Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘तुम्ही आपली वाट नीट करा आणि चांगले ते करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही असे केल्यास मी तुम्हास या ठिकाणी राहू देईन

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 सेनाधीश परमेश्वर; इस्राएलाचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे ह्या स्थळी मी तुमची वस्ती करवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 इस्राएलचे सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह असे म्हणतात: तुमच्या मार्गाची व वर्तणुकीची सुधारणा करा, मग मी तुम्हाला या ठिकाणी राहू देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:3
18 Iomraidhean Croise  

इस्राएल आणि यहूदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे सांगितले होते की, “या वाईट मार्गातून फिरा आणि जे नियम तुमच्या पूर्वजांना मी आज्ञापिले होते व जे मी माझे सेवक आणि भविष्यवादी यांच्याकडून तुम्हास पाठवून दिले, त्या सर्वांप्रमाणे माझ्या आज्ञा व माझे नियम पाळा.”


तर आता तुम्ही परमेश्वर आपल्या पूर्वजांचा देव याच्याजवळ पाप कबूल करून त्यास इच्छेप्रमाणे ते करा. देशातल्या लोकांपासून आणि परक्या स्त्रिया यांच्यापासून वेगळे व्हा.”


एखाद्याने आपले पाप लपवले तर त्याची उन्नती होत नाही, पण एखाद्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि ते सोडून दिले तर त्याच्यावर दया दाखवण्यात येईल.


दुष्ट आपला मार्ग व पापी मनुष्य आपले विचार सोडून देवो. तो परमेश्वराकडे माघारी येवो आणि तो त्यांच्यावर दया करील व तो आमच्या देवाकडे येवो, तो त्यांना विपुलपणे क्षमा करील.


तर या नगराच्या दारातून दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे आणि सरदार, रथांमधे व घोड्यावर बसून आत जातील, ते व त्यांचे सरदार, यहूदा आणि यरूशलेमेत राहणारे, आत जातील, आणि हे नगर सर्वकाळ राहीन.


तर आता, यहूदाच्या मनुष्यांशी आणि यरूशलेम येथे राहणाऱ्यांना असे सांग, की परमेश्वर असे म्हणतो: पाहा! मी तुमच्यावर संकटे आणण्याचे पाहत आहे. मी तुमच्याविरुध्द बेत आखत आहे. तेव्हा प्रत्येक आपल्या दुष्ट मार्गाविषयी पश्चाताप करा, आणि आपली मार्गे व आपली कर्मे नीट करा.


पण जर ज्या राष्ट्राविषयी मी बोललो, ते आपल्या दुष्कृत्यांपासून फिरले तर मी जे त्यांच्याविषयी करण्याचे योजिले होते त्याबद्दल अनुतापेन.


तर आता तुम्ही आपली कर्मे आणि मार्ग व्यवस्थीत करा, आणि तुमचा परमेश्वर, तुमचा देव, याची वाणी ऐका, म्हणजे तो जे अरिष्ट तुम्हावर आणण्याचा बेत करीत आहे त्यामध्ये तो कदाचीत फेरविचार करीन.


इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सर्व सेवक, संदेष्टे पाठविले. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगण्यास पाठविले, प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गापासून वळा आणि चांगली कृत्ये करा. दुसऱ्या देवांना अनुसरू नका आणि त्यांची पूजा करु नका. त्याऐवजी, तुमच्या पूर्वजांना व तुम्हास जो देश दिला आहे त्यामध्ये परत माघारी या. पण या लोकांनी माझे ऐकले नाही.


कारण रेखाबाचा मुलगा योनादाबाच्या वंशजांनी त्यांच्या पूर्वजांनी त्यांना दिलेल्या आज्ञा पाळल्या, पण या लोकांनी माझे ऐकण्याचे नाकारले.


परमेश्वर असे म्हणतो, “हे इस्राएल जर तू परत येशील, माझ्याकडे परत वळशील. तू आपले तिरस्करणीय गोष्टी माझ्यासमोर दूर करशील आणि जर तू भटकणार नाहीस,


परमेश्वर असे म्हणतो: “चौकात उभे राहा आणि पाहा. जुना रस्ता कोणता ते विचारा. चांगल्या रस्त्याची चौकशी करा, नंतर त्याच चाला आणि तुमच्या जीवा करता विसाव्याची जागा शोधा.” पण तुम्ही लोक म्हणाला, आम्ही जाणार नाही.


तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan