Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 42:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 नंतर तेव्हा सर्व सेनाधिकारी आणि कारेहाचा मुलगा योहानान, होशायाचा मुलगा यजन्या आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक यिर्मया संदेष्ट्याकडे पोहचले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तेव्हा सैन्यांचे सर्व नायक आणि योहानान बिन कारेह व यजन्या बिन होशाया आणि लहानथोर सर्व लोक जवळ येऊन,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मग सर्व सैन्यप्रमुख म्हणजे कारेहाचा पुत्र योहानान, होशयाहचा पुत्र यजन्याह, व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व लोक

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 42:1
25 Iomraidhean Croise  

नथन्याचा मुलगा इश्माएल, कारेहाचा मुलगा यहोहानान आणि नटोफाथी तन्हुमेथाचा मुलगा सराया व माकाथीचा मुलगा याजन्या हे सैन्यातील सरदार होते. त्यांनी बाबेलाच्या राजाने गदल्याला अधिकारी केल्याचे ऐकले म्हणून ते त्यास भेटायला मिस्पा येथे आले.


माझा प्रभू म्हणतो, हे लोक, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे, असे म्हणतात ते शब्दांनी माझ्याबद्दलचा आदर व्यक्त करतात. पण त्यांची मने माझ्यापासून फार दूर आहेत. त्यांचा माझ्याबद्दलचा आदर, म्हणजे फक्त त्यांनी पाठ केलेले व मनुष्यांनी घालून दिलेले नियम आहेत.


जे तुम्ही इस्राएलाच्या नावाने ओळखले जाता, आणि जे तुम्ही यहूदाच्या शुक्राणातून जन्मले आहा, याकोबाच्या घराण्या, हे ऐक. जे तुम्ही परमेश्वराच्या नावाची शपथ वाहता आणि इस्राएलाच्या देवाला विनंती करता, पण हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करीत नाही.


म्हणून राजा सिद्कीयाने शलेम्याचा मुलगा यहूकल व मासेया याजकाचा मुलगा सफन्या ह्यांना पाठवून यिर्मया संदेष्ट्याकडे निरोप सांगितला. ते म्हणाले, “तू, आमच्यावतीने परमेश्वर आमचा देव याच्याजवळ प्रार्थना कर.”


कारेहाचा मुलगा योहानान व खेड्यापाड्याच्या प्रदेशातील सैन्याचे सर्व अधिकारी मिस्पा येथे गदल्याकडे आले.


मग ते मिस्पा येथे गदल्याकडे गेले. ती माणसे नथन्याचा मुलगा इश्माएलाची होती; कारेहाचे मुले योहानान व योनाथान; तन्हुमेथाचा मुलगा सराया; रफैची मुले नटोफाथी आणि माकाथाचा मुलगा याजन्या ते व त्यांची माणसे.


पण कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी नथन्याचा मुलगा इश्माएल यानी त्यांच्याबरोबर केलेली सर्व दुष्कृत्ये ऐकली.


नथन्याचा मुलगा इश्माएल याने अहीकामाचा मुलगा गदल्या याला जिवे मारल्यावर लोकांतले जे सर्व राहिलेले मिस्पा येथून नेले होते, जे कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी सर्वांना सोडविले. गिबोनाहून योहानाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बलवान माणसे, लढणारे माणसे, स्त्रिया व मुले आणि षंढ यांना सोडवले.


खास्द्यांच्या भीतीमुळे त्यांनी असे केले. कारण अहीकामाचा मुलगा गदल्या ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास नथन्याचा मुलगा इश्माएल याने जिवे मारले होते.


कारण परमेश्वर आमचा देव याच्याजवळ आम्हासाठी प्रार्थना करा, आणि जे काही परमेश्वर आमचा देव सांगेल ते आम्ही करू असे बोलून परमेश्वर तुमचा देव याच्याकडे मला पाठवले तेव्हा तुम्ही आपल्या जिवाविरूद्ध कपटाने वागला.


म्हणून यिर्मयाने कारेहाचा मुलगा योहानान, त्याच्याबरोबर असलेले सर्व सेनाधिकारी व लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व लोकांस बोलावले.


होशायाचा मुलगा अजऱ्या, कारेहाचा मुलगा योहानान व सर्व गर्विष्ठ लोक यिर्मयाला म्हणाले, “तू खोटे बोलत आहेस. तुम्ही तेथे मिसरात राहण्यास जाऊ नका, असे सांगण्यास परमेश्वर आमचा देव याने तुला पाठविले नाही.


कारण मिसर देशात जाऊन तेथे राहण्याचा यहूदाच्या अवशिष्टांनी निश्चय केला. मी हे यासाठी करीन की, ते सर्व मिसर देशात नष्ट होतील. तलवारीने आणि दुष्काळाने त्यांचा नायनाट होईल. लहानापासून थोरापर्यंत सर्व तलवारीने व दुष्काळाने नष्ट होतील. ते मरतील आणि अपशब्द, शाप, निंदा आणि भयानक गोष्टींचे विषय होतील.


“कारण त्यांच्यातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ते सर्व अप्रामाणिक मिळकतीचा लोभ धरतात. भविष्यवाद्यांपासून ते याजकापर्यंत, त्यांच्यातील प्रत्येकजण फसवे काम करतो.


म्हणून मी त्यांच्या स्त्रिया दुसऱ्यांना देईन. त्यांची शेते जे त्यांना ताब्यात घेतील त्यांना देईन. कारण लहानापासून तर मोठ्यांपर्यंत, सर्वजण अति लोभी आहेत. संदेष्ट्या पासून याजकापर्यंत, सर्वांनी फसवणूक केली आहे.


नंतर परमेश्वर देवाच्या घराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे देवाच्या आत्म्याने मला उचलून नेले. आणि पहा! प्रवेशद्वाराजवळ मी पंचवीस माणसे उभी असलेली पाहिली. त्यांच्यामध्ये अज्जूरचा मुलगा याजन्या आणि पलट्या मुलगा बनाया, हे लोकांचे पुढारी त्यांच्यामध्ये होते.


म्हणून ते लोक येत असतात तसे ते तुझ्याकडे येतात. आणि ते माझ्या लोकांप्रमाणे तुझ्यापुढे बसतात तुझी वचने ऐकतात, परंतु ते ती आचरीत नाहीत. जरी ते आपल्या मुखाने फार प्रीती दाखवतात तरी त्यांचे चित्त त्यांच्या लाभाच्या मागे चालत जाते.


तेव्हा इस्राएलाच्या घराण्याचे सत्तर वडील मी पाहिले त्यामध्ये याजन्या चा मुलगा शाफान हा त्यांच्यामध्ये उभा होता, प्रत्येक मनुष्याजवळ धूप जाळण्याचे भांडे होते त्यांचा सुंगध वर घेतल्या जात होता.


हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात. पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.


अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत, ते म्हणत असत, “देवाची महान शक्ती असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan