Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 9:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मी डोंगरासाठी आकांत व विलाप करीन आणि मी कुरणांसाठी शोकगीत गाईन. कारण ती जाळून टकली आहे, तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही. त्यांना गुरांचा आवाजही ऐकू येत नाही. आकाशातील पक्षी आणि प्राणी दूर निघून गेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मी पर्वतांविषयी आक्रंदन करीन, विलाप करीन, रानातल्या कुरणांबद्दल शोक करीन; कारण ती जळून खाक झाली आहेत; त्यांवरून कोणी चालत नाहीत; तेथे कोणाला गुराढोरांचा शब्द ऐकू येत नाही; जनावरे पळाली आहेत, आकाशातील पक्षी निघून गेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मी डोंगराविषयी विलाप आणि आक्रोश करेन आणि तसेच रानातल्या निर्जन कुरणाबद्दल विलाप करेन. कारण सर्वकाही ओसाड पडलेले व प्रवास करण्यायोग्य नाहीत, गाईगुरांचे हंबरणे ऐकू येत नाही. पक्षीसुद्धा उडून गेले आहेत. आणि जनावरेही गेली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 9:10
30 Iomraidhean Croise  

पाहा, मी तुला नवीन व दुधारी, मळणीच्या घणाप्रमाणे करीत आहे; तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील; तू टेकडयांना भुसांप्रमाणे करशील.


जरी तू कचरा आणि उजाड अशी होती, आणि उध्वस्त झाली होती. तर आता राहाणाऱ्यांस फार संकुचित होशील आणि जे तुला गिळत असत ते फार दूर होतील.


पुष्कळ मेंढपाळांनी माझ्या द्राक्षमळ्याचा नाश केला आहे. त्यांनी माझा वाटा पायदळी तुडविला आहे, त्यांनी माझा आनंददायक भाग वैराण व वाळवंटात पालटवला आहे.


त्यांनी तिला उजाड केले आहे, मी तिच्या करिता शोक करत आहे. ती उजाड झाली आहे. सर्व भूमी उजाड करण्यात आली आहे. कारण कोणी हे मनावर घेत नाही.


किती काळ राष्ट्र शोक करणार? आणि साऱ्या देशाचे गवत सुकून जाईल? त्यामध्ये राहणाऱ्यांच्या दुष्टाई मुळे पशू व पक्षी मरुन गेले आहेत. कारण ते लोक म्हणाले “आमचे काय होईल हे देवाला माहीत नाही.”


उघड्या डोंगरावर उभी राहून, जंगली गाढवे कोल्ह्यांप्रमाणे धापा टाकतात, त्यांचे डोळे खोल गेले आहेत, कारण खाण्यालायक एकही झुडूप शिल्लक नाही.


तरुण सिंहांनी त्याच्याविरुध्द डरकाळ्या फोडल्या आहेत. त्यांनी मोठा आवाज केला आहे आणि त्यांनी त्याची भूमी भयानक अशी केली आहे. त्याच्या शहरांचा नाश झाला आहे, त्यामध्ये कोणी रहिवाशी नाही.


कारण ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्याने आम्हास मिसरहून आणले, तो परमेश्वर कोठे आहे? ज्याने आम्हांला रानांतून पार नेले, ओसाड आणि खडकाळ प्रदेशातून, काळोख व धोका असलेल्या निर्जल देशातून, जेथून कोणीही प्रवास करीत नाही अशा प्रदेशातून आम्हांला पार नेले. तो परमेश्वर कोठे आहे?”


कारण व्यभिचाऱ्यांनी राष्ट्र भरला आहे, यास्तव राष्ट्र शोक करीत आहे. रानातील कुरणे वाळून गेली आहे. संदेष्ट्यांचे मार्ग दुष्ट आहेत, ते त्यांची शक्ती चुकीच्या पद्धतीने वापरतात.


उत्तरेकडचे एक राष्ट्र तिच्याविरूद्ध उठले आहे, ते तिचा देश ओसाड करील. तिच्यात कोणीएक मनुष्य किंवा पशूही राहणार नाही. ते दूर पळून जातील


हे यरूशलेमे, तुझे केस कापून दूर फेकून दे. उजाड डोंगरमाथ्यावर जाऊन शोकगीत गा. कारण परमेश्वराने रागाच्या भरात या पिढीला नाकारले आणि सोडले आहे.


माझ्या दु:खण्याला काही अंत नाही आणि माझे अंत: करण अस्वस्थ आहे.


या सगळयाबद्दल मी आक्रोश करते; माझ्या डोळयांतून अश्रू पाण्याप्रमाणे वाहात आहेत. कारण माझे सांत्वन करणारा माझ्यापासून दूर आहे. माझी मुले खिन्न झाली आहेत, कारण शत्रूचा विजय झाला आहे.”


माझे डोळे आसवांनी जर्जर झाले आहेत. माझ्या आतड्यांना पीळ पडत आहे. माझे हृदय जमिनीवर टाकल्याप्रमाणे तळमळत आहे. कारण माझ्या लोकांचा नाश झाला आहे. मुले आणि तान्ही चौकांत मूर्छित पडत आहेत.


सियोनचे डोंगर ओसाड झाले आहेत. सियोनच्या डोंगरावर कोल्हे वावरतात.


जर मी देशात क्रुर हिंस्र पशू पाठविले आणि जमीन नापीक झाली क्रुर पशुमुळे कोणी मनुष्य जाणारे येणार नसल्यामुळे देश निर्जन होईल.


आता तू, मानवाच्या मुला, सोरेविषयी विलाप कर.


मनुष्याचे पाऊल त्यातून जाणार नाही. पशूचा पाय त्यामधून जाणार नाही आणि चाळीस वर्षे कोणीही तेथे राहणार नाही.


मग मी ती भूमी ओसाड व निर्जन करीन आणि त्याच्या सामर्थ्याचा गर्वाचा अंत होईल. इस्राएलचे पर्वत ओसाड होतील. तेथून कोणीही जाणारसुद्धा नाही.


जेथे तुम्ही राहता त्या शहराच्या उच्च स्थानांचा विध्वंस करेन. म्हणून तुमच्या वेद्या, मुर्त्या, उध्वस्त केल्या जातील. त्यामुळे ते मोडकळीस येतील आणि त्यांची सर्व कामे पुसून टाकली जातील.


म्हणून ही भूमी कोरडी पडत आहे, जो कोणी येथे राहतो तो नाश पावत आहे, रानपशू, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासेही नाहीसे होत आहेत.


याजकांनो, गोणताट घाला आणि शोक करा! वेदीची सेवा करणाऱ्यांनो, आक्रोश करा. माझ्या परमेश्वराच्या सेवकांनो, या, तुम्ही पूर्ण रात्र गोणताट घालून राहा. कारण तुमच्या देवाच्या मंदिरात यापुढे अन्नार्पणे व पेयार्पणे अडकवून ठेवलेली आहेत.


हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. कारण आग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत. आणि शेतातील सर्व झाडे ज्वालांनी भस्म केली आहेत.


इस्राएलाचे घराणे हो, हे वचन जे विलापासारखे आहे, असे तुमच्याकडे आणतो ते ऐका.


यास्तव सेनाधीश परमेश्वर देव, प्रभू असे म्हणतो, “सर्व चव्हाट्यावर रडणे असेल, आणि गल्लोगल्ली लोक हाय हाय करतील, आणि ते शेतकऱ्याला शोक करायला आणि विलाप करण्यात चतुर असलेल्यांना आक्रोश करायला बोलवून आणतील.


त्या दिवशी लोक तुमच्यावर गाणी रचतील, आणि भारी विलाप करून म्हणतील: ‘आम्हा इस्राएलवासीयांचा विनाश झाला आहे; परमेश्वराने माझ्या लोकांचा प्रांत पालटून टाकला आहे. त्याने तो माझ्यापासून कसा दूर केला? त्याने आमची शेते घेऊन आमच्या शत्रूंमध्ये त्यांची वाटणी केली.


ह्यास्तव, तुमच्यामुळे सियोन शेतासारखे नांगरले जाईल, यरूशलेम नासधुशीचा ढीग होईल, आणि मंदिराचा पर्वत जंगलातल्या टेकडीसारखा होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan