Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 45:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तू म्हणालास, मला हाय हाय, कारण परमेश्वराने माझ्या क्लेशात यातनेची भर घातली आहे. माझ्या कण्हण्याने मी थकलो आहे. माझ्या दु:खाने मी हैराण झालो आहे. मला विश्रांती मिळत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तू म्हणालास, ‘हायहाय! परमेश्वराने माझ्या क्लेशात दुःखाची भर घातली आहे. मी कण्हून कण्हून थकलो आहे, मला काही चैन पडत नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तू म्हणालास, ‘मला धिक्कार असो! माझ्या क्लेशात याहवेहने दुःखाची भर घातली आहे; मी उसासे टाकून थकून गेलो आहे आणि मला काही विश्रांती मिळत नाही.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 45:3
28 Iomraidhean Croise  

“तरीही मी आज कडवटपणे तक्रार करीन? कारण माझा त्रास माझ्या विलापाहून भारी आहे.


मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.


जीवंताच्या भूमीत, जर परमेश्वराचा चांगुलपणा पाहायला मी विश्वास केला नसता, तर मी कधीच माझी आशा सोडून दिली असती.


तुझ्या धबधब्याच्या अवाजाने ओघ ओघाला हाक मारतो. तुझ्या सर्व लहरी आणि मोठ्या लाटा माझ्यावरून गेल्या आहेत.


मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो.


शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत.


माझ्या रडण्याने मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; माझ्या देवाची वाट पाहता माझे डोळे शिणले आहेत.


जर तुम्ही संकटाच्या दिवशी तुमचा भित्रेपणा दाखवला तर, मग तुझी शक्ती थोडीच आहे.


हे बारूखा, “परमेश्वर, इस्राएलाचा देव, तुला असे म्हणतो,


माझ्या दु:खण्याला काही अंत नाही आणि माझे अंत: करण अस्वस्थ आहे.


जर माझे मस्तक पाण्याने भरलेले असते आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांच्या कन्येसाठी अहोरात्र रडलो असतो तर किती बरे झाले असते.


त्याने वरून माझ्या हाडात अग्नी पाठवला आहे, आणि तो त्याजवर प्रबल होतो. त्याने माझ्या पायांसाठी जाळे पसरवीले आहे आणि मला मागे वळवले आहे. त्याने मला सतत ओसाड व दुर्बल केले आहे.


त्यांची सर्व दुष्टाई तुझ्यासमोर येवो, माझ्या पापांमुळे तू माझ्याशी जसा वागलास तसाच तू त्यांच्याशी वाग. कारण माझे कण्हणे पुष्कळ आहे आणि माझे हृदय दुर्बल झाले आहे.”


जरी त्याने दुःख दिले तरी तो आपल्या दयेच्या विपुलतेनूसार करुणा करील.


म्हणून, आमच्यावर देवाची दया झाल्यामुळे ही सेवा आम्हास देण्यात आली आहे, म्हणून आम्ही खचत नाही.


म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील देहपण नाश पावत आहे, तरी आमचे अंतर्याम हे दिवसानुदिवस नवीन होत आहे.


आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण खचलो नाही, तर नियोजित समयी कापणी करू.


तुम्ही तर बंधूंनो, बरे करतांना खचू नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan