Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 12:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 किन्नेरोथ समुद्रापर्यंत आराबावर, अराब समुद्राच्या पूर्वेकडे, बेथ-यशिमोथापर्यंत आणि दक्षिणेकडे, पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंतसुद्धा सीहोन राज्य करत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आणि पूर्वेस किन्नेरोथ सरोवरापासून बेथ-यशिमोथाच्या वाटेवरल्या अराबापर्यंत म्हणजे पूर्वेकडील अराबाच्या समुद्रापर्यंत किंवा क्षार समुद्रापर्यंत आणि दक्षिणेस पिसगाच्या उतरणीपर्यंत त्याची सत्ता होती;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 अराबाच्या पूर्वेकडील भागावर सुद्धा त्याने राज्य केले, तसेच किन्नेरेथ समुद्रापासून अराबाचा समुद्र (म्हणजे मृत समुद्र), बेथ-यशिमोथपर्यंत आणि दक्षिणेकडे पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंत राज्य केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 12:3
15 Iomraidhean Croise  

नंतर हे पाच राजे सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमले. या खोऱ्याला क्षार समुद्र असेही म्हणतात.


त्याने त्या नगरांचा नाश केला, तसेच त्या सगळ्या खोऱ्याचा आणि त्या नगरात राहणाऱ्या सगळ्यांचा, आणि जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचा नाश केला.


राजा बेन-हदाद याने आसाशी करार केला आणि इयोन, दान, आबेल-बेथ-माका, गालिल सरोवरालगतची गावे, किन्नेरोथ आणि नफतालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य इस्राएलावर पाठवले.


यास्तव पाहा! मी मवाबाचा उतार उघडा करीन, त्याच्या सीमेवरील बेथ-यशिमोथ, बाल-मौन, किर्याथाईम ही वैभवी नगरे सुरुवात होतात,


लोक बामोथाहून मवाबाच्या खोऱ्यात गेले. या जागी पिसगा पर्वताच्या उंच माथा वाळवंटाकडे जातो. पिसगा पर्वताच्या उंच माथ्यावरुन वाळवंट दिसते.


शफामपासून ती अईनाच्या पूर्वेकडे रिब्लाला जाईल. ती सीमा उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्याच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल.


मग असे झाले की, तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा असता लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी येशूभोवती गर्दी करू लागले,


या गोष्टी झाल्यानंतर येशू गालीलच्या सरोवराच्या दुसर्‍या बाजूस गेला ज्याला तिबिर्य सरोवरसुद्धा म्हणतात.


तसेच किन्नेरेथापासुन अरबाचा समुद्र म्हणजेच क्षार समुद्र ईथपर्यंतचा पिसगाची उतरण व त्याच्या तळाशी असलेला अराबा व यार्देनेच्या पुर्वेकडील प्रदेश मी त्यांना दिला.


यार्देन नदीच्या पूर्वेकडील संपूर्ण खोरे, दक्षिणेला अराबा (मृत) समुद्रापर्यंतचा विस्तार, आणि पूर्वेला पिसगा पर्वताच्या पायथ्यापर्यंत एवढा हा प्रदेश त्यांनी काबीज केला होता.


आणि तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांत, किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात. तळवटीत आणि पश्चिमेकडील दोरात असलेल्या राजांना,


बेथ-पौर व पिसगाच्या उतरणी व बेथ-यशिमोथ;


आणि त्यांची दक्षिण सीमा क्षारसमुद्राच्या शेवटची खाडी, जिचे तोंड दक्षिणेस आहे, तेथून झाली.


आणि पूर्व सीमा क्षार समुद्रावरून यार्देनेच्या मुखापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या काठी यार्देनेचा मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे.


तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून राहिले व त्याची रास उभी झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र याकडे वाहत जात होते ते अगदी हटले; मग ते सर्व लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan