Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 6:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 ते धनुष्य आणि भाला उचलतील. ते क्रूर आहेत आणि ते दया करीत नाही. त्यांचा आवाज समुद्राच्या गर्जने सारखा आहे. आणि हे सियोन कन्ये, लढाईसाठी सिद्ध झालेल्या पुरूषांप्रमाणे विशिष्ट रचना करूण ते घोड्यांवरून स्वारी करतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 ते लोक धनुष्ये व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही, ते सागराप्रमाणे गर्जना करतात; ते घोड्यांवर स्वार झाले आहेत; हे सीयोनकन्ये, ते युद्धास सिद्ध होऊन तुझ्याविरुद्ध एकजुटीने येत आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 त्यांचे सैनिक धनुष्य व भाल्यासहित सज्ज आहेत. ते अत्यंत क्रूर असून दया दाखवित नाही. ते घोड्यांवर स्वार झाले असता त्यांचा आवाज गर्जणाऱ्या समुद्राप्रमाणे आहे. हे सीयोनकन्ये तुझ्यावर हल्ला करण्यासाठी युद्धासाठी सुसज्जित असलेल्यांप्रमाणे ते येत आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 6:23
21 Iomraidhean Croise  

आजच्या दिवशीच तो नोबास थांबेल सीयोन कन्येच्या डोंगराला, यरूशलेमेच्या टेकडीला आपल्या हाताची मूठ दाखवील.


त्यांचे बाण तरूणांना भेदून जातील. ते बालकांवर दया करणार नाहीत आणि मुलांना सोडणार नाहीत.


समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करणारा पुष्कळ लोकांचा समुदाय आणि महापुराच्या जलांच्या गोंगाटासारखी गोंगाट करणारी राष्ट्रांची गर्दी यांना हायहाय!


“मी मिसऱ्यांना एका कठोर धन्याच्या हातात देईन आणि एक सामर्थ्यवान राजा त्यांच्यावर राज्य करील. असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “अरिष्टे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात पुढे जाणार, आणि पृथ्वीवरच्या अतिदूरच्या ठिकाणाहून वादळाची सुरुवात होईल.”


म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, या देशाविरूद्ध आणि त्यातील सर्व राहणाऱ्यांविरूद्ध, तुझ्या भोवती असणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध बोलावून घेईन. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी त्यांना नाश करण्यासाठी ठेवीण. आणि त्यांना विस्मय व फूत्कार व सर्व काळ ओसाड असे करीन.


तुझे सर्व प्रियकर तुला विसरले आहेत. ते तुला शोधत नाहीत, कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे आणि अगणित पापांमुळे, मी तुला शत्रूप्रमाणे जखम करून आणि क्रूर धन्याप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे.


पाहा! तो ढगाप्रमाणे आक्रमण करील, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत. त्यांचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्हांला हाय! कारण आम्ही लुटलेले आहो.


“राष्ट्रांना ह्याबद्दल विचार करण्यास लावा. पाहा! यरूशलेमेविरूद्ध घोषीत करा की, दूर देशातून वेढा घालणारे येत आहेत आणि यहूदाच्या विरूद्ध ते आपला शब्द उच्चारत आहेत.


प्रत्येक शहर स्वर व धनुर्धारी यांच्या आवाजाने पळून जातील, ते जंगलात पळून जातील. प्रत्येक शहर डोंगरकड्याच्या ठिकाणी चढेल. शहरे ओसाड पडतील, कारण तेथे कोणीही राहणारे नसतील.


त्यांचे भाते उघड्या थडग्यांप्रमाणे आहेत. ते सर्व सैनिक आहेत.


“पाहा! उत्तरेकडून लोक येत आहेत. कारण एक महान शक्तीशाली राष्ट्र आणि पुष्कळ राजे दूर देशातून उठत आहेत.


ते धनुष्य व भाले धारण करतात. ते क्रूर आहेत आणि त्यांच्याजवळ दया नाही. त्यांचा आवाज समुद्राप्रमाणे गर्जत आहेत आणि अगे बाबेलच्या कन्ये ते घोड्यांवर स्वार होऊन लढणाऱ्या मनुष्याच्या स्वरुपात तुझ्याविरूद्ध येत आहेत.


“परमेश्वराच्या नावात तिच्यावर हल्ला करा. उठा! आपण दुपारी हल्ला करु. हे किती वाईट आहे की दिवस मावळत आहे आणि संध्याछाया लांबत आहेत.


त्यांच्या घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज दानापासून ऐकण्यात आला आहे. त्याच्या शक्तीशाली घोड्यांच्या खिंकाळण्याच्या आवाजाने पुर्ण पृथ्वी थरथरली आहे. कारण ते भूमी व त्यावरील प्रत्येक गोष्टीचा नाश करण्यासाठी आले आहेत. ते नगराचा व त्यामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांस नाश करण्यासाठी आले आहेत.


मी तुझ्यावर माझा कोपाग्नीचा संताप ओतेन आणि तुला क्रुर कोशल्याने हानी करण्यास लोकांच्या ताब्यात देईन.


दूरच्या राष्ट्रांतील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हास समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan