Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 याकरीता परमेश्वर असे म्हणतो, “पाहा असे दिवस येत आहे की, मी त्याच्याकडे द्राक्षरस ओतणारे पाठवीन, तेव्हा ते त्यास ओतून टाकतील आणि त्याची पात्रे रिकामी करतील व त्यांचे बुधले तुकडे तुकडे करतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 ह्यामुळे परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की द्राक्षारसपात्रांची उलथापालथ करणार्‍यांना मी त्याच्याकडे पाठवीन; ते त्याची उलथापालथ करतील, त्याच्या घागरी फोडून टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 परंतु याहवेह म्हणतात, लवकरच असे दिवस येत आहेत, मी तिला बुधल्यातून ओतणारी माणसे पाठवेन, ते तिला या पात्रातून ओतून बाहेर टाकतील; ते तिचे बुधले रिकामी करतील व नंतर तिची पात्रे फोडून टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:12
14 Iomraidhean Croise  

लोखंडी दंडाने तू त्यांना तोडशील, कुंभाराच्या भांड्यासारखा तू त्यांना फोडशील.


कारण विखरलेल्या घरट्याप्रमाणे, भटकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे, मवाबाच्या स्त्रिया आर्णोन नदीच्या उताराजवळ भटकतील.


कुंभाराची मडकी फोडावी तसे तो ते फोडून त्याचे तुकडे करील, तो त्यास सोडणार नाही. आणि त्याचे तुकडे चुलीतून विस्तव घ्यायला किंवा डबक्यातून पाणी उपसायला खापरही ठेवणार नाही.”


त्यांचे थोरजन त्यांच्या चाकरांना पाण्यासाठी पाठवतात, ते सर्व अयशस्वी परत येतात, म्हणून ते लज्जित व फजीत होऊन आपले चेहरे झाकून घेतात.


मग जे लोक तुझ्या सोबत होते, त्यांच्या देखत तू मडके फोड.


मेंढपाळांनो विलाप करा आणि मदतीसाठी रडा. कळपातील धन्यांनो जमिनीवर लोळा. कारण ही तुला मारल्या जाण्याचा आणि विखरण्याचा दिवस आला आहे. तुम्ही फुटक्या मडक्याच्या तुकड्याप्रमाणे सगळीकडे पडाल.


म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, या देशाविरूद्ध आणि त्यातील सर्व राहणाऱ्यांविरूद्ध, तुझ्या भोवती असणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध बोलावून घेईन. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी त्यांना नाश करण्यासाठी ठेवीण. आणि त्यांना विस्मय व फूत्कार व सर्व काळ ओसाड असे करीन.


मवाब लहानपणापासून सुरक्षित आहे. तो त्याच्या द्राक्षरसासारखा आहे त्यास या पात्रातून त्या पात्रात कधीच ओतले नाही. तो बंदिवासात कधी गेला नाही. म्हणून त्याची चव जितकी चांगली तितकी कायम आहे, आणि त्याचा वास न बदलता टिकून आहे.”


मग जसे इस्राएलाचे घराणे आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल त्यासंबंधी लज्जित झाला तसा मवाब कमोशाविषयी लज्जित होईल.


मवाब उजाड होईल आणि त्याच्या नगरावर हल्ला होईल. कारण त्याचे उत्तम तरुण वधाच्या जागी खाली उतरून गेले आहेत.” हे राजाचे सांगणे आहे, त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे.


मवाबामध्ये प्रत्येक घराच्या धाब्यावर आणि चौकात, तेथे सर्वत्र शोक होत आहे. कारण नकोसा असलेल्या पात्राप्रमाणे मी मवाबाचा नाश केला आहे, असे परमेश्वर म्हणतो.


कारण नाश करणारा प्रत्येक नगरात येईल. एकही नगर सुटणार नाही. परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे दरीचा नाश होईल व पठारेही उध्वस्त होतील.


कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर्य इस्राएलाच्या ऐश्वर्याप्रमाणेच पुन्हा प्राप्त करून देईल. जरी लुटारूनी त्यास रिक्त केले आहे आणि त्यांच्या द्राक्षवेलींचा नाश केला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan