यिर्मया 7:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 पण त्यांनी माझे ऐकले नाही, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपली मान ताठ केली. ते त्यांच्या पूर्वजांपेक्षा अधिक दुष्ट होते Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 पण त्यांनी माझे ऐकले नाही, आपला कान दिला नाही, त्यांनी आपली मान ताठ केली व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक वाईट केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 परंतु त्यांनी माझे ऐकले नाही व माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते हेकेखोर होते व त्यांच्या पूर्वजांहून त्यांनी अधिक दुष्टाई केली.’ Faic an caibideil |
परमेश्वराचा करार आणि त्याचा नियम जो त्याने त्यांच्या पूर्वजांशी केला होता व त्याच्या साक्षी ज्या त्याने त्यांना साक्ष देऊन दिलेल्या होत्या, त्यांचा त्यांनी अव्हेर केला. ते निरर्थक होऊन व्यर्थतेच्या मागे लागले. त्यांनी आपल्या भोवतालची राष्ट्रे ज्याच्याविषयी परमेश्वराने इस्राएल लोकांस आज्ञा केली होती की, त्यांच्यासारखे करू नका त्यांच्यामागे ते चालले होते.
इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सर्व सेवक, संदेष्टे पाठविले. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगण्यास पाठविले, प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गापासून वळा आणि चांगली कृत्ये करा. दुसऱ्या देवांना अनुसरू नका आणि त्यांची पूजा करु नका. त्याऐवजी, तुमच्या पूर्वजांना व तुम्हास जो देश दिला आहे त्यामध्ये परत माघारी या. पण या लोकांनी माझे ऐकले नाही.
म्हणून परमेश्वर, सैन्यांचा देव आणि इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “पाहा, जे सर्व अरिष्ट मी त्यांच्याविरुद्ध आणणार म्हणून मी म्हणालो आहे, ते सर्व मी यहूदावर आणि यरूशलेमेच्या राहणाऱ्यांवर आणीन, कारण मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी ऐकण्याचे नाकारले. मी त्यांना हाका मारल्या पण त्यांनी उत्तर दिले नाही.”