Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 8:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली का? नाही त्यांना लाज वाटली नाही. म्हणून पडणाऱ्यांना शिक्षा होत असता ते पण त्यांच्याबरोबर पडतील, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्यांनी अमंगळ कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना बिलकूल लाज वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 त्यांना त्यांच्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटते का? नाही, त्यांना मुळीच लज्जा वाटत नाही; लाज वाटणे म्हणजे काय असते हे त्यांना माहीतच नाही. म्हणून ते पतन पावलेल्या लोकांमध्ये पतन पावतील; त्यांना शिक्षा मिळेल तेव्हा त्यांचे पतन होईल, असे याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 8:12
20 Iomraidhean Croise  

दुसऱ्या दिवशी थोरली धाकटीला म्हणाली, “मी काल रात्री माझ्या बापाबरोबर झोपले, तर आज रात्री पुन्हा आपण बापाला द्राक्षरस पाजू या, मग रात्री तू बापाबरोबर झोप. अशा रीतीने आपण बापाचा वंश चालवू.”


हे सामर्थ्यवान पुरुषा, तू वाईट गोष्टींचा अभिमान का बाळगतोस? देवाच्या कराराची विश्वसनियता प्रत्येक दिवशी येते.


पाहा, या मनुष्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, पण आपल्या विपुल संपत्तीवर भरवसा ठेवला, आणि आपल्या दुष्टपणात स्वतःला पक्के केले.


आणि जशी लोकांची तशी याजकांची, जशी सेवकाची तशी धन्याची, जशी दासीची तशी तिच्या धनिणीशी, जशी विकत घेणाऱ्याची तशी विकणाऱ्याची, जशी उसणे देणाऱ्याची तशी उसणे घेणाऱ्याची, जशी उधार घेणाऱ्याची तशी जो त्यास उधार देतो त्याची स्थिती होईल.


त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांच्याच विरूद्ध साक्ष देतात; आणि सदोमाप्रमाणे ते त्यांच्या पापाविषयीच्या गोष्टी सांगतात; ते त्या लपवीत नाहीत. त्यांचा नाश होवो! कारण त्यांनी स्वतःवर आपत्ती आणली आहे.


त्या निरुपयोगी आहेत, खोट्यांचे काम आहेत, त्यांच्या शिक्षेसमयी त्यांचा नाश होईल.


यास्तव परमेश्वर असे म्हणतो, मी ज्यांना पाठवले नाही, अशे जे भविष्यवादी माझ्या नावात भविष्य सांगतात आणि असे म्हणतात या देशावर तलवार व उपासमार येणार नाही. ते संदेष्टे तलवारीने आणि उपासमारीने मरतील.


यास्तव त्यांच्या मार्ग त्यांचा अंधारात निसरड्या मार्गा सारखा होईल. ते खाली ओढले जातील, ते त्यामध्ये पडतील. कारण त्यांच्या शिक्षेच्या वर्षी मी त्यांच्याविरुद्ध अरिष्ट पाठवीन, असे परमेश्वर म्हणतो.


म्हणून वसंत ऋतूतील पाऊस थांबवण्यात आला आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही. पण तरी तुझा चेहरा गर्विष्ठ आहे, जसा वारांगनेचा असतो तसा. तू तुझ्या कृत्यांबद्दल लाजत नाहीस.


ते या दिवसापर्यंत, अजून नम्र झालेले नाहीत. ते माझे जे नियमशास्त्र व माझे जे विधी मी तुम्हापुढे आणि तुमच्या पूर्वजांपुढे ठेवले, त्यांचा त्यांनी आदर केला नाही किंवा ते त्याप्रमाणे चालले नाहीत.”


त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे ते लाजले का? त्यांना काही लाज वाटली नाही आणि त्यांनी पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही. त्यांना कोणत्याही अपमानास्पद वागणूकीचा अनुभव घेतला नाही. यास्तव मी ज्यावेळी त्यांना शिक्षा करीन तेव्हा ते पडणाऱ्यांबरोबर पडतील. ते उध्वस्त केले जातील.” परमेश्वर असे म्हणतो.


यास्तव परमेश्वर असे म्हणतो: “मी या लोकांविरूद्ध अडखळणे ठेवीन. त्यावर वडील व मुले अडखळून पडतील. राहणारे आणि शेजारी हे नष्ट होतील.”


तिने आपल्या व्यभिचाराचा खेळ मांडला व आपली लाज उघडी केली, जसे माझे मन तिच्या बहिणीहून मन दूर झाले तसे तिच्या वरुन मन दूर झाले.


शासनाच्या दिवशी एफ्राईम नाश पावेल, इस्राएलाच्या वंशास मी खात्रीने होणारी गोष्ट कळवली आहे.


परमेश्वर तिच्यामध्ये न्यायी आहे, तो अन्याय करू शकत नाही! तो दररोज आपला न्याय उजेडात आणतो! तो प्रकाशात लपवला जाणार नाही, तरीही गुन्हेगारांना लाज वाटत नाही.


अनवधानाने त्यांच्या हातून काही दुष्कृत्ये घडायची मी वाट पाहत आहे. त्यांनी काही वावगे केले की त्यांचा संकटकाळ आलाच म्हणून समजा मी त्यांना शिक्षा करीन.


नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांचा निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan