Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 51:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 जेव्हा तो गरजतो, तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो, कारण तो पृथ्वीच्या शेवटापासून धुके वर आणतो. तो पावसासाठी वीजा निर्माण करतो आणि आपल्या कोठारातून वारा काढून पाठवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तो आपला शब्द उच्चारतो, तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो; तो पृथ्वीच्या दिगंतापासून वाफेचे लोट वर चढवतो. तो पावसासाठी विजा सिद्ध करतो; व आपल्या भांडारांतून वायू बाहेर काढतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 जेव्हा ते गर्जना करतात, तेव्हा आकाशातील मेघ गर्जना करतात; ते मेघांना पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उभारतात. ते विजा आणि पाऊस पाठवितात आणि त्यांच्या भांडारातून वारा बाहेर काढतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 51:16
24 Iomraidhean Croise  

तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो; आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.


परंतु परमेश्वराने समुद्रात मोठा वारा सुटू दिला आणि असे मोठे वादळ समुद्रात आले की जहाज फुटण्याच्या मार्गावर आले.


परमेश्वराने आकाशात गडगडाट केला! परात्पराने आवाज उंच केला, गारा आणि विजा बाहेर पडल्या.


मग देवाने, सूर्य उगवल्यावर पूर्वेकडून झळईचा वारा सोडला; आणि ऊन योनाच्या डोक्याला लागले त्याने तो मूर्छित झाला व त्यास मरण येवो अशी तो विनवणी करत म्हणाला, “मला जिवंत राहण्यापेक्षा मरण चांगले वाटते.”


परमेश्वर असे म्हणतो: “इस्राएलाचे लोकहो, तुम्ही मला कूशी लोकांप्रमाणे नाही काय? मी इस्राएलाला मिसर देशातून पलिष्ट्यांना कफतोरमधून आणि अरामींना कीर मधून आणले नाही काय?”


मग बाहेरील अंगणात करुबाच्या पंखांचा आवाज मी ऐकला, तो सर्वसामर्थी परमेश्वर देवाच्या वाणीसारखा होता.


तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते.


तुझ्या धमकीने पाणी मागे सरले आहे; तुझ्या गर्जनेच्या आवाजाने ती पळाली.


त्याने आकाशात पूर्वेचा वारा वाहविला, आणि त्याच्या सामर्थ्याने त्याने दक्षिणेच्या वाऱ्याला मार्ग दाखवला.


जो पुरातन काळापासून अस्तित्वात आहे तो आकाशांच्या आकांशावर आरूढ होतो; पाहा, तो आपला आवाज सामर्थ्याने उंचावतो.


राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल.


तुझे बाहू देवाच्या बाहूइतके शक्तीशाली आहेत का? देवाच्या आवाजासारखा तुझा आवाज गडगडाटी आहे का?


मी ज्या भांडारात हिम आणि गारा ठेवतो तिथे तू कधी गेला आहेस का?


काही वेळा हे सुधारणुक करण्यासाठी असते, काहीवेळा त्यांच्या भूमीसाठी, हे सर्व तो घडवून आणतो, आणि काहीवेळा विश्वासाच्या कराराची कृती असते


मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेकडून जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटविला, असा की पाणी दुभागून मध्ये कोरडी जमीन झाली.


तेव्हा परमेश्वराने पश्चिमेकडून जोराचा वारा वाहविला तेव्हा त्या वाऱ्याने सर्व टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले. मिसरमध्ये एकही टोळ राहिला नाही.


मग मोशेने आपल्या हातातील काठी मिसर देशावर उगारली तेव्हा परमेश्वराने एक दिवसभर व रात्रभर पूर्वेकडून वारा वाहविला, तेव्हा सकाळी वाऱ्याबरोबर टोळच टोळ आले.


देवाने नोहा, त्याच्यासोबत तारवात असलेले सर्व वन्यप्राणी आणि सर्व गुरेढोरे यांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहण्यास लावला, आणि पाणी मागे हटण्यास सुरवात झाली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan