Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 8:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर असे म्हणतो: त्यावेळी, ते यहूदातील राजांची प्रमुख नेत्यांची, याजकांची, संदेष्ट्यांची आणि यरूशलेममधील सर्व लोकांची हाडे कबरीतून बाहेर काढतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेश्वर म्हणतो, त्या काळात यहूदाच्या राजांच्या अस्थी, त्यांच्या सरदारांच्या अस्थी, याजकांच्या अस्थी, संदेष्ट्यांच्या अस्थी व यरुशलेमकरांच्या अस्थी त्यांच्या कबरांतून बाहेर काढतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “ ‘याहवेह असे म्हणतात, यहूदीयाच्या राजांची आणि अधिपतींची हाडे, याजकांची हाडे व संदेष्ट्यांची हाडे व यरुशलेमच्या लोकांची हाडे त्यांच्या कबरांतून बाहेर काढली जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 8:1
12 Iomraidhean Croise  

परमेश्वराने या संदेष्ट्याला वेदीविरुध्द बोलायची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे तो म्हणाला, “हे वेदी, परमेश्वराचे म्हणणे असे आहे दाविदाच्या कुळात योशीया नावाचा पुत्र जन्माला येईल. हे याजक सध्या उंचवट्यावरील ठिकाणी पूजा करत आहेत. पण हे वेदी, योशीया त्यांचेच देह तुला अर्पण करील. योशीया त्या याजकांचा वध करील. आता ते तुझ्यावर धूप जाळत आहेत खरे पण योशीया, मानवी अस्थी तुझ्यावर जाळील. मग तू निरुपयोगी ठरशील.”


योशीयाने डोंगरावर इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्यास काही कबरी दिसल्या. तेव्हा त्याने माणसे पाठवून त्यातील हाडे आणली. ती हाडे त्याने वेदीवर जाळली आणि ते स्थान अपवित्र केले. संदेष्ट्याने जो परमेश्वराचा संदेश घोषित केला होता त्याप्रमाणेच हे झाले. यराबाम वेदीजवळ उभा असताना संदेष्ट्याने हे सांगितले होते. पुन्हा पाहिले तेव्हा योशीयाला संदेष्ट्याची कबर दिसली.


शोमरोन मधील उच्चस्थानांच्या सर्व याजकांना योशीयाने ठार केले. त्या वेदीवरच त्याने त्यांना मारले. वेदीवर मनुष्यांची हाडे जाळली. अशाप्रकारे सर्व पूजास्थळांची मोडतोड करून मग तो यरूशलेमेला परतला.


शेणखतासारखा ईजबेलचा देह इज्रेलच्या भूमीवर पडेल. लोकांस तिचे प्रेत ओळखू येणार नाही.”


तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते; कारण तुझ्याविरूद्ध तळ देणाऱ्यांची देवाने हाडे विखुरली आहेत; असे लोक लज्जित झाले आहेत कारण देवाने त्यांना नाकारले आहे.


आणि ज्या लोकांस त्यांनी भवीष्य सांगितले, ते उपासमार व तलवार यामुळे यरूशलेमेच्या रस्त्यावर फेकले जातील. त्यांना व त्यांच्या स्त्रिया व मुलांना आणि मुलींना कोणी पुरणारा पण असणार नाही, कारण त्यांची दुष्टाई मी त्यांच्यावर ओतीन.


परमेश्वराचा हात माझ्यावर आला, परमेश्वराच्या आत्म्याकडून मला बाहेर उचलून नेले आणि खाली दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती हाडांनी भरलेली होती.


तुमच्या वेद्याचे खांब, तुमच्या सूर्यमूर्ती मी पाडून टाकीन, तुमचे वध पावलेले लोक तुमच्या मूर्त्यांपुढे पडतील असे परमेश्वर करीन.


इस्राएल लोकांचे प्रेत त्यांच्या मूर्त्यांपुढे मी टाकून देईन आणि त्यांच्या वेद्यांपुढे हाडांची पांगापांग करेन.


परमेश्वर असे म्हणतो, “मवाबाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी अदोमाच्या राजाची हाडे जाळून त्यांचा चुना केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan