Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यहोशवा 1:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मरणानंतर असे झाले की, नूनाचा पुत्र यहोशवा, मोशेचा मुख्य मदतनीस याच्याशी परमेश्वर बोलला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला परमेश्वराने सांगितले की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेहचा सेवक मोशेच्या मृत्यूनंतर, मोशेचा मदतनीस, नूनाचा पुत्र यहोशुआला याहवेह म्हणाले:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यहोशवा 1:1
29 Iomraidhean Croise  

निमशीचा पुत्र येहू याला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक कर. आणि आबेल-महोला इथला शाफाटाचा पुत्र अलीशा याला पुढे तुझी जागा घेणारा संदेष्टा म्हणून अभिषेक कर.


परंतू यहोशाफाट म्हणाला, “ज्याच्याकडून आपण परमेश्वराचा सल्ला घ्यावा असा येथे परमेश्वराचा एखादा संदेष्टा नाही काय?” तेव्हा इस्राएलाच्या राजाच्या एका सेवकाने उत्तर दिले, “शाफाटाचा मुलगा अलीशा इथेच आहे, जो एलीयाच्या हातावर पाणी घालत असे.”


बंदिवासातून परत आलेल्या सर्वांनी मांडव उभारले व त्यामध्ये ते राहिले. नूनचा पुत्र येशूवा याच्या काळापासून ते त्या काळापर्यंत इस्राएलींनी हा मंडपाचा सण साजरा केला नव्हता. सर्वांना अतिशय आनंद झाला होता.


तेव्हा मोशे व त्याचा मदतनीस यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर चढून गेला.


तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा मोशेला म्हणाला, मोशे, माझे स्वामी तुम्ही त्यांना बंदी घाला. यहोशवा तरुण असल्यापासून मोशेचा मदतनीस होता.


माझा सेवक मोशे तसा नाही.” तो माझ्या सर्व घराण्यात विश्वासू आहे.


मोशेने देश हेरावयास पाठवलेल्या लोकांची ही नांवे होती. (मोशेने नूनाचा मुलगा होशा ह्याचे नांव यहोशवा असे ठेवले.)


एफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा.


एखाद्यावर थोडासा विश्वास टाकणे शक्य असेल तर त्याच्यावर जास्त विश्वास टाकणे शक्य आहे व जो कोणी थोड्या गोष्टींविषयी अन्यायी आहे तो जास्त गोष्टींविषयी अन्यायी राहील.


जी राष्ट्रे देवाने त्यांच्यासमोरून घालवली, त्यांचा देश आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशवाबरोबर त्या देशात आणिला. आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेवला.


प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून;


पण तुझ्या सेवेस हजर राहणारा, नूनाचा मुलगा यहोशवा तेथे जाईल त्यास तू प्रोत्साहन दे, कारण तो इस्राएलांना देश वतन म्हणून मिळवून देईल.


मग नूनचा मुलगा यहोशवा याला परमेश्वर म्हणाला, “हिंम्मत धर, खंबीर राहा. मी वचनपूर्वक देऊ केलेल्या प्रदेशात तू या इस्राएलांना घेऊन जाशील. मी तुझ्याबरोबर राहीन.”


तुमचा देव परमेश्वर हा तुम्हास साथ देईल. तुमच्यासाठी तो इतर राष्ट्रांना पराभूत करील. त्यांच्याकडून तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घ्याल. पण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे यहोशवा तुमचे नेतृत्व करील.


देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांस आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, तो असाः


मोशेने करून दाखवले तसे चमत्कार व भयकारक गोष्टी दुसऱ्या कोणा संदेष्ट्याने करून दाखवल्या नाहीत. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याची ही कृत्ये पाहिली.


मग परमेश्वराचा सेवक मोशे त्या मवाबाच्या प्रदेशात मरण पावला. असे घडणार हे परमेश्वराने त्यास सांगितले होतेच.


मोशेने यहोशवावर आपले हात ठेवून त्यास नवा पुढारी म्हणून नेमले होते. त्यामुळे नूनाचा पुत्र यहोशवा याला ज्ञानाचा आत्मा प्राप्त झाला होता. म्हणून इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत वागू लागले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी आचरण ठेवले.


देवाच्या निवडलेल्यांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी नेमलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल, ह्याच्याकडूनः


याकोब, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याजकडून, जगभर पांगलेल्या, विश्वास ठेवणाऱ्या बारा यहूदी वंशांना नमस्कार.


परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना विसावा देईल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना दिलेल्या देशाचा ते ही ताबा घेतील, मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनेच्या पूर्वेस, उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे, त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्याचा ताबा तुम्ही घ्यावा.”


“माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता ऊठ, तू आणि हे सर्व लोक असे तुम्ही यार्देन, ओलांडून जो देश मी इस्राएल लोकांस, देत आहे त्यामध्ये जा.


परमेश्वराचा सेवक मोशे, आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पराभव केला, आणि परमेश्वराचा सेवक मोशे याने ती भूमी रऊबेनी, गादी, आणि मनश्शेचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिली.


आणि जो जिवंत तो मी आहे; मी मरण पावलो होतो, पण तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे! आणि माझ्याजवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan