Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 6:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 जशी विहीर आपले पाणी ताजे ठेवते, तशीच ही नगरी आपला दुष्टपणा ताजा ठेवते. तिच्यामध्ये लूटमार व हिंसाचार हे ऐकू येतात. पीडा आणि दु: ख सदोदीत माझ्या समोर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 झर्‍यांतून जसे नित्य नवे पाणी येते तशी त्यात नित्य नवी दुष्टता घडते; त्याच्या ठायी बलात्कार व लुटालूट ह्यांचा गोंगाट ऐकू येतो; नित्य माझ्यासमोर रोग आणि जखमा आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 ज्याप्रमाणे विहिरीच्या झऱ्यातून पाणी बाहेर वाहते, तशी तिची दुष्टाई झर्‍याप्रमाणे उफाळून येते. तिच्या रस्त्यारस्त्यातून हिंसाचार व विनाशाचे आवाज घुमतात; तिचे रोग व तिच्या जखमा सदोदित माझ्या नजरेसमोर आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 6:7
24 Iomraidhean Croise  

तुझे अंतःकरण सुरक्षित ठेव आणि सर्व दक्षतेने त्याचे संरक्षण कर, कारण त्यातूनच जीवनाचा झरा वाहतो.


पायाच्या तळव्यापायापासून डोक्यापर्यंत ज्याला दुखापत झाली नाही असा भाग राहीला नाही; फक्त जखमा व घाव आणि ताज्या उघड्या जखमा आहेत; त्या स्वच्छ केल्या नाहीत, पट्टी बांधून त्या झाकल्याही नाहीत किंवा तेलाने उपचार केला नाही.


पण दुष्ट हे खवळलेल्या समुद्राप्रमाणे आहेत, जो शांत राहत नाही, आणि त्यांची जले हे चिखल व माती ढवळून काढतात.


त्यांनी बनविलेल्या जाळ्याचा उपयोग कपड्यांसाठी होऊ शकत नाही आणि त्यांचे अंग ते आपल्या कृत्यांनी झाकू शकणार नाहीत. त्यांची कृत्ये ही पापाची कृत्ये आहेत, आणि त्यांच्या हातात हिंसेची कामे आहेत.


कारण जेव्हा मी बोललो, तेव्हा मी ओरडलो, मी हिंसा आणि विध्वंस ह्याबद्दल आरडाओरड करतो. कारण परमेश्वराचे वचन सारा दिवस माझ्यासाठी निंदा व उपहास असे करण्यात आले आहे.


कारण परमेश्वर असे म्हणतो, तुझी जखम बरी न होऊ शकणारी आहे; तुझा घाय संसर्गजन्य आहे.


तुझा वाद चालवणारा कोणीही नाही; तुझा घाय बरा करण्यासाठी कोणताही उपाय नाही.


तुझ्या जखमेमुळे तू मदतीसाठी का ओरडतो? तुझ्या यातना बऱ्या न होऊ शकणाऱ्या आहेत. कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे, तुझ्या असंख्य पापामुळे मी तुला या गोष्टी केल्या आहेत.


ज्या दिवशी त्यांनी हे नगर बांधले त्यादिवसापासून आतापर्यंत ते माझा क्रोध आणि कोप चेतविण्याचे कारण होत आले आहेत. म्हणून ते मी आपल्यापुढून दूर करीन.


गिलादमध्ये काही औषध नाही काय? तेथे वैद्य नाही काय? मग माझ्या लोकांच्या कन्येला आरोग्य का लाभले नाही.


ते तुझ्यापुढे कपटाचा संदेश देत असता, तुला खोटा शकुन सांगत असता, ज्या जखमी झालेल्या पातक्यांचा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे त्यांच्या कापलेल्या मानांवर ती तलवार तुला लोळवील.


तिने सर्वांच्यामध्ये रक्तपात केला तिने गुळगुळीत खडकावर रक्त सांडले जमिनीच्या धुळीने त्यास झाकू दिले नाही.


प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएलाच्या अधिपतींनो, हे तुमच्यासाठी पुरे होवो. जबरदस्ती आणि जुलूम दूर करा! न्याय व न्यायीपण आचरा, माझ्या लोकांची हकालपट्टी करण्याचे सोडा.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


क्रुरपणाची काठी दुष्टपणावर उगवेल त्यांच्या सर्वांवर, त्यांच्यातल्या धनावर, त्यांच्या महत्वाच्या शेवटच्या इच्छा रहाणार नाहीत.


साखळी तयार करा, कारण भूमी रक्ताच्या न्यायाच्या निकालाने पूर्ण भरुन गेली आहे, शहर हिंसक बनले आहे.


त्या बंडखोर नगरीला हाय हाय! ती हिंसेनी भरलेली नगरी कशी अशुद्ध झाली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan