Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 5:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 म्हणून मी महत्वाच्या लोकांकडे जाऊन त्यांना देवाचा संराष्ट्र घोषीत करीन. कारण त्यांना कमीत कमी परमेश्वराचा आपल्या देवाचा नियम तर माहीत आहे.” पण त्यांनी तर एकमताने जू मोडले आहे आणि तो साखळदंड तोडला आहे जो त्यांना देवासोबत बांधून होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ह्याकरता मी महाजनांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाचे नियम ठाऊक आहेत.” पण त्यांनी तर जोखड साफ मोडले आहे व बंधने तोडून टाकली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मी त्यांच्या पुढार्‍यांकडे जाईन व त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना निश्चितच याहवेहचे मार्ग ठाऊक आहेत. त्यांना त्यांच्या परमेश्वराची अपेक्षा काय आहे हे ठाऊक आहे.” पण त्या सर्वांनी एकमताने माझे जू झिडकारून टाकले आहे. आणि माझी बंधने तोडून टाकली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 5:5
25 Iomraidhean Croise  

त्याचप्रमाणे याजकांचे प्रमुख, आणि यहूदातील वडिलधारी मंडळी यांचे दुराचरण वाढत चालले आणि त्यांनी अधिकाधिक पातके केली. ते परमेश्वराच्या बाबतीत अप्रमाणिक झाले. इतर देशांची अमंगळ कृत्यांची उदाहरणे त्यांनी समोर ठेवली. या प्रमुखांनी यरूशलेमामधल्या परमेश्वराने पवित्र केलेल्या मंदिराची धूळधान केली.


मोशेने पाहिले की अहरोनाने लोकांवरचे नियंत्रण ढिले केले त्यामुळे ते बेभान होत गेले आणि त्यांच्या मूर्खपणाच्या आचरणाचा तमाशा त्यांच्या शत्रूंनी पाहिला.


तुमचे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार आहेत; प्रत्येकाला लाच घेणे प्रिय आणि नजराण्यांच्या मागे धावणे आवडते. ते अनाथांचे रक्षण करीत नाहीत किंवा विधवांची कायदेशीर दयेची बाजूही घेत नाहीत.


“कारण फार वर्षांपूर्वी तुझे जोखड मोडले आणि तुझी बंधने तोडली. तरी तू म्हणालीस, ‘मी तुझी सेवा करणार नाही.’ तर प्रत्येक उंच टेकडीवरील अथवा प्रत्येक हिरव्या झाडाखालील तू व्यभिचारीणीप्रमाणे वाकलीस.


जे तुम्ही या पिढीतले आहा, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. इस्राएलाच्या लोकांस मी वाळवंटासारखा आहे का? किंवा काळोख प्रदेशासारखा त्यांना आहे काय? “आम्ही सभोवती भटकंती करू. आम्ही तुझ्याकडे येणार नाही.” ते असे का म्हणतात?


तुझे सर्व प्रियकर तुला विसरले आहेत. ते तुला शोधत नाहीत, कारण तुझ्या पुष्कळ अन्यायामुळे आणि अगणित पापांमुळे, मी तुला शत्रूप्रमाणे जखम करून आणि क्रूर धन्याप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे.


“कारण त्यांच्यातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ते सर्व अप्रामाणिक मिळकतीचा लोभ धरतात. भविष्यवाद्यांपासून ते याजकापर्यंत, त्यांच्यातील प्रत्येकजण फसवे काम करतो.


आकाशातील करकोचीसुद्धा वेळेची योग्य जाणीव असते. पारवे, निळवी व सारस ह्यांना आपल्या येण्याचा समय माहीत आहे पण माझ्या लोकांस, परमेश्वराचे वचन माहीत नाही.


कारण ते त्यांच्या जिभेने खोटे बाण सोडतात, पण ते या पृथ्वीवर विश्वासूपणात मोठे नाहीत. ते एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात. ते मला ओळखत नाही, परमेश्वर असे म्हणातो.


परमेश्वर देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, हे लोक पापाची योजना करणारे आहेत, आणि हे शहरात दुष्ट योजना योजीतात.


शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानाच्या गायींनो, जे तुम्ही गरिबांवर जुलूम करता, जे तुम्ही गरजवंतांना ठेचता, जे तुम्ही आपल्या नवऱ्यास असे म्हणता, “आण आणि आम्ही पीऊ.” ते तुम्ही हे वचन ऐका.


जे सीयोनमध्ये आरामात आहेत त्यांना, आणि जे शोमरोनाच्या पर्वतावर सुरक्षीत आहेत त्यांना हायहाय, जे राष्ट्रांतील प्रसिद्ध लोक आहेत, ज्यांच्याकडे इस्राएलाचे घराणे धाव घेते त्यांना, हायहाय.


तुझे अधिकारी लाच घेण्यासाठी न्याय करतात, आणि तिचे याजक मोबदल्यासाठी शिकवण देतात. आणि तुझे भविष्य बघणारे पैशासाठी भविष्य बघतात. तरीही ते परमेश्वरावर अवलंबून राहतात व म्हणतात, “परमेश्वर आम्हाबरोबर नाही काय? आम्हांवर अनिष्ट येणार नाही.”


कारण याजकांच्या ओठांनी ज्ञान राखावे, आणि लोकांनी त्याच्या मुखाद्वारे शिक्षण शोधावे, कारण तो सेनाधीश परमेश्वराचा दूत असा आहे.”


तो दुःखी झाला आहे हे जेव्हा येशूने पाहिले तेव्हा तो लोकांस म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे!


त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ‘ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan