Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 7:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मला संताप आणावा म्हणून मुले लाकडे गोळा करत आहेत आणि वडील सरपण पेटवत आहे. स्त्रिया आकाशाच्या राणीसाठी कणीक मळत आहे आणि इतर दैवतांना अर्पण करण्यासाठी म्हणून पेयार्पणे ओतत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मुलेबाळे काटक्या जमा करतात, वडील माणसे अग्नी पेटवतात, आणि आकाशराणीप्रीत्यर्थ पोळ्या कराव्यात व अन्य देवांना पेयार्पणे द्यावीत म्हणून स्त्रिया कणीक तिंबतात; असे ते मला क्रोधास पेटवतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 मुलेबाळे लाकडे गोळा करतात, त्यांचे वडील अग्नी पेटवितात, आणि स्त्रिया, आकाशराणीस पोळ्या तयार करून अर्पण करतात. मला क्रोधित करण्यासाठी इतर दैवतांना पेयार्पणे करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 7:18
28 Iomraidhean Croise  

पण तुझ्या हस्ते अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ती केल्यास याचा मला खूप राग आला आहे.


“तुला मी मोठे केले. माझ्या इस्राएली लोकांचा नायक म्हणून तुला मी नेमले. पण तू यराबामाच्या वाटेनेच गेलास व इस्राएलींच्या पापाला कारणीभूत झालास. त्यांच्या पातकांनी माझा क्रोध जागा झाला आहे.


जे दुसऱ्या देवाला शोधतात, त्यांची दु:खे वाढवली जातील. त्यांच्या देवाला मी रक्ताची पेयार्पणे ओतणार नाही. किंवा त्यांचे नावसुद्धा आपल्या ओठाने घेणार नाही.


कारण यरूशलेमेचा नाश झाला आहे, व यहूदा पतन पावला आहे, कारण त्यांचे बोलणे व कृती परमेश्वराच्या विरोधात आहे, त्याच्या उच्च अधिकाराचा अपमान करत आहे.


नदीतल्या खोऱ्यातील गुळगुळीत दगडांमध्ये तुझा वाटा आहे, त्यासाठीच तुला नियुक्त केले, तेच तुझे भक्ती करण्याचे साधन आहेत. तू तुझे पेयार्पणे त्यांनाच ओतून दिले आणि अन्नार्पण वाहिले आहे. या गोष्टींमध्ये मी आनंद घ्यावा का?


“पण तुम्ही जे परमेश्वराचा त्याग करता, माझ्या पवित्र डोंगराला विसरता, जे तुम्ही गादासाठी मेज तयार करता आणि मनीसाठी मिश्रित मद्याचे प्याले भरून ठेवता.


ते असे लोक आहेत जे सतत माझे मन दुखवतात, ते बागेत यज्ञ करतात आणि विटांवर धूप जाळतात.


आणि मी त्यांच्याविरुद्ध माझा निर्णय घोषित करीन, कारण त्यांनी मला सोडून इतर देवतांपुढे धूप जाळला, आणि आपल्या हातांच्या कामांची पूजा केली, या त्यांच्या दुष्टाईबद्दल मी त्यांच्याविरुद्ध शिक्षा सांगेन.


कारण सेनाधीश परमेश्वर, ज्याने तुला लावले आहे, तो तुझ्या विरूद्ध अरिष्ट बोलला आहे. कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी कुकर्मे केली. त्यांनी ‘बाल’ देवाला यज्ञ अर्पण केले म्हणून मला राग आला.”


त्यांचे लोक उंच डोंगरावरील हिरव्या झाडाजवळील त्यांच्या वेद्या आणि अशेराचे खांब आठवण करतात.


‘यरूशलेममधील घरे आणि यहूदातील राजांचे राजवाडे पण तोफेतप्रमाणेच होतील. कारण त्यांनी आपल्या सर्व विटाळलेल्या घराच्या छपरांवर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पूजले आणि दैवतांना त्यांनी पेयार्पणे केली.”


परमेश्वर असे म्हणतो, “पण तुम्ही माझे ऐकले नाहीत, आणि तुम्हावर अरिष्ट यावे म्हणून तुम्ही आपल्या हातांच्या कामाने मला राग आणून दिला.”


आणि जे खास्दी या नगराविरूद्ध लढाई करतात ते येतील व हे नगर अग्नीने पेटवतील व मला संतापविण्यासाठी ज्या घराच्या धाब्यावर बआलदेवाला धूप जाळला आणि इतर देवांना पेयार्पणे ओतली तिही जाळून टाकतील.


सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘आम्ही आकाशाच्या राणीला धूप जाळायला व तिच्यासाठी पेयार्पणे ओतायला जे नवस केले आहेत ते खचित फेडू असे तुम्ही आणि तुमच्या स्त्रिया तुम्ही दोघांनी आपल्या मुखाने बोलून आणि आपल्या हातांनी पूर्ण केले आहे. तर तुम्ही आपले नवस खचित स्थापित करा आणि आपले नवस फेडा.”


मग मी माझे सर्व सेवक संदेष्टे वारंवार पाठवत आलो. मी त्यांना सांगण्यासाठी पाठवले, ज्यांचा मी द्वेष करतो त्या तिरस्कारणीय गोष्टी थांबवा.


ते लोक यहूदा शहरात, आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसत नाही काय?


आमच्या तरुणांना त्यांनी पिठाच्या जात्यावर दळावयास लावले. ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले.


तू मिसर देशाच्या लोकांशी, शेजाऱ्यांशी जे वासनाधुंद त्यांच्या सोबत वेश्या कर्म केले त्याचा मला राग येतोय.


मी आपले हाथ उंचावून शपथ घेऊन दिलेल्या देशात मी त्यांना आणिले, तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी आणि दाट छायेचे वृक्ष पाहून मला संतापावण्यासाठी तेथे त्यांनी यज्ञबली अर्पिली. तेथे त्यांनी सुवासीक धुप जाळीला व पेयार्पण अर्पिली.


परमेश्वर देवाच्या देवळाच्या आतील प्रांगणात त्याने मला आणले, आणि पहा! परमेश्वर देवाच्या देवळाच्या प्रवेश व्दारात देवडी आणि वेदीवर पंचवीस माणसे परमेश्वर देवाच्या वेदीकडे पूर्वेला तोंड व परमेश्वर देवाच्या देवळाकडे पाठमोरे करून सुर्याची उपासना करीत होते.


तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू हे पाहिलेस का? यहूदाचे घराणे याही ठिकाणी घृणास्पद गोष्टी करीत आहे. ते कमी आहे का? म्हणून त्यांची भूमी अहिंसेने भरुन गेली आहे, त्यांनी पुन्हा माझ्या रागाला चिथवीले आहे, त्यांनी आपल्या नाकांनी फांद्या धरुन ठेवल्या आहे.


आपण प्रभूला ईर्षेस पेटविण्याचा प्रयत्न करीत आहोत का? कारण तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके आम्ही नाही. तुमचे स्वातंत्र्य देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणा.


त्यांनी अन्य दैवतांची पूजा करायला सुरुवात केली आणि त्याची ईर्ष्या जागवली. मूर्ती त्यास मान्य नाहीत, तरी या लोकांनी मूर्ती केल्या व त्याचा कोप ओढवला.


मूर्तीपूजा करून यांनी माझा कोप ओढवला. मूर्ती म्हणजे देव नव्हेत. क्षुल्लक मूर्ती करून त्यांनी मला क्रुद्ध केले. तेव्हा त्यांना मत्सर वाटेल असे मी करीन. जे एकसंध राष्ट्र नाही अशा लोकांमार्फत, मूढ राष्ट्राच्या योगे मी यांना इर्ष्येस पेटवीन.


तसेच आकाशातील सूर्य, चंद्र, तारे आणि इतर गोष्टी पाहाताना हबकून जावू नका. त्यांच्यापुढे लोटांगण घालून त्यांची उपासना करु नका. या गोष्टी तुमचा देव परमेश्वर याने आकाशाखालील सर्व लोकांस देऊन ठेवल्या आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan