Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 9:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण ते त्यांच्या जिभेने खोटे बाण सोडतात, पण ते या पृथ्वीवर विश्वासूपणात मोठे नाहीत. ते एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात. ते मला ओळखत नाही, परमेश्वर असे म्हणातो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवतात; ते देशात प्रबळ झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे; ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात; मला ते ओळखत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “ते आपल्या जिभांना खोट्या शब्दांचा प्रहार करण्यासाठी धनुष्यांप्रमाणे तयार करतात; ते सत्याने या भूमीत विजय मिळवित नाहीत. ते एका पापापासून दुसऱ्या पापाकडे धाव घेतात ते माझ्या अस्तित्वाची दखल घेत नाहीत,” असे याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 9:3
43 Iomraidhean Croise  

तेव्हा त्याचा धनी घरी येईपर्यंत तिने त्याचे वस्त्र आपल्याजवळ ठेवले.


नीतिमानाच्या योजना यथान्याय असतात, पण दुष्टांचा सल्ला कपटाचा असतो.


बैल आपल्या धन्याला ओळखतो, आणि गाढव आपल्या मालकाचे खाण्याचे कुंड ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, इस्राएलास समजत नाही.”


सर्व लोक दडपशाहीमुळे धास्तावतील; प्रत्येकजण दुसऱ्यामुळे, प्रत्येक व्यक्ती त्याच्या शेजाऱ्यामुळे; लेकरे उद्दामपणे वयोवृद्धांचा विरोध करतील, अधोगती झालेले प्रतिष्ठीतांना आव्हान करतील.


तेव्हा मी म्हणालो, “मला हाय हाय आहे! कारण मी आता मरणार आहे. कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, कारण माझ्या डोळ्यांनी राजाला, परमेश्वरास, सेनाधीश परमेश्वरास पाहीले आहे.”


दुष्टता अग्नी सारखी जळत राहते, ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकीते; वनातील दाट झाडीतही ती पेट घेते, जिच्या धुराने लोक वर चढतात.


कारण तुझे भाऊबंद आणि तुझ्याच वडिलाच्या घराण्याने तुझ्याविरूद्ध विश्वासघात केला आहे आणि तुझ्याचविरूद्ध आवाज उठवीत आहे. जरी ते तुझ्याशी मित्रांसारखे बोलत असले, तरी तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस.”


तो गरीब व गरजूंच्या बाजूने न्याय करीत असे, मला ओळखणे हेच नव्हे काय? परमेश्वर असे म्हणतो.


नंतर परमेश्वरास ओळखा असे म्हणून पुढे प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याला किंवा प्रत्येक आपल्या भावाला शिकवणार नाही. कारण लहानापासून थोरापर्यंत मला ओळखतील.” असे परमेश्वर म्हणतो. “कारण मी त्यांच्या अन्यायांची त्यांना क्षमा करीन आणि मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही.”


कारण देव म्हणतो, “माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत. ती मूर्ख लोक आहेत आणि त्यांना काहीएक समजत नाही. दुष्कृत्ये करण्यात ते पटाईत आहेत पण चांगले करायचे त्यांना ज्ञान नाही.”


तेव्हा मी म्हणालो, “खचित ते गरिब आहेत. ते मूर्ख आहेत, कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग व आपल्या देवाचा नियम माहीत नाही.


म्हणून मी महत्वाच्या लोकांकडे जाऊन त्यांना देवाचा संराष्ट्र घोषीत करीन. कारण त्यांना कमीत कमी परमेश्वराचा आपल्या देवाचा नियम तर माहीत आहे.” पण त्यांनी तर एकमताने जू मोडले आहे आणि तो साखळदंड तोडला आहे जो त्यांना देवासोबत बांधून होता.


ते सर्व लोक दुराग्रही आहेत. जे दुसऱ्यांची निंदा करतात. ते सर्व कास्य व लोखंड आहेत, जे भ्रष्टपणे वागतात.


पण त्यांनी माझे ऐकले नाही, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपली मान ताठ केली. ते त्यांच्या पूर्वजांपेक्षा अधिक दुष्ट होते


प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याची थट्टा करतो आणि सत्य बोलत नाही. त्यांची जीभ खोटे बोलते. दुष्टाई करण्यासाठी ते आपणाला दमवतात.


त्यांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत. त्या अविश्वासू गोष्टी बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो. पण गुप्तपणे ते शेजाऱ्यावर टपून असतात.


आणि तो मला म्हणाला, ‘पुन्हा वळून पहा, दुसरी मोठी घृणास्पद बाब ते करीत आहे.”


हे दोन्ही राजे एकमेकांच्या विरोधात वाईट योजतील एकाच मेजावर बसून एकमेकांशी लबाड बोलतील पण त्यातून काही निघणार नाही, कारण शेवट हा नेमलेल्या वेळीच होणार.


तुम्ही चोरी करु नये. कोणाला फसवू नये. एकमेकाशी कपटाने बोलू नये.


देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”


सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.


तेव्हा या सर्व गोष्टी अशाच आहेत, असे म्हणून दुसऱ्या यहूद्यांनी ही दुजोरा दिला.


कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही कारण विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही.


आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.


त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे. ते आपल्या जीभांनी कपट योजतात, त्यांच्या ओठांखाली सर्पाचे विष असते.


नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करीत जाऊ नका कारण तुम्हापैकी काहीजण देवाविषयी अज्ञानी आहेत. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो.


आणि विरोध करणार्‍या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही, हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे व हे देवापासून आहे.


पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील.


प्रियांनो, मी आपल्या सामाईक तारणाविषयी तुम्हास लिहिण्याचा प्रयत्न करीत असता, मला हे आवश्यक वाटले की, जो विश्वास पवित्रजनांना सर्वकाळसाठी एकदा दिला, तो राखण्याविषयी मी तुम्हास लिहून उत्तेजन द्यावे.


त्यांनी कोकऱ्याच्या रक्ताद्वारे, आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे, त्याच्यावर विजय मिळवला आहे. आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही.


मेजवानीच्या सातही दिवसांपर्यंत ती त्याच्याकडे रडतच होती; आणि सातव्या दिवशी त्याने तिला त्याचे उत्तर सांगितले, कारण तिने त्याच्यावर खूप दबाव आणला होता. मग तिने त्या कोड्याचे उत्तर तिच्या लोकांच्या नातेवाईकांना सांगितले.


ती सर्व पिढी पूर्वजांना मिळाल्यानंतर जी दुसरी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कामाची ओळख नव्हती.


एलीची मुले नालायक माणसे होती; ते परमेश्वरास ओळखत नव्हते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan