Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 44:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग मी माझे सर्व सेवक संदेष्टे वारंवार पाठवत आलो. मी त्यांना सांगण्यासाठी पाठवले, ज्यांचा मी द्वेष करतो त्या तिरस्कारणीय गोष्टी थांबवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मी तर आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना तुमच्याकडे पाठवत आलो; मोठ्या निकडीने त्यांना तुमच्याकडे पाठवून सांगत असे की, ‘ह्या अमंगळ कर्माचा मला वीट आहे; ती करू नका’.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मी माझे सेवक संदेष्टे त्यांच्याकडे वारंवार पाठविले, हे सांगण्यास, ‘ज्यांचा मला तिरस्कार वाटतो, त्या घृणास्पद गोष्टी करू नका!’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 44:4
24 Iomraidhean Croise  

त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाने लोकांस सावध करण्यासाठी मोठ्या निकडीने संदेष्टे पाठवले. आपल्या प्रजेविषयी आणि मंदिराविषयी त्याच्या मनात करुणा होती म्हणून परमेश्वर असे वागला. त्यांचा अथवा मंदिराचा नाश होऊ नये असे परमेश्वरास वाटत होते.


अनेक वर्षे तू त्यांची गय केली. आपल्या आत्म्याने संदेष्ट्याद्वारे तू त्यांना बजावलेस. पण त्यांनी ऐकले नाही. तेव्हा त्यांना तू शेजारील देशातल्या लोकांच्या हवाली केलेस.


आमचे राजे, नेते, याजक आणि पूर्वज यांनी तुझे नियमशास्त्र पाळले नाही. तुझ्या आज्ञा ऐकल्या नाहीत. तू दिलेल्या सूचनाकंडे त्यांनी दुर्लक्ष केले.


मी पहिल्याने त्याच्या त्याच्या अन्यायाची आणि पापांची फेड दुपटीने करीन, कारण माझी भूमी त्यांनी आपल्या तिरस्करणीय मूर्तींच्या आकृतींनी विटाळवीली आहे. आणि माझे वतन त्यांनी आपल्या ओंगळ मूर्ती स्थापून कलंकित केले आहे.


जर तुम्ही माझ्या सेवकांचे जे संदष्टे आहेत, ज्यांना मी तुम्हाकडे नित्याने पाठवत आलो आहे, त्यांचे ऐकले नाही.


परमेश्वर असे म्हणतो, याचे कारण हे आहे की, मी आपले सेवक संदेष्टे यांच्याद्वारे माझी वचने पाठवली, तरी त्यांनी माझे ऐकले नाही. मी वारंवार त्यांना पाठवले पण तुम्ही ऐकले नाही, असे परमेश्वर म्हणतो.


“त्यांचे तोंड फिरविण्याऐवजी त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली, जरी मी त्यांना अति उत्सुकतेने शिकविले. मी त्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला, पण त्यातील एकानेही बोध स्विकारण्यास माझे ऐकले नाही.


नंतर त्यांनी ज्या घरास माझे नाव ठेवले आहे ते अशुद्ध करण्यास त्यांच्या निंद्य गोष्टी आणून ठेवल्या.


आणि त्यांनी बआल देवाची जी उंचस्थाने हिन्नोमाच्या मुलाच्या खोऱ्यात आहेत ती त्यांनी आपली मुले व मुली यांचा मोलख देवाला होमार्पण करण्यासाठी बांधली. हे काही करण्याची आज्ञा मी त्यांना कधीच दिली नव्हती. आणि यहूदाने पाप करावे म्हणून त्यांनी किळसवाणी गोष्टी कराव्या, असे माझ्या कधीही मनातसुद्धा आले नव्हते.


इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सर्व सेवक, संदेष्टे पाठविले. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगण्यास पाठविले, प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गापासून वळा आणि चांगली कृत्ये करा. दुसऱ्या देवांना अनुसरू नका आणि त्यांची पूजा करु नका. त्याऐवजी, तुमच्या पूर्वजांना व तुम्हास जो देश दिला आहे त्यामध्ये परत माघारी या. पण या लोकांनी माझे ऐकले नाही.


म्हणून परमेश्वर, सैन्यांचा देव आणि इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “पाहा, जे सर्व अरिष्ट मी त्यांच्याविरुद्ध आणणार म्हणून मी म्हणालो आहे, ते सर्व मी यहूदावर आणि यरूशलेमेच्या राहणाऱ्यांवर आणीन, कारण मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी ऐकण्याचे नाकारले. मी त्यांना हाका मारल्या पण त्यांनी उत्तर दिले नाही.”


इस्राएलाच्या लोकांनो, तुम्हीही सर्व दुष्कृत्ये करीत होता.” परमेश्वर असे म्हणतो! मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हास बोलाविले, पण तुम्ही उत्तर दिले नाही.


ते लोक यहूदा शहरात, आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसत नाही काय?


मला संताप आणावा म्हणून मुले लाकडे गोळा करत आहेत आणि वडील सरपण पेटवत आहे. स्त्रिया आकाशाच्या राणीसाठी कणीक मळत आहे आणि इतर दैवतांना अर्पण करण्यासाठी म्हणून पेयार्पणे ओतत आहेत.


तुमच्या पूर्वजांनी मिसर सोडला त्या दिवसापासून आजवर मी माझे सेवक तुमच्याकडे पाठवले आहेत. माझे सेवक संदेष्टे आहेत. मी पुन्हा पुन्हा त्यांना तुमच्याकडे पाठवले.


असे परमेश्वर देव म्हणतो, कारण तू आपल्या वासनेची ओतणी करुण निर्लज्जता तुझ्या वेश्याकर्माने जारकर्म्यावर व मूर्तीपुढे उघडी केली, आणि तू आपल्या लेकरांचे रक्त मूर्तीला वाहीले;


आता तिच्या पावलावर पाऊल टाकून तिरस्कार करु नको; जरी या थोडक्या बाबी आहेत तरी देखील तू होती त्याहून तुझे मार्ग वाईट आहेत.


तू केलेले सर्व दुष्कर्म तुझ्यापासून दूर कर, तुझ्यासाठी नवे हृदय नवा आत्मा सिध्द केला आहे, यास्तव इस्राएलाच्या घराण्या तू का मरावे?


मग मी बघण्यासाठी गेलो, आणि पाहा! तेथे सर्व प्रकारचे सरपटणारे आणि अशुद्ध प्राणी होते, इस्राएल घराण्याच्या सर्व मूर्ती यांची चित्रे यरूशलेमेच्या भितींवर टांगलेल्या होत्या.


तुझे दास जे संदेष्टे तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार वडिल आणि देशाचे सर्व लोक हयांच्याशी बोलले तेव्हा आम्ही ऐकले नाही.


याच गोष्टी सांगण्यासाठी परमेश्वराने फार पूर्वीच या आधीच्या संदेष्ट्यांच्या द्वारे घोषीत केले होते. जेव्हा यरूशलेम ही एक भरभराट झालेली आणि लोकांनी गजबजलेली नगरी होती, यरूशलेमेच्या भोवतालच्या गावात, नेगेबला व पश्चिमेकडील डोंगरपायथ्याशी वस्ती होती. तेव्हादेखील देवाने हीच वचने सांगितली होती.”


कारण परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला. तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तीपूजेत आपल्या मार्गाने गेलात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan