Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 9:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 त्यांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत. त्या अविश्वासू गोष्टी बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो. पण गुप्तपणे ते शेजाऱ्यावर टपून असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्यांची जीभ प्राणहारक बाण आहे; ते असत्य बोलतात; ते तोंडाने शेजार्‍याशी सलोख्याचे भाषण करतात, पण अंतर्यामी त्याच्यावर टपून असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्यांच्या जिभा विषारी बाणांप्रमाणे आहेत; ते असत्य वचने बोलतात. त्यांच्या मुखाने ते त्यांच्या शेजाऱ्यांशी सलोख्याने बोलतात, परंतु मनात ते त्यांना पाशात अडकविण्याची योजना करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 9:8
21 Iomraidhean Croise  

हेब्रोन येथे त्यास आणल्यावर यवाबाने त्यास गुप्त मसलत करण्यासाठी म्हणून वेशीच्या आत घेतले आणि अबनेरच्या पोटावर वार केला. अबनेर गतप्राण झाला. यवाबाचा भाऊ असाएल याला अबनेराने मारले होते त्याचा यवाबाने सूड उगवला.


प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो, प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो.


परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको.


हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार?


जे अन्याय करतात त्या दुष्टांबरोबर मला फरफटू नकोस. जे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत शांतीने बोलतात, परंतु त्यांच्या हृदयात मात्र वाईट असते.


कारण ते शांतीने बोलत नाही, परंतु ते देशातील शांततापूर्ण असणाऱ्यांविरूद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात.


त्यांचे तोंड लोण्यासारखे आहे, परंतू त्याचे हृदय शत्रुत्व करणारेच आहे. त्यांचे शब्द तेलापेक्षा बुळ्बुळीतआहेत, तरी ते बाहेर काढलेल्या तलवारी सारखे आहे.


माझा जीव सिंहाच्यामध्ये पडला आहे; ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, आणि ज्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे अशा लोकांमध्ये मला जबरदस्तीने रहावे लागत आहे.


हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर; कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे.


त्यांचीच जीभ त्यांच्याविरुद्ध होऊन ते अडखळविले जातील; जे सर्व त्यांना पाहतील ते आपले डोके डोलवतील.


जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देतो. जसे युद्घात सोटा, तलवार किंवा तीक्ष्ण बाण वापरतात यांसारखा तो आहे.


कारण माझ्या लोकात काही दुष्ट मनुष्य आढळतात. दबा धरणाऱ्या फासेपारध्यांप्रमाणे ते एखद्यावर नजर ठेवतात. ते जाळे पसरतात आणि लोकांस पकडतात.


तेव्हा मी त्यांना शिक्षा नाही करावी काय? असे परमेश्वर म्हणतो, असल्या राष्ट्रांविषयी माझ्या अंत: करणात सूड उमटू नये का?


कारण ते त्यांच्या जिभेने खोटे बाण सोडतात, पण ते या पृथ्वीवर विश्वासूपणात मोठे नाहीत. ते एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात. ते मला ओळखत नाही, परमेश्वर असे म्हणातो.


तुम्ही प्रत्येक आपल्या शेजाऱ्याविषयी सावध असा आणि कोणत्याही भावावर विश्वास ठेवू नका? कारण प्रत्येक भाऊ फसवणारा आहे आणि प्रत्येक शेजारी निंदा करणारा आहे.


प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याची थट्टा करतो आणि सत्य बोलत नाही. त्यांची जीभ खोटे बोलते. दुष्टाई करण्यासाठी ते आपणाला दमवतात.


त्या नगरीतील श्रीमंत जुलमाने भरलेले आहेत, त्यामध्ये राहणारे खोटे बोलले आहेत. त्यांची जीभ त्यांच्या मुखात कपटी बोलते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan