सांगितल्याप्रमाणे, तुम्ही जेथे जेथे जाल तेथे लोकांस तुमची दहशत वाटेल.


तुमच्याविषयी या सर्व आकाशाखालच्या लोकांच्या मनात आज अशी भीती व दहशत निर्माण करीन की, तुमचे वर्तमान ऐकताच ते थरथर कापतील व भयभीत होतील.”


परमेश्वराच्या नावाने तुम्ही ओळखले जाता हे पाहिल्यावर इतर राष्ट्रांतील लोकांस तुमचा धाक वाटेल.


परात्पर देवाने लोकांची विभागणी राष्ट्रा राष्ट्रांमध्ये केली. प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र भूभाग दिला. देवाने इस्राएल लोंकाच्या संख्येप्रमाणे राष्ट्राच्या सीमा आखल्या.


विश्वासाने राहाब वेश्या ही अवज्ञा करणार्‍या इतरांबरोबर नाश पावली नाही; कारण तिने शांतीने हेरांचे स्वागत केले होते.


हे ऐकताच आमचे अवसान गळून गेले आणि कोणामध्येही धैर्य राहिले नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.


ते यहोशवाला म्हणाले, “खरोखर हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती दिला आहे, आपल्या भीतीमुळे या देशाचे सर्व रहिवाशी गळून गेल्यासारखे झाले आहेत.”


इकडे ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती त्यांच्याकडे धाब्यावर गेली,


इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले हे यार्देनेपलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्रकिनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले आणि ते गलितगात्र झाले.


परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे कसलेले योद्धे मी तुझ्या हाती दिले आहेत.


आणि यार्देनेच्या पलीकडील अमोरी लोकांचे दोन राजे, हेशबोनाचा राजा सीहोन आणि अष्टारोथातला बाशानाचा राजा ओग, यांना जे काय केले तेही आम्ही ऐकले आहे.


त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “हा सर्व देश तुम्हाला द्यावा आणि तुमच्यासमोर देशांतील सर्व रहिवाश्यांचा नाश करावा असे तुझा देव परमेश्वर याने आपला सेवक मोशे याला आज्ञापिले होते, हे तुझ्या दासांना पक्के कळले होते; तुमच्यामुळे आम्हांला आमच्या जीवाची फार भीती वाटली म्हणून आम्ही हे काम केले.


त्यांनी त्यास म्हटले, “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून आम्ही तुझे दास फार दूर देशाहून आलो आहोत. कारण त्याने मिसरात जी प्रत्येक गोष्ट केली त्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे;


तेव्हा त्याच्या सोबत्याने उत्तर दिले की, “इस्राएली मनुष्य योवाशाचा पुत्र गिदोन याची ही तलवार! तिच्याशिवाय हे दुसरे काही नाही; देवाने मिद्यान व सर्व तळ त्याच्या हाती दिला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan