Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत. “पुन्हा कधीही तोफेत व बेन हिन्नोमची दरी असे म्हटले जाणार नाही, तर तिला ते संहाराची दरी म्हणतील. की आणखी एका मृतालाही पुरण्यास जागा राहणार नाही इतकी वेळ येईपर्यंत ते तोफेतमध्ये मृतांना पुरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत लोक इत:पर त्या स्थळास तोफेत व बेन-हिन्नोमाचे खोरे म्हणणार नाहीत तर ‘वधाचे खोरे’ म्हणतील आणि जागेच्या अभावी तोफेतात प्रेते पुरतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 म्हणून सावध राहा, ते दिवस येत आहे, याहवेह असे म्हणतात, लोक त्या खोर्‍याला तोफेत किंवा बेन-हिन्नोमचे खोरे असे म्हणणार नाही, परंतु कत्तलीचे खोरे हे नाव पडेल, कारण तोफेतमध्ये एवढ्यांना पुरण्यात येईल, की त्या सर्व प्रेतांना पुरण्यास जागा उरणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:32
10 Iomraidhean Croise  

हिन्नोमच्या मुलाचे खोरे याठिकाणी तोफेत हे एक ठिकाण होते. तेथे लोक मोलख या दैवताला आपल्या मुलांचा बली देत आणि वेदीवर त्यांना जाळत. योशीयाने हे स्थान पुन्हा वापरता येऊ नये असे भ्रष्ट करून टाकले.


आणि पुढील गोष्टी सांग: सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, जसे त्याने मडके फोडले आणि ते पुन्हा जोडने अशक्य आहे, तसेच मी शहरा सोबत करेन, म्हणजे ते तोफेतमध्ये मृतांना पुरता न येणार, इतक्या प्रेतांना ते तेथे पुरतील.


‘यरूशलेममधील घरे आणि यहूदातील राजांचे राजवाडे पण तोफेतप्रमाणेच होतील. कारण त्यांनी आपल्या सर्व विटाळलेल्या घराच्या छपरांवर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पूजले आणि दैवतांना त्यांनी पेयार्पणे केली.”


नंतर बेन हिन्नोमाच्या मुलाचे खोरे जे कुंभाराच्या वाड्याच्या वेशीजवळ आहे तेथे जा, आणि मी तुला सांगतो ती वचने तिथे घोषीत कर.


यास्तव पाहा! परमेश्वर असे म्हणतो, हल्ली हिन्नोमच्या दरीला तोफेत म्हणतात. पण मी तुम्हास खात्रीपूर्वक सांगतो की अशी वेळ येईल की, या दरीला लोक कत्तलीची दरी म्हणून ओळखतील.


प्रेतांचे व राखेचे पूर्ण खोरे आणि किद्रोन ओहोळापर्यंत पूर्वेकडील घोडेवेशीच्या कोपऱ्यापर्यंत सर्व शेते परमेश्वरास पवित्र होतील. ती पुन्हा कधीही उपटण्यात येणार नाहीत किंवा मोडून टाकणार नाहीत.”


आणि त्यांनी बेन हिन्नोमच्या दरीत तोफेतची उच्चस्थाने बांधली आहेत. त्याठिकाणी ते स्वत:च्या मुलामुलींना अग्नीत जाळण्यासाठी देत असत. अशी आज्ञा मी दिलेली नाही आणि असे काही माझ्या मनातही आले नाही.


तुमच्या वेद्याचे खांब, तुमच्या सूर्यमूर्ती मी पाडून टाकीन, तुमचे वध पावलेले लोक तुमच्या मूर्त्यांपुढे पडतील असे परमेश्वर करीन.


तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan