Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 कारण मी जेव्हा तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले, तेव्हा मी त्यांच्या कडे काहीएक मागीतले नाही, मी त्यांना होमार्पणे आणि यज्ञ यांबद्दल आज्ञा दिली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तुमच्या पूर्वजांना मी मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवशी होमबलींविषयी किंवा यज्ञबलींविषयी मी त्यांना काही सांगितले नाही व आज्ञा दिली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तुमच्या पूर्वजांना मी इजिप्त देशातून बाहेर आणले तेव्हा मी त्यांना केवळ होमार्पणे व यज्ञार्पणे याविषयीच आज्ञा दिली नव्हती,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:22
9 Iomraidhean Croise  

यज्ञ आणि अन्नार्पण यांमध्ये तुला आनंद नाही. परंतु तू माझे कान उघडले आहेत. होमार्पणे किंवा पापार्पणे तू मागत नाहीस.


कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी निश्चित आपल्या तरुणपणापासून माझ्या दृष्टीने जे वाईट तेच करीत आली आहेत. इस्राएलाच्या लोकांनी आपल्या हातानी प्रत्यक्ष कृती करून त्यांनी खचित माझा अपमान केला आहे.” असे परमेश्वर म्हणत आहे.


कारण मी बलिदान नाही तर विश्वासूपण इच्छितो, मला होमबली पेक्षा देवाचे ज्ञान प्रिय आहे.


मी तुम्हास सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका; मला दया हवी आहे आणि यज्ञ नको, कारण मी नीतिमानांना नव्हे, तर पाप्यांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”


त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व यज्ञ व अर्पणे, जी आपणास करण्याची आज्ञा दिली आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.”


म्हणजे आज्ञांचे उल्लघंन करून ते सूर्य, चंद्र, किंवा आकाशातील तांरागण इतर दैवतांची पूजा करू लागले,


शमुवेल म्हणाला, “परमेश्वरास आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढरांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan