Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 8:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 माझ्या लोकांच्या कन्येच्या जखमेमुळे मी जखमी झालो आहे. तिच्या सोबत घडलेल्या भयानक गोष्टींमुळे मी शोकात आणि निराशेत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 माझ्या लोकांच्या कन्येच्या घायाने मी घायाळ झालो आहे, मी सुतकी आहे; महाभयाने मला घेरले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 माझे लोक चिरडले गेले, मी चिरडलो; मी शोकाकुल झालो, भीतीने मला दहशत भरली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 8:21
14 Iomraidhean Croise  

मी राजाला म्हणालो, “राजा चिरायु होवो! माझ्या पूर्वजांच्या जेथे कबरी आहेत ते नगर उद्ध्वस्त झाले आहे, नगराच्या वेशीसुध्दा आगीत भस्म झाल्या आहेत, तर माझा चेहरा उदास का होणार नाही?”


हे वचन त्यांना सांग: माझ्या डोळ्यांत अश्रू रात्रंदिवस वाहोत, ते थांबू नयेत. कारण माझ्या लोकांच्या कन्येचे पडणे खूप मोठे आहे, तिची जखम मोठी आणि ठीक न होणारी आहे.


“यहूदा शोक करो, तिची दारे पडून जावोत, ते देशासाठी विलाप करत आहेत, त्यांचे यरूशलेमेसाठी रडणे उंचावर गेले आहे.


मी तर तुझ्यामागे चालून मेंढपाळ होण्यापासून मागे हटलो नाही, तो भयंकर दिवस उजाडावा अशी माझी इच्छाही नव्हती. हे तू जाणतोस, जे माझ्या ओठातून निघाले ते तुझ्यासमोर आहे.


माझे हृदय! माझे हृदय! मी माझ्या हृदयात दु:खी आहे. माझ्याठायी माझे हृदय अनावर झाले आहे. माझ्याने शांत बसवत नाही, कारण हे माझ्या जीवा तू रणशिंग्याचा आवाज, लढाईची ओरड ऐकली आहे.


“सुगीचा हंगाम संपला, उन्हाळा सरला, पण आमचे तारण झाले नाही.”


जर माझे मस्तक पाण्याने भरलेले असते आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांच्या कन्येसाठी अहोरात्र रडलो असतो तर किती बरे झाले असते.


तो पूरूष मीच आहे, ज्याने परमेश्वराच्या क्रोधाच्या काठीकडून संकटे पाहिली.


त्यांच्यापुढे लोक व्यथित होतात आणि त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडतात.


निनवे रिकामी आणि ओसाड झाली आहे. तिच्या हृदयाचे पाणी झाले आहे, पाय लटपटत आहेत, आणि प्रत्येकजण यातनेत आहे; त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडले आहेत.


तो जेव्हा जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला आणि म्हणाला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan