Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तू आपल्या सामर्थ्याबद्दल का गर्व करते? हे अविश्वासू कन्ये, तुझे सामर्थ्य दूर वाहून जाईल, तू आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवते. तू म्हणते, माझ्याविरूद्ध कोण येईल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तू खोर्‍यांचा, आपल्या सुपीक खोर्‍यांचा का अभिमान बाळगतेस? अगे मला सोडून जाणार्‍या कन्ये, तू आपल्या निधींवर भिस्त ठेवून म्हणालीस, ‘माझ्यावर कोण चालून येणार?’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तुझ्या खोर्‍यांचा तू गर्व का करतेस, सुपीक खोर्‍यांची तू बढाई का मारते? हे अमोन्यांच्या अविश्वासू कुमारिके, तुझ्या संपत्तीवर भरवसा करून तू म्हणतेस, माझ्यावर कोण हल्ला करू शकतो?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:4
18 Iomraidhean Croise  

जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, आणि आपल्या धनाच्या विपुलतेविषयी बढाई मारतात,


पाहा, या मनुष्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, पण आपल्या विपुल संपत्तीवर भरवसा ठेवला, आणि आपल्या दुष्टपणात स्वतःला पक्के केले.


दडपशाहीवर आणि चोरीवर भरवसा ठेवू नका; आणि संपत्तित निरुपयोगी आशा ठेवू नका;


श्रीमंताची संपत्ती हे त्याचे बळकट नगर आहे; गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात होतो.


खोऱ्यात आणि सपाट जागेतील खडकात राहणाऱ्या, पाहा! परमेश्वर असे म्हणतो, मी तुझ्याविरूद्ध आहे. जे तुम्ही असे म्हणता, आमच्यावर कोण हल्ला करेल? कोणी आमच्या भक्कम नगरीत येणार?


अविश्वासू लोकहो, परत या. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी तुमचा पती आहे. मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे असे मी घेईन, आणि तुम्हास सियोनला आणीन.


विश्वासहीन मुली, तू किती वेळ सतत हेलकावे घेशील? कारण परमेश्वराने पृथ्वीवर काहीतरी नवे निर्माण केले आहे. स्त्री तिच्या रक्षणासाठी बलवान पुरुषाला घेरील.


कारण तू आपल्या कर्मावर आणि संपत्ती यावर भाव ठेवला आहे, म्हणून तुही पकडला जाशील. मग कमोश आपले याजक आणि पुढाऱ्यांसह बंदिवासात जाईल.


जी तू खडकाच्या कपाऱ्यांमध्ये राहतेस व डोंगरांचा माथा धरून राहतेस त्या तुझ्या भयंकरपणाने व तुझ्या हृदयाच्या गर्वाने तुला फसविले आहे. जरी तू गरुडाप्रमाणे उंच घरटे बांधलेस तरी तेथून मी तुला खाली आणीन. असे परमेश्वराचे म्हणणे आहे.


पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. ते त्यांच्या दुष्ट अंतःकरणाच्या, त्यांच्या स्वतःच्या हट्टी योजनांनुसार जगले. म्हणून ते पुढे येण्याऐवजी मागे गेले.


परमेश्वर म्हणतो, “शहाण्यांनी त्यांच्या शहाणपणाबद्दल, बलवानांनी त्यांच्या बळाबद्दल व श्रीमंतांनी त्यांच्या पैशाबद्दल अभिमान बाळगू नये.”


कारण इस्राएल हट्टी कालवडी सारखा हट्टी वागला आहे. मग परमेश्वर त्यास कोकरे जसे कुरणात चरतात तसा गायरानात कसा आणणार?


या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी.


तिने स्वतःला जेवढे गौरव व ऐषोआराम दिला, तितक्या प्रमाणात तिला छळ आणि दुःख द्या; कारण ती स्वतःच्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही, मी दुःख बघणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan