Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 41:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जी माणसे जिवे मारली त्या सर्वांची प्रेते इश्माएलाने गदल्याबरोबर त्या खड्ड्यात फेकून दिली होती हा मोठा खड्डा आसा राजाने खणला होता जेव्हा इस्राएलाचा राजा बाशा याने त्याच्यावर हल्ला केला होता. नथन्याचा मुलगा इश्माएल याने ज्यांना मारले होते त्यांनी तो भरला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 इश्माएलाने पूर्वी ज्यांना मारले होते त्यांची प्रेते त्याने गदल्याच्या बाजूला एका विहिरीत टाकली होती; ही विहीर आसा राजाने इस्राएलाचा राजा बाशा ह्याच्या भीतीने खणली होती. ही विहीर इश्माएल बिन नथन्या ह्याने प्रेतांनी भरून काढली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 वध केलेल्या लोकांचे व गदल्याहचे प्रेत नथन्याहचा पुत्र इश्माएलने ज्या विहिरीत टाकले होते, ती भली मोठी विहीर, इस्राएलचा राजा बाशा, याच्यापासून आपले संरक्षण करण्याकरिता आसा राजाने बांधली होती. नथन्याहचा पुत्र इश्माएलने ती विहीर प्रेतांनी भरून टाकली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 41:9
11 Iomraidhean Croise  

एखाद्या गुहेत किंवा निर्जन ठिकाणी ते कदाचित गेले सुध्दा असतील. त्यांनी तुमच्या लोकांवर आधी हल्ला केला तर लोक ते ऐकून म्हणतील, अबशालोमचे लोक हरत चाललेले दिसत आहेत.


पण, तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे तुझ्या कबरेतून काढून बाहेर फेकले आहे. जे तलवारीने भोसकलेले, खाचेतल्या दगडांमध्ये खाली उतरले जातात, तसे तू मृत्युने झाकला आहेस.


जग त्यांच्यासाठी लायक नव्हते ते रानांमधून, डोंगरांमधून, गुहांमधून व जमिनीमधील खंदकामधून फिरत राहिले.


तेव्हा मिद्यानाने इस्राएलावर अधिकाराने जुलूम केला; मिद्यान्यांमुळे इस्राएलाच्या लोकांनी आपल्यासाठी डोंगरातील भुयारे, गुहा व किल्ले यांचा आश्रय घेतला.


आपण अडचणीत आलो आहो हे इस्राएलांनी पाहिले. कारण लोक निराश झाले होते, तेव्हा लोक गुहा, झुडपात, खडकात, विहीरीत, व खड्यात लपले.


मग त्या दोघांनी आपणांला पलिष्ट्यांच्या ठाण्यातील मनुष्यांना प्रगट केले. पलिष्ट्यांनी म्हटले, “पाहा ज्या गुहांमध्ये इब्री लपले होते त्यातून ते निघून येत आहेत.”


जी इस्राएली माणसे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशांत लपली होती ती सर्व पलिष्टी पळत आहेत हे ऐकून लढाईत त्याच्या पाठीस लागली.


आणि तो मेंढवाड्याजवळ रस्त्यावर आला तेथे एक गुहा होती तिच्यात शौल शौचास गेला आणि दावीद व त्याची माणसे त्या गुहेच्या अगदी आतल्या भागात बसली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan