Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मवाब लहानपणापासून सुरक्षित आहे. तो त्याच्या द्राक्षरसासारखा आहे त्यास या पात्रातून त्या पात्रात कधीच ओतले नाही. तो बंदिवासात कधी गेला नाही. म्हणून त्याची चव जितकी चांगली तितकी कायम आहे, आणि त्याचा वास न बदलता टिकून आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मवाब लहानपणापासून सुखात आहे. स्थिर राहिल्यामुळे गाळ खाली बसलेल्या द्राक्षारसासारखा तो आहे; त्याला ह्या पात्रातून त्या पात्रात ओतले नाही, तो बंदिवान होऊन गेला नाही, म्हणून त्याची रुची तशीच कायम आहे; त्याच्या वासात काही फरक झालेला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “अगदी बालपणापासून मोआब सुखात राहिली. गाळावर स्थिर वसलेल्या द्राक्षारसाप्रमाणे, तरी तिला या पात्रातून त्या पात्रात ओतले गेले नाही— ती बंदिवासात गेलेली नाही. म्हणून ती पूर्ववत चवदारच आहे, आणि तिचा सुवासही बदललेला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:11
16 Iomraidhean Croise  

सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा, आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.


देव, जो पुरातन काळापासून आहे, तो ऐकणार आणि त्यांना प्रतिसाद देणार, (सेला) ते मनुष्ये बदलत नाहीत; ती देवाला भीत नाहीत.


कारण जो कोणी भोळा जेव्हा दूर निघून जाईल त्याचा नाश होईल; आणि मूर्खाचे स्वस्थपण त्याचा नाश करील.


आम्ही मवाबाच्या गर्वाविषयी, त्यांच्या उद्धटपणाविषयी, त्याची फुशारकी व संतापाविषयी ऐकले आहे. पण त्यांची फुशारकी निरर्थक आहेत.


पृथ्वी पूर्णपणे उध्वस्त केली जाईल आणि नागाविली जाईल, कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे.


तेव्हा या सीयोन डोंगरावर म्हणजेच येरुशलेमेत सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकांस मेजवानी तेथे उत्तमोत्तम चवदार पदार्थ असतील मांसाचे मज्ज सहीत तुकडे असतील, तसेच चवदार द्राक्षमध देण्यात येईल ते सर्व खाऊन पिऊन तृप्त होतील.


तू सुरक्षित असता मी तुझ्याशी बोललो, पण तू म्हणालीस, मी ऐकणार नाही. तू तरुण असल्यापासून अशीच वागत आलीस. कारण तू माझी वाणी ऐकली नाहीस.


याकरीता परमेश्वर असे म्हणतो, “पाहा असे दिवस येत आहे की, मी त्याच्याकडे द्राक्षरस ओतणारे पाठवीन, तेव्हा ते त्यास ओतून टाकतील आणि त्याची पात्रे रिकामी करतील व त्यांचे बुधले तुकडे तुकडे करतील.”


“आम्ही मवाबाचा गर्व ऐकला आहे. त्याचा उद्धटपणा, त्याचा गर्विष्ठपणा, अहंकार, अभिमान आणि त्याच्या हृदयातली उन्मत्तता ही आम्ही ऐकली आहे.”


यरूशलेम म्हणते, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने मला खाऊन टाकले आहे. त्याने मला निचरून कोरडे केले आहे आणि मला रिकामे पात्र करून ठेवले आहे. त्याने मला अजगराप्रमाणे गिळून टाकले आहे.


निनवे रिकामी आणि ओसाड झाली आहे. तिच्या हृदयाचे पाणी झाले आहे, पाय लटपटत आहेत, आणि प्रत्येकजण यातनेत आहे; त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडले आहेत.


कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर्य इस्राएलाच्या ऐश्वर्याप्रमाणेच पुन्हा प्राप्त करून देईल. जरी लुटारूनी त्यास रिक्त केले आहे आणि त्यांच्या द्राक्षवेलींचा नाश केला आहे.


“तेव्हा मी एक दिवा घेऊन यरूशलेमेतून शोध करीन, जे खाली गाळ असलेल्या द्राक्षरसासारखे स्वस्थ बसले आहेत, त्यांना मी शिक्षा करीन. ते आपल्या मनात असे बोलतात, ‘परमेश्वर काहीही चांगले किंवा वाईट करणार नाही.’


आणि स्वस्थ बसलेल्या राष्ट्रांवर माझा राग पेटला आहे; कारण मी तर थोडासाच रागावलो होतो, पण या राष्ट्रांनी त्यांच्या दुःखात आणखी भर घालण्याची मदत केली.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan