Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 करोयोथ काबीज झाले आहे आणि त्यांचे बालेकिल्ले जप्त झाले आहेत. कारण त्या दिवशी मवाबी सैनिकांचे हृदय, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 करीयोथ हस्तगत झाले आहे, त्याचे दुर्ग सर केले आहेत; त्या दिवशी मवाबाच्या वीरांचे मन वेणा देणार्‍या स्त्रीच्या हृदयासारखे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 करीयोथ पडले आहेत, व तेथील दुर्गमस्थाने जिंकून घेतली आहेत. प्रसूती वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्त्रियांच्या हृदयाप्रमाणे मोआबच्या योद्ध्यांचे हृदय होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:41
16 Iomraidhean Croise  

ते अगदी घाबरतील; प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेणा व वेदना यांनी त्यांना घेरले आहे. ते विस्मयाने एकमेकांकडे पाहतील; त्यांची मुखे ज्वालेच्या मुखांसारखी होतील.


यास्तव माझ्या कंबरेत वेदना भरल्या आहेत, प्रसुती वेदनेप्रमाणे तडफडणाऱ्या स्त्री प्रमाणे त्या वेदनांनी मला पकडले आहे. जे मी ऐकले त्यामुळे मी खाली वाकलो आहे, जे मी पाहिले त्यामुळे मी विचलीत झालो.


विचारा व पाहा जर पुरुष बालकाला जन्म देईल. प्रत्येक तरुण पुरुषाचा हात प्रसवणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याच्या कमरेवर दिला आहे हे मी का पाहत आहे? त्या सर्वांची चेहरे फिक्के का पडली आहेत?


त्यामुळे मी दुःखाचा आवाज ऐकतो आहे, पहिल्या बाळंतपणाच्या वेळेला स्त्री ज्याप्रमाणे किंकाळी फोडते, तसाच सियोनकन्येचा आवाज मी ऐकला आहे. ती श्वासाकरता धडपडत आहे, ती आपले हात पसरत आहे, “मला हाय हाय! कारण माझ्या घातक्यांमुळे माझा जीव कंटाळला आहे!”


“आणि परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजांचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे हृदय मरून जाईल, याजक घाबरतील आणि संदेष्टे भयभीत होतील.”


करोयोथ, बस्रा व मवाब देशामधील दूरची व जवळची नगरे यांवर न्यायनिवाडा आला आहे.


पाहा, कोणीतरी गरुडासारखा हल्ला करील आणि खाली झडप घालील व बस्रावर आपले पंख पसरेल. मग त्या दिवशी, अदोमाच्या सैनिकांचे हृदय प्रसूती वेदना होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल.


दिमिष्क फार दुबळे झाले आहे. ती पळून जाण्यास माघारी फिरली आहे. दहशतीने तिला वेढले आहे. दुःखाने तिला घेरले आहे, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेदना होत आहेत.


त्यांच्या घोड्याविरूद्ध, त्यांच्या रथावर आणि बाबेलाच्यामध्ये जे कोणी लोक राहतात त्या सर्वांवर तलवार आली आहे. ते स्त्रियासारखे असे होतील. तलवार तिच्या भांडारावर आली आहे, आणि ती लुटली जाईल.


बाबेलाच्या राजाने त्यांचे वर्तमान ऐकले आहे आणि त्याचे हात विपत्तीने गळाले आहेत. प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्यास वेदनेने वेढले आहे.”


बाबेलात सैनिक लढाई करायचे थांबले आहेत. ते त्यांच्या बालेकिल्ल्यात राहत आहेत. त्यांची शक्ती संपली आहे; ते स्त्रिया असे झाले आहेत. तिची घरे पेटवली आहेत, तिच्या वेशीच्या दारांचे अडसर मोडले आहेत.


त्यांच्याबद्दल आम्ही बातमी ऐकली आहे. दुःखात आमचे हात कोलमडले आहेत. प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे आमची स्थिती झाली आहे.


म्हणून मी मवाबावर अग्नी पाठवीन, आणि तो करोयोथचे किल्ले खाऊन टाकील. आणि मवाब गोंधळात, आरडाओरड करत आणि रणशिंगाचा आवाज होत असता मरेल.


“शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होईल आणि ते निभावणारच नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan