Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 8:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तर मग यरूशलेममधील लोक कायमचे अप्रामाणिकपणात का वळले आहेत? ते विश्वासघात करीत राहतात आणि पश्चाताप करण्यास नकार देतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग हे यरुशलेमकर एकसारखे का बहकत राहिले आहेत? ते कपटाला चिकटून राहिले आहेत, ते वळण्यास कबूल होत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मग हे लोक परत का वळले नाही? यरुशलेम नेहमी बंडखोरी का करते? ते कपटाला चिकटून राहिले आहेत; ते वळण्यास कबूल होत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 8:5
26 Iomraidhean Croise  

शिस्त घट्ट धरून ठेव, ती सोडून देऊ नको; ते सांभाळून ठेव, कारण ते तुझे जीवन आहे.


परंतु जर तुम्ही नाकाराल व बंड कराल, तर तलवार तुमचा नाश करील,” कारण परमेश्वर आपल्या मुखाने हे बोलला आहे.


ते पाहणाऱ्यांना म्हणतात, “तुम्ही पाहू नका.” आणि भविष्यवाद्याला म्हणता, “आमच्या जवळ सरळ भविष्य सांगू नको; आम्हास बऱ्या वाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांग, कपटी भविष्ये सांग.


हे जसे तो जर राख खातो; त्याचे फसवलेले हृदय चुकीच्या मार्गाने नेते. तो आपल्या जीवाला वाचवू शकत नाही किंवा तो म्हणत नाही, “माझ्या हातात धरलेल्या या गोष्टी खोटे देव आहेत.” असे तो म्हणणार नाही.


जरी आमची दुष्टाई आमच्याविरूद्ध साक्ष देते, पण तरी, परमेश्वरा, तुझ्या नामास्तव कार्य कर. कारण आमची अविश्वासू कृत्ये वाढली आहेत. आम्ही तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.


कुमारी आपले दागिने आणि वधू आपला पोषाख विसरेल काय? पण माझे लोक मला असंख्य वेळा विसरले आहेत.


“तो नेहमीच रागावणार काय? तो राग सतत बाळगेल काय?” पाहा, “तू असे म्हणतेस, पण तू दुष्कृत्ये केली आहेस आणि ते सतत करीत आहेस.”


पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्यांची घरे कपटांनी भरलेली आहेत. म्हणून ते श्रीमंत व मोठे झाले आहेत.


हे परमेश्वरा, तुझे डोळे सत्याकडे पाहत नाहीत काय? तू लोकांस मारलेस पण त्यांना वेदना झाल्या नाहीत. तू त्यांना पूर्णपणे पराभूत केले, तरी त्यांनी शिक्षा घेण्याचे नकारले. त्यांनी आपले मुख खडकांपेक्षा कठीण केले आहे, कारण त्यांनी पश्चातप करण्याचे नकारले आहे.


म्हणून गर्द झाडीतून सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील. चित्ता त्यांच्या शहराविरूद्ध येईल. जो कोणी शहरातून बाहेर जाईल तो फाडण्यात येईल. कारण त्यांची पापे बहूतपट झालीत, आणि त्यांचे अविश्वासू कृत्ये फार झाली आहेत.


रणशिंगाचा आवाज ऐकायला तुमच्यावर मी रखवालदार नियूक्त केले. पण ते म्हणाले, आम्ही ऐकणार नाही.


हे पृथ्वी, ऐक! पाहा, या लोकांवर मी अनर्थ आणणार आहे, म्हणजे त्यांच्याच विचारांचे फळ त्यांच्यावर आणीन. कारण त्यांनी माझ्या वचनांकडे दुर्लक्ष केलेच, पण ह्याव्यतीरिक्त ते धिक्कारले आहे.


तू आपल्या कपटामध्ये राहतो, त्यांच्या कपटामुळे ते मला ओळखायला नाकारतात, असे परमेश्वर म्हणतो.


सर्व इस्राएलाने तुझी वाणी नाकारून तुझ्या नियमाशास्त्राविरोधात पाप केले आहे. देवाचा सेवक मोशे यांच्याद्वारे लिहिलेल्या शापाचा आणि शपथेचा वर्षाव आमच्यांवर झाला आहे, कारण त्याच्या विरोधात पाप केले.


ते मिसरात परत येणार काय? अश्शूर त्यावर राज्य करणार काय? कारण ते मजकडे परत येण्याचे नाकारतात?


माझ्या लोकांस मजपासून वळवण्याचा निश्चय केला आहे तरी ते त्यांना जो मी परमप्रधान आहे त्याकडे बोलवितात तरी त्यापैकी कोणीही मला गौरव देत नाही.


आता ते अधिकाधिक पाप करु लागले ते चांदीच्या ओतीव मूर्ती आपल्या कुशलतेने कारागीर बनवतो तसे बनवू लागले. लोक म्हणू लागले, “जे बलिदान करतात त्यांनी वासरांचे चुंबन घ्या”


कारण इस्राएल हट्टी कालवडी सारखा हट्टी वागला आहे. मग परमेश्वर त्यास कोकरे जसे कुरणात चरतात तसा गायरानात कसा आणणार?


पण त्या लोकांनी ऐकण्याचे नाकारले व मान ताठ केली, देवाची वाणी ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी आपले कान झाकून घेतले.


पण तुम्ही आपल्याला जीवन मिळावे म्हणून माझ्याकडे येऊ इच्छीत नाही.


सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते मजबूत धरा.


मोशे जो बोलतो आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्याचा अवमान करणारे इस्राएल लोक जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्या ख्रिस्तापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही.


मी येईपर्यंत जे तुमच्याकडे आहे त्यास बळकटपणे धरून राहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan