यिर्मया 44:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण तुम्ही जेथे राहण्यास गेला आहात त्या मिसर देशात दुसऱ्या देवाला धूप जाळून तुमच्या हातच्या कृत्यांनी मूर्तीपूजा करुन तुम्ही मला दुःखवता. तुम्ही तेथे जात आहात याकरिता की तुमचा नाश व्हावा आणि शापीत व्हावे व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांमध्ये तुमची निंदा व्हावी. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण तुम्ही ज्या मिसर देशात काही दिवस राहण्यास गेला आहात त्यात अन्य देवांना धूप जाळल्यामुळे तुम्ही आपला उच्छेद करून घ्याल व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांत शापास व अप्रतिष्ठेस पात्र व्हाल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 इथे तुम्ही बनविलेल्या मूर्ती केल्या. इजिप्तमध्ये, जिथे तुम्ही निवास करण्यास आला आहात, तेथील इतर दैवतांना धूप जाळून, तुम्ही माझा क्रोध का भडकावित आहात व तुमचा पूर्ण नाश करावयाला मला का लावत आहात? तुम्ही स्वतःस पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शाप व त्यांच्या उपहासाचा विषय बनवित आहात. Faic an caibideil |
कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, जसा माझा क्रोध व माझा संताप यरूशलेमेवरचा माझा राग व्यक्त करून दाखविला. यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांवर ओतला आहे तसा माझा क्रोध जर तुम्ही मिसरमध्ये जाल तेव्हा तुम्हावर ओतला जाईल. तुम्ही शापाची वस्तू व्हाल व भयचकीत, शाप बोलण्याचा विषय आणि काहीतरी निंदनीय व्हाल. आणि हे ठिकाण तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही.