Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 1:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही, जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन, मी तुला सोडून जाणार नाही. व तुला टाकणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही; जसा मोशेबरोबर मी होतो तसा तुझ्याबरोबरही मी असेन; मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुमच्या आयुष्यातील सर्व दिवस तुम्हाला कोणीही विरोध करू शकणार नाही, कारण मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही असेन; मी तुला कधीही सोडणार नाही किंवा टाकणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 1:5
34 Iomraidhean Croise  

परमेश्वर देव योसेफाबरोबर होता. तो यशस्वी पुरुष होता. तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी राहत असे.


महाराज, जसा परमेश्वर आपल्याबरोबर होता. तोच परमेश्वर तसाच शलमोनाच्याही बरोबर राहील, आणि राजा शलमोनच्या राज्याची भरभराट करो आणि माझे स्वामी, दावीद आपल्यापेक्षा त्याचे राजासन महान करो.”


माझ्या आज्ञांचे पालन करत तू योग्य मार्गाने आयुष्य घालवलेस तर मी हे तुला देईन. दाविदाप्रमाणे माझी सर्व आज्ञा आणि नियम पाळलेस तर माझी तुला साथ असेल. दाविदा प्रमाणेच तुझ्याही घराण्याला मी राजघराणे करीन. इस्राएल तुला देईन.


मी इस्राएल लोकांमध्ये राहील आणि त्यांना सोडून मी जाणार नाही.”


आपल्या पूर्वजांना आपला देव परमेश्वर याने जशी साथ दिली तशीच तो पुढे आपल्यालाही देवो. त्याने आम्हास कधी सोडू नये व कधी त्यागू नये.


दावीद शलमोनाला पुढे म्हणाला “बलवान हो आणि धैर्य धर. काम कर. कारण परमेश्वर देव म्हणजे माझा देव तुझ्यासोबत आहे, तेव्हा घाबरु नको. परमेश्वराच्या घराचे सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला सोडणार नाही व टाकणार नाही.


सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे.


देवाने उत्तर दिले, “खचीत, मी तुझ्याबरोबर असेन, मी तुला पाठवत आहे याची खूण हीच असेल; तू इस्राएली लोकांस मिसरमधून बाहेर आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची उपासना कराल.”


मी आंधळ्यांना माहीत नसलेल्या मार्गाने आणीन, त्यांना माहीत नसलेल्या वाटेने मी त्यांना नेईन, मी त्यांच्यापुढे अंधाराचा प्रकाश करीन, वाकडी ठिकाणे सरळ करीन. या गोष्टी मी करीन आणि मी त्यांना सोडणार नाही.


त्यांना तू घाबरु नकोस, कारण तुला सोडवायला मी तुझ्या सोबत आहे. असे परमेश्वर म्हणतो.”


पण उत्तरेचा राजा मनात येईल तसे दक्षिणेच्या राजाशी करील त्यास कोणी थांबवू शकणार नाही, त्या सुंदर भूमीवर तो हाती नाश घेऊन उभा राहील.


आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”


मग या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे, तर मग आपल्या विरुद्ध कोण?


पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.


तुम्ही शत्रूवर चाल करून जाल तेव्हा त्यांचे घोडे, रथ आणि तुमच्यापेक्षा मोठे सैन्य पाहून घाबरुन जाऊ नका. कारण ज्याने तुम्हास मिसरमधून बाहेर काढले तो परमेश्वर देव तुमच्याबरोबर आहे.


कारण तुम्हास देव परमेश्वर ह्याची साथ आहे. शत्रू विरूद्ध लढाई करायला तसेच विजय मिळवायला तो तुम्हास मदत करणारा आहे.”


मग नूनचा मुलगा यहोशवा याला परमेश्वर म्हणाला, “हिंम्मत धर, खंबीर राहा. मी वचनपूर्वक देऊ केलेल्या प्रदेशात तू या इस्राएलांना घेऊन जाशील. मी तुझ्याबरोबर राहीन.”


आपला देव परमेश्वर दयाळू आहे. तो तुम्हास अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही.


परमेश्वराच्या मदतीने तुम्ही त्यांच्या राजांचा पराभव कराल, त्यांना ठार कराल आणि जगाच्या आठवणीतूनही ते पुसले जातील. कोणीही तुम्हास अडवू शकणार नाही. तुम्ही सर्वांचा विध्वंस कराल!


प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीयांनी ती ऐकावी आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले.


आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यामध्येच समाधान माना कारण देवाने असे म्हणले आहे, “मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही”


जसे आम्ही सर्व बाबतींत मोशेचे सांगणे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू, मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो.


मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”


परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नको; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यांच्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.”


याप्रकारे परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांजवळ जशी शपथ वाहिली होती, तसा त्याप्रमाणेच त्यास चहूंकडून विसावा दिला, त्याच्या सर्व शत्रूंतला कोणी त्यांच्यापुढे टिकला नाही; परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले.


परमेश्वर देव यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलाच्या नजरेसमोर तुझी थोरवी वाढविण्यास सुरुवात करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना समजून येईल.


याप्रमाणे परमेश्वर यहोशवाबरोबर राहिला, आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली.


परमेश्वर जेव्हा त्यांच्यासाठी न्यायाधीश उभे करी तेव्हा त्या न्यायाधीशाबरोबर परमेश्वर असे आणि त्या न्यायाधीशाच्या सर्व दिवसात तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून बचावीत असे; कारण त्यांच्यावर जुलूम करणारे व त्यांना गांजणारे यांच्यामुळे ते कण्हत असत; म्हणून देवाला त्यांची दया येई.


परमेश्वर त्यास बोलला, “खरोखर मी तुझ्याबरोबर राहीन, जसे एका मनुष्यास मारावे तसे तू एकजात सर्व मिद्यान्यांना ठार करशील.”


आता, जेव्हा ही सर्व चिन्हे तुला प्राप्त होतील, तेव्हा असे होवो की, तुला प्रसंग मिळेल तसे तू कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan