Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 अम्मोनी लोकांविषयी परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएली लोकांस मुले नाहीत का? इस्राएलात कोणीही वारीस नाही काय? तर मिलकोमने गाद ताब्यात का घेतो आणि त्याचे लोक त्याच्या नगरात का राहतात?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अम्मोनी लोकांविषयी : परमेश्वर म्हणतो, “काय? इस्राएलास कोणी पुत्र, कोणी वारस नाही काय? तर मिलकोम दैवताने1 गाद का घेतले? त्याचे लोक गादाच्या नगरांतून का वस्ती करून आहेत?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 अम्मोनी लोकांविषयी: याहवेह असे म्हणतात: “इस्राएलला पुत्र नाहीत काय? इस्राएलला वारस नाहीत काय? अम्मोनी राजाने गादचा ताबा का घेतला आहे? त्याचे लोक त्यांच्या नगरात का राहत आहेत?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:1
32 Iomraidhean Croise  

धाकट्या मुलीलाही मुलगा झाला; तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी लोक त्यांचा हा मूळ पुरुष.


यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेश त्याने जिंकला गाद, रऊबेन आणि मनश्शे यांच्या कुटुंबांच्या ताब्यातील प्रदेशासकट सगळा गिलाद त्यामध्ये आला. तसेच आर्णोन खोऱ्यातील अरोएर पासून गिलाद आणि बाशानपर्यंतचा प्रदेश हजाएलने जिंकला.


यहोयाकीमविरुध्द परमेश्वराने खास्दी, अरामी, मवाबी आणि अम्मोनी लोकांच्या टोळ्या पाठवल्या. आपल्या संदेष्ट्यांकरवी परमेश्वराने जे घडेल म्हणून सांगितले होते आणि त्याप्रमाणेच घडत होते. यहूदाच्या संहारासाठी या टोळ्या होत्या.


यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनी लोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटावर चालून आले.


अम्मोनी आणि मवाबी लोक सेईर पर्वतातल्या लोकांशी लढू लागले. अम्मोन्यांनी आणि मवाब्यांनी त्यांचा पुरता संहार केला. सेईरातल्या लोकांचा बीमोड केल्यानंतर त्यांनी एकमेकांचा नाश केला.


पण आम्ही पुन्हा बांधकाम करत असल्याची खबर होरोनाचा सनबल्लट, अम्मोनी अधिकारी तोबीया आणि अरबी गेशेम यांना लागली तेव्हा त्यांनी अगदी नीच पातळीवर जाऊन आमचा उपहास केला. आणि ते म्हणाले, “हे काय करताय तुम्ही? राजाविरुध्द बंड करणार आहात का?”


पण जेव्हा सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरूशलेमेच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले.


गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलिष्टी आणि सोरकर हे ते आहेत.


जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले, तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे. त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे.


परमेश्वर माझ्या सर्व शेजाऱ्यांविरूद्ध असे म्हणतो. जे वतन मी आपल्या इस्राएल लोकांस वतन म्हणून दिले त्यास जे दुष्ट शेजारी हात लावतात, पाहा! त्यांना मी त्याच्या भूमीतून उपटून काढीन आणि त्यांच्यामधून यहूदाचे घराणे उपटून काढीन.


आणि अदोम, मवाब व अम्मोन यामधील राजांनाही द्राक्षरस प्यायला लावले.


म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, या देशाविरूद्ध आणि त्यातील सर्व राहणाऱ्यांविरूद्ध, तुझ्या भोवती असणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध बोलावून घेईन. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी त्यांना नाश करण्यासाठी ठेवीण. आणि त्यांना विस्मय व फूत्कार व सर्व काळ ओसाड असे करीन.


मग यरूशलेमेला, यहूदाचा राजा सिद्कीया याच्याकडे जे दूत येतात त्यांच्या हातून अदोमाच्या राजाकडे व मवाबाच्या राजाकडे, अम्मोन लोकांच्या राज्याकडे, सोराच्या राजाकडे, सीदोनाच्या राजाकडे ती पाठव.


मवाबाविषयी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलांचा देव, असे म्हणतोः “नबोला हायहाय, कारण ते उध्वस्त झाले आहे. किर्या-थाईम काबीज केले गेले आहे आणि त्याची मानहानी झाली आहे. तिचे किल्ले पाडण्यात आणि अप्रतिष्ठीत केले गेले आहेत.


दिमिष्काविषयीः हमाथ व अर्पद लज्जित होतील, कारण त्यांनी अरिष्टाची बातमी ऐकली आहे. ते नाहीसे झाले आहेत! ते समुद्रासारखे खवळले आहेत, ते शांत होऊ शकत नाही.


केदाराविषयी व हासोराची राज्ये, परमेश्वर नबुखद्नेस्सरास हे म्हणत आहे (आता बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर या ठिकणी हल्ला करण्यास जाणार होता) “उठा आणि केदारावर हल्ला करा व पूर्वेच्या त्या लोकांचा नाश करा.


अदोमाविषयी, सेनाधीश परमेश्वर हे म्हणतो, “तेमानात आता काही ज्ञान नाही काय? ज्या कोणाला गोष्टी समजतात त्यांचे चांगले सल्ले अदृश्य झाले आहेत काय? त्यांचे ज्ञान दूर गेले आहे का?


तू पवित्रते बद्दल अनादर दाखवला आणि दुष्ट इस्राएलचे शास्ते त्यांच्यावर शासन करण्याचा दिवस येत आहे, त्याने केलेल्या अपराधांचा समय संपला आहे.


नंतर परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले की,


जे घरावर स्वर्गातल्या सैन्यांचे भजन करतात ते, जे आणि परमेश्वराचे भजन करतात व त्याची शपथ घेतात व आपल्या मिल्कोमाची ही शपथ वाहतात,


गाद वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;


तेथे अम्मोनी लोक भेटतील. त्यांना उपद्रव देऊ नको. त्यांच्याशी युध्द करू नको. त्यांच्या जमिनीतील वाटा मी तुला देणार नाही. कारण ते लोटाचे वंशज असून त्यांना मी ती वतन दिली आहे.”


अम्मोनी आणि मवाबी यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये व त्यांच्या पुढच्या दहा पिढ्यांनीही इस्राएलांबरोबर सभेत सामील होऊ नये.


कारण तुमच्या मिसरपासूनच्या प्रवासात तुम्हास अन्नपाणी देण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच अराम नईराईम येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला पैसे देऊन त्यांनी त्यास तुम्हास शाप द्यायला लावले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan