Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 44:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पण त्यांनी ऐकले नाही; त्यांनी दुसऱ्या देवाला धूप जाळणाऱ्या दुष्कृत्यापासून वळण्यास किंवा त्यांनी लक्ष देण्याचे नाकारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तरीपण अन्य देवांना धूप जाळण्याचे सोडून देऊन आपल्या दुष्टतेपासून वळण्याचे ते ऐकेनात व आपला कान देईनात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; आणि आपल्या कुमार्गापासून ते माघारी फिरले नाहीत व इतर दैवतांना धूप जाळण्याचे बंदही केले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 44:5
18 Iomraidhean Croise  

पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले.


अनेक वर्षे तू त्यांची गय केली. आपल्या आत्म्याने संदेष्ट्याद्वारे तू त्यांना बजावलेस. पण त्यांनी ऐकले नाही. तेव्हा त्यांना तू शेजारील देशातल्या लोकांच्या हवाली केलेस.


जर तू फक्त माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर किती बरे झाले असते! तेव्हा भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे तुझी शांती असती आणि समुद्राच्या लाटांप्रमाणे तुझे तारण असते.


कारण मला माहित होते की तुम्ही हट्टी आहात, तुमच्या मानेचे स्नायु लोखंडाप्रमाणे ताठ आणि तुझे कपाळ कांस्याचे आहे.


ते त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या पापांकडे वळले आहेत. त्यांच्या पूर्वजांनी माझे ऐकण्याचे नाकारले. त्यांनी दुसऱ्या देवांचे अनुसरण केले. त्यांची पूजा केली. इस्राएल व यहूदाच्या वंशजांनी, त्यांच्या पूर्वजांनी माझ्याशी केलेल्या, कराराचा भंग केला आहे.”


कारण यहूदा तुझ्या नगरा इतकेच तुझे देव झाले आहेत, आणि तू लज्जास्पद बाल देवाच्या वेद्या, बाल देवाच्या धूप वेद्या, यरूशलेमामधल्या रस्त्यांच्या संख्येइतक्याच केल्या आहेत.


कारण सेनाधीश परमेश्वर, ज्याने तुला लावले आहे, तो तुझ्या विरूद्ध अरिष्ट बोलला आहे. कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी कुकर्मे केली. त्यांनी ‘बाल’ देवाला यज्ञ अर्पण केले म्हणून मला राग आला.”


पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि लक्ष दिले नाही. ते दुराग्रही हृदयाचे बनले आणि आवडेल तेच त्यांनी केले. म्हणून मी त्यांना माझ्या आज्ञा पाळण्यास सांगितले, पण त्यांनी ते ऐकले नाही, म्हणून करारात उल्लेखलेल्या सर्व शापित गोष्टी मला त्यांच्याबाबत कराव्या लागल्या.”


हे दुष्ट लोक जे माझे वचन ऐकण्यास नकार देतात, जे त्यांच्या हृदयाच्या कठोरपणात चालतात, जे दुसऱ्या देवाच्या मागे त्याची उपासना करण्यास आणि त्यांच्या समोर नमन करण्यास जातात, ते या कमरबंधाप्रमाणे होतील, ज्याचा काहीच उपयोग नाही.


‘यरूशलेममधील घरे आणि यहूदातील राजांचे राजवाडे पण तोफेतप्रमाणेच होतील. कारण त्यांनी आपल्या सर्व विटाळलेल्या घराच्या छपरांवर खोट्या देवांची पूजा केली. त्यांनी ताऱ्यांना पूजले आणि दैवतांना त्यांनी पेयार्पणे केली.”


म्हणून कारेहाचा मुलगा योहानान, सर्व सैन्याचे अधिकारी व इतर सर्व लोक ह्यांनी यहूदा देशात राहण्याविषयीची परमेश्वराची वाणी ऐकली नाही.


पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. ते त्यांच्या दुष्ट अंतःकरणाच्या, त्यांच्या स्वतःच्या हट्टी योजनांनुसार जगले. म्हणून ते पुढे येण्याऐवजी मागे गेले.


तुझे दास जे संदेष्टे तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार वडिल आणि देशाचे सर्व लोक हयांच्याशी बोलले तेव्हा आम्ही ऐकले नाही.


त्यांना जेवढे बोलविले तेवढे ते माझ्यापासून दूर जात ते बआलास बली आणि मुर्तीस धूप जाळत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan