Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 “परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर हे आहे. असे खोटे बोलणाऱ्या वाईट गोष्टींस स्वत:स सोपवून देऊ नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ‘हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर’ असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तुमची फसवणूक करणाऱ्या शब्दांवर विश्वास ठेऊन असे म्हणू नका, “हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे, हे याहवेहचे मंदिर आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:4
16 Iomraidhean Croise  

तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएलांना हुसकावून लावीन. इतर लोकात तुम्ही निंदेचा विषय होणार. हे मंदिर मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे. पण माझे आज्ञापालन केले नाहीतर ते मी नजरेआड करीन.


कारण ते स्वत:ला पवित्र नगराचे म्हणतात आणि इस्राएलाच्या देवावर विश्वास ठेवतात, ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर


कोणीही न्यायीपणाने दावा सांगत नाही, आणि कोणीही सत्यात आपली बाजू मांडत नाही. ते पोकळ शब्दांवर विश्वास ठेवतात आणि खोटे बोलतात, ते दुष्टाईची गर्भधारणा करून अन्यायाला जन्म देतात.


परमेश्वर असे म्हणतो, “आकाश माझे सिंहासन आणि पृथ्वी पाय ठेवण्याचे आसन आहे. मग तुम्ही माझ्यासाठी कोठे घर बांधाल? मला विश्रांतीची जागा कुठे आहे?”


नंतर यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्टा म्हणाला, “हनन्या! ऐक! परमेश्वराने तुला पाठविलेले नाही पण तू या लोकांस लबाडीवर विश्वास ठेवावयास लावले.


हे यासाठी होईल की, कारण त्यांनी इस्राएलामध्ये लज्जास्पद गोष्टी केल्यात, आपल्या शेजाऱ्यांच्या बायकांबरोबर व्यभिचार केला आणि जे मी त्यांना आज्ञापिले नाही ते वचन ते खोटेपणाने माझ्या नावाने बोलले आहेत. कारण जो मी एक आहे तो जाणतो. असे परमेश्वर म्हणतो.


“सर्व बंदिवासांतल्या लोकांस निरोप पाठव व सांग, नेहेलमकर घराण्यातील शमाया याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो ‘कारण शमायाने तुम्हास भविष्य सांगितले आहे पण मी त्यास पाठविलेले नाही. कारण तुम्ही खोट्यावर विश्वास ठेवावा, असे त्याने केले आहे.


आणि शांती नसता, शांती, शांती, असे म्हणून त्यांनी माझ्या लोकांची जखम वरवर बरी केली आहे.


म्हणून, शिलोचे जसे मी केले, त्याचप्रकारे ज्या घरास माझे नाव आहे आणि ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे ठिकाण मी तुम्हास व तुमच्या पूर्वजांना दिले तसे करीन.


खोट्या गोष्टी ऐकून, जे मरु नये त्यांना ठार करून जे जगू नये त्यांना जगवून त्यांच्या अन्नांसाठी माझ्या लोकांचा अवमान केला आहे.


तुझे अधिकारी लाच घेण्यासाठी न्याय करतात, आणि तिचे याजक मोबदल्यासाठी शिकवण देतात. आणि तुझे भविष्य बघणारे पैशासाठी भविष्य बघतात. तरीही ते परमेश्वरावर अवलंबून राहतात व म्हणतात, “परमेश्वर आम्हाबरोबर नाही काय? आम्हांवर अनिष्ट येणार नाही.”


त्या दिवसात तू माझ्याविरूद्ध केलेल्या सर्व कृत्यांची तुला लाज वाटणार नाही, कारण त्या समयापर्यंत जे तुझ्या वैभवाविषयी अभिमान धरत होते त्यांना मी बाहेर घालवीन, आणि मग तू माझ्या पवित्र पर्वतावर पुन्हा गर्विष्ठ असणार नाहीस.


पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या आणि आपल्या मनात असे म्हणू नका की, ‘अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ कारण मी तुम्हास सांगतो की, अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan