Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 47:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कारण सर्व पलिष्ट्यांच्या नाशाची वेळ आली आहे, सोर आणि सीदोन यांतून वाचलेला प्रत्येक जो कोणी त्यांचे सहाय्य करणारा त्याचा नाश होईल. कारण परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफतोराच्या द्विपातील वाचलेल्यांचाही नाश करणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 पलिष्ट्यांच्या नाशाचा दिवस येत आहे; सोर व सीदोन ह्यांना साहाय्य करणारा जो कोणी उरला असेल त्याचा उच्छेद होईल; परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफतोर द्वीपांतील अवशिष्ट लोकांचा नाश करणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण सर्व पलिष्टी लोकांचा नाश करण्यास आणि सर्व अवषेशांना बाहेर काढण्याचा, सोर व सीदोन येथील लोकांना मदत करण्याचा समय आला आहे. याहवेह पलिष्टी लोकांचा नाश करणार आहेत, कफतोरहून आलेल्या रहिवाशांचा निःपात करणार आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 47:4
27 Iomraidhean Croise  

कनान हा त्याचा प्रथम जन्मलेला मुलगा सीदोन आणि हेथ यांचा,


पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला.


देव त्याचा क्रोध काबूत ठेवणार नाही. राहाबाचे मदतनीससुध्दा त्यास घाबरतात.


प्रभू त्यास हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे, हे तो पाहत आहे.


न्यायाच्या दिवशी जेव्हा विध्वंस दुरून येईल तेव्हा तुम्ही काय कराल? मदतीकरिता कोणाकडे पळाल आणि तुमची संपत्ती कोठे ठेवाल?


वेशीनो मोठ्याने आक्रोश करा; नगरांनो आरोळी करा. पलिष्टी तू सर्व वितळून जाशील. कारण उत्तरेकडून धुराचे ढग येत आहे आणि तेथे त्याच्या सैन्यात मागे राहणारा कोणी नाही.


त्या दिवशी या समुद्रकिनाऱ्यावरील राहणारे लोक म्हणतील, “खरोखर, हा आमच्या आशेचा स्त्रोत, ज्याच्याकडे साहाय्यासाठी व अश्शूराच्या राजापासून रक्षण करण्यासाठी आम्ही पळालो तो असा आहे, तर आम्ही कसे सुटून जाऊ?”


अश्शूर तलवारीने पडेल; जी त्याचा नाश करील ती सत्ताधारी मनुष्याची तलवार नव्हे. तो तलवारीपासून पळून जाईल आणि त्यातील तरूणांना पकडून गुलाम केले जाईल.


कारण तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर याने आपल्या शत्रूंचा सूड घ्यावा म्हणून तो दिवस त्यास सूड घेण्याचा दिवस होईल. तेव्हा तलवार खाऊन तृप्त होईल. ती त्यांचे भरपूर रक्त पिईल. कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वरास फरात नदीच्या काठी उत्तरेच्या देशात यज्ञ करायचा आहे.


तू पवित्रते बद्दल अनादर दाखवला आणि दुष्ट इस्राएलचे शास्ते त्यांच्यावर शासन करण्याचा दिवस येत आहे, त्याने केलेल्या अपराधांचा समय संपला आहे.


ते तुझ्यापुढे कपटाचा संदेश देत असता, तुला खोटा शकुन सांगत असता, ज्या जखमी झालेल्या पातक्यांचा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे त्यांच्या कापलेल्या मानांवर ती तलवार तुला लोळवील.


म्हणून, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी पलिष्ट्यांविरूद्ध आपला हात उगारीन आणि करेथी लोकांस कापून टाकीन आणि जे कोणी समुद्रकिनाऱ्यावरील अवशिष्ट राहिलेल्यांचा नाश करीन.


जेव्हा मी मिसरामध्ये आग लावीन आणि तिच्या सर्व सहाय्यकांचा नाश करीन. तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.


वेळ, दिवस समीप येत आहे, हर्ष खरेदी न करो आणि दुःख विक्री न करो, तोपर्यंत माझा क्रोध सर्व बहुसंख्य लोकांवर रहाणार आहे.


शासन करण्याचे दिवस येत आहेत, प्रतिफळाचे दिवस येत आहेत, इस्राएल हे जाणणार, तुझ्या महापातकामुळे, वैरभावामुळे आता संदेष्टा मूर्ख बनला आहे.


परमेश्वर असे म्हणतो: “इस्राएलाचे लोकहो, तुम्ही मला कूशी लोकांप्रमाणे नाही काय? मी इस्राएलाला मिसर देशातून पलिष्ट्यांना कफतोरमधून आणि अरामींना कीर मधून आणले नाही काय?”


ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत.


त्याचप्रमाणे अव्वी लोक गज्जापर्यंतच्या खेड्यात वस्ती करून होते, त्यांचा कफतोराहून आलेल्या कफतोरी लोकांनी उच्छेद करून त्यांची भूमी बळकावली आणि आता ते तेथे राहत आहेत.


तेव्हा रऊबेन वंश, गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, त्या फिनहास याजक व त्याच्याबरोबर जे असलेले अधिकारी म्हणजे इस्राएलाच्या प्रत्येक वंशाचे जे प्रमुख पुरुष होते, तेव्हा त्यांना बरे वाटले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan