Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 8:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तर त्यांना सांग: परमेश्वर असे म्हणतो: कोणी पडल्यास पुन्हा उठणार नाहीत काय? कोणी चुकीच्या मार्गाने गेला तर फिरुन मागे येण्याचा प्रयत्न करणार नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 परमेश्वर म्हणतो, आणखी त्यांना सांग, कोणी पडला तर पुन्हा उठत नाही काय? कोणी बहकला तर पुन्हा वळत नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: “ ‘जेव्हा लोक पडतात, तेव्हा ते पुन्हा उठत नाहीत काय? जेव्हा कोणी रस्ता चुकला असेल, तर तो मागे फिरत नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 8:4
15 Iomraidhean Croise  

असे कधी झाल्यास, एकाने जरी आपल्या पापाची कबुली दिली किंवा सर्व इस्राएली लोकांनी आपल्या जीवाला होणारा त्रास ओळखून मंदिराकडे हात पसरुन क्षमा याचना करतील.


कारण जर कोणी मनुष्य चांगले करतो तो सात वेळा पडला तरी, तो पुन्हा उठतो, पण दुर्जनांचा संकटात विध्वंस होईल.


मी तुझी बंडखोरीची कृत्ये, दाट ढगाप्रमाणे आणि तुझे पाप आभाळाप्रमाणे, पुसून टाकली आहेत; माझ्याकडे माघारी ये, कारण मी तुला उद्धारीले आहे.”


दुष्ट आपला मार्ग व पापी मनुष्य आपले विचार सोडून देवो. तो परमेश्वराकडे माघारी येवो आणि तो त्यांच्यावर दया करील व तो आमच्या देवाकडे येवो, तो त्यांना विपुलपणे क्षमा करील.


आणि मी यरूशलेमामधल्या संदेष्ट्यांना भयंकर गोष्टी करताना पाहिले आहे. त्यांनी व्यभिचार केला आणि दुष्टतेत चालले. ते दुष्टांचे हात मजबूत करतात, कोणीही आपल्या दुष्टाईपासून फिरले नाहीत. ते सर्व मला सदोमासारखे आणि तिच्यातले राहणारे गमोऱ्यासारखे झाले आहेत.”


ते म्हणतात, एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला सोडले, तर ती त्याच्यापासून निघून जाऊन इतर पुरुषाची झाली, तर तो पुन्हा तिच्यापाशी परत जाईल का? ती पूर्णपणे विटाळलेली नसेल काय? ती स्री ही भूमी आहे. तू वेश्येसारखी पुष्कळ सहयोगीं सोबत वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे? असे परमेश्वर म्हणतो.


“विश्वासहीन लोकांनो, परत या, मी तुमचा विश्वासघातकीपणा बरा करीन. पाहा! आम्ही तुझ्याकडे येण्याचे कारण म्हणजे तू आमचा देव परमेश्वर आहेस!”


कदाचित यहूदाचे लोक मी जे अरिष्ट त्यांच्यावर आणण्याचे योजले आहे, ते ऐकतील. कदाचित प्रत्येकजण आपल्या कुमार्गापासून वळेल, मग मी त्यांच्या अन्यायाची व पापांची क्षमा करीन.


परमेश्वर असे म्हणतो, “हे इस्राएल जर तू परत येशील, माझ्याकडे परत वळशील. तू आपले तिरस्करणीय गोष्टी माझ्यासमोर दूर करशील आणि जर तू भटकणार नाहीस,


“मी दुष्टतेच्या मृत्यूवर मोठा हर्ष केला आहे” हे परमेश्वर देव जाहीर करतो आणि जर आपला मार्ग त्याने बदलला नाही तर तो जगेल?


हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये, तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे.


“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आमचे तुकडे केले आहे, आता तोच आम्हास बरे करील, त्याने जखम केली, तोच आम्हास पट्टी बांधेल.


इस्राएलाचा गर्व त्यांच्या विरोधात साक्ष देतो, इतके असूनही ते आपला देव परमेश्वराकडे वळत नाहीत, हे करण्यापेक्षा ते त्यास शोधत नाही.


इस्राएलाची कुमारिका पडली आहे; ती पुन्हा कधीही उठणार नाही; तिला एकटीलाच सोडून दिले आहे, तिला उठवणारा कोणीही नाही.


माझ्या शत्रूंनो, मी पडल्यावर मला हसू नका, मी तेव्हा उठेन. जेव्हा मी अंधारात बसेन तेव्हा परमेश्वर माझ्यासाठी प्रकाश होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan