यिर्मया 51:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
9 बाबेल बरी होण्याची आमची इच्छा होती, पण ती बरी झाली नाही, चला आपण सर्व तिला सोडून व दूर आपल्या देशात जाऊ. कारण तिचा गुन्हा आकाशास पोहचला आहे; त्याचा आभाळापर्यंत ढीग झाला आहे.
9 आम्ही बाबेलास बरे करण्याचा प्रयत्न केला, पण तो बरा झाला नाही; त्याला सोडून द्या; चला, आपण सर्व आपापल्या देशाला जाऊ; कारण त्याचा गुन्हा गगनापर्यंत पोहचला आहे, आकाशापर्यंत चढला आहे.
9 “ ‘आम्ही बाबेलला बरे केले असते. पण ती बरी होऊ शकत नाही. आपण तिला सोडून आपल्या देशात परत जाऊ या. कारण तिचा न्याय आता आकाशापर्यंत पोचला आहे, तो स्वर्गाच्या उंचीपर्यंत पोहोचला आहे.’
तिथे ओदेद नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा होता. शोमरोनला आलेल्या इस्राएली सैन्याला तो भेटला. ओदेद त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यामुळे तुम्ही यहूदी लोकांचा पराभव करु शकलात कारण परमेश्वराचा यहूद्यांवर कोप झाला होता. पण तुम्ही अतिशय नीच पध्दतीने यहूद्यांची कत्तल केलीत. त्यामुळे आता परमेश्वराच्या क्रोधाचा रोख तुमच्यावर आहे.
मी म्हणालो, “हे देवा, तुझ्याकडे पाहण्याची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकावरून गेली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोहचले आहेत.
ज्यांच्यासाठी तू मेहनत केली, तुझ्या तरुणपणापासून तू त्यांच्याबरोबर व्यापार केलास; ते सर्व तुला सोडून जातील. ते प्रत्येकजण आपापल्या मार्गाने भरकटले; तुला वाचवायला कोणीही नाही.
जे कोणी अडखळतील त्यांची संख्या वाढवली आहे. प्रत्येक सैनिक एकावर एक पडले. ते म्हणत आहेत, उठा, आपण या पीडणाऱ्या तलवारीपासून जी आपणाला मारून खाली पाडत आहे, तिच्यापासून पळून आपल्या स्वतःच्या लोकांकडे, आपल्या मातृभूमीला परत जाऊ.
तिचे भाडोत्री सैनिक तिच्यामध्ये गोठ्यातल्या वासराप्रमाणे आहेत, पण ते सुद्धा पाठ फिरवून व दूर पळून जातील. ते एकत्रित उभे राहत नाहीत, कारण त्यांच्या विपत्तीचा दिवस, त्यांच्या शिक्षेचा समय त्यांच्या विरोधात आला आहे.
बाबेलामधील पेरणारा आणि कापणीच्यावेळी विळा चालवणारा या दोघांचा नाश करा. जुलमाच्या तलवारीमुळे ते प्रत्येकजण आपल्या लोकांकडे वळतील; त्यांना आपल्या देशाकडे पळून जाऊ द्या.
हायहाय, त्यांना! कारण ते मजपासून बहकले आहेत. त्यांच्यावर नाश येत आहे! त्यांनी माझ्याविरुध्द फितुरी केली आहे. मी त्यांची सुटका केली असती; पण त्यांनी माझ्या विरोधात लबाडी केली आहे.
मग मी स्वर्गातून आणखी एक वाणी ऐकली; ती म्हणाली, अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर या. म्हणजे तुम्ही तिच्या पापात भागीदार होऊ नये आणि यासाठी की, तिच्या कोणत्याही पीडा तुमच्यावर येऊ नयेत.