Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 41:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 शखेमातून काही माणसे, शिलोतून व शोमरोनातून ऐंशी माणसे त्यांच्या दाढ्या कापलेल्या, त्यांचे कपडे फाडलेले आणि स्वतःला जखम करून घेतलेले, परमेश्वराच्या घरात आणण्यासाठी त्यांच्या हातात अन्नार्पण व धूप होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 शखेम, शिलो व शोमरोन येथून ऐंशी माणसे आली; त्यांच्या दाढ्या मुंडलेल्या, त्यांची वस्त्रे फाडलेली, त्यांच्या अंगास घाय झालेले, व परमेश्वराच्या मंदिरात अर्पण करण्यासाठी हाती अन्नार्पणे व ऊद असलेली अशी ती आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 याहवेहच्या मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी शेखेम, शिलोह व शोमरोनात येथून ऐंशी माणसे मिस्पाहच्या रोखाने आली. त्यांच्या दाढ्या काढल्या होत्या. त्यांनी आपले कपडे फाडले होते, तसेच त्यांनी स्वतःला जखमा करून घेतल्या होत्या; त्यांनी बरोबर अर्पणे व ऊद आणली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 41:5
28 Iomraidhean Croise  

याकोबाने पदन-अरामपासून सुरू केलेला प्रवास कनान देशातील शखेम शहरात सुखरूपपणे संपवला. त्या नगराजवळ त्याने आपला तळ दिला.


तेव्हा त्या देशाचा राजा हमोर हिव्वी याचा मुलगा शखेम याने तिला पाहिले तो तिला घेऊन गेला, आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले.


एके दिवशी योसेफाचे भाऊ आपल्या बापाची मेंढरे चारावयास शखेम येथे गेले.


तेव्हा हानूनने दावीदाच्या त्या सेवकांना ताब्यात घेतले, आणि त्यांच्या दाढ्या अर्ध्या छाटल्या त्यांची कंबरेखालची वस्त्रे मध्यभागी फाडून ठेवली. एवढे करून त्यांना त्याने परत पाठवले.


रहबाम शखेम येथे गेला कारण त्यास राजा करण्यास सर्व इस्राएल लोक तेथे गेले होते.


शखेम हे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील नगर होते. ते चांगले मजबूत आणि सुरक्षित करून यराबाम तेथे राहिला. पुढे त्याने पनुएल नगराची उभारणी केली.


त्याने शोमरोन टेकडी शेमर याच्याकडून सुमारे दोन किक्कार रूपे देऊन विकत घेतली. या टेकडीवर त्याने नगर बांधले. शेमर या नावावरुनच त्याने नगरचे नाव शोमरोन ठेवले.


यहूदाचा राजा आसा याच्या काराकिर्दींच्या अडतिसाव्या वर्षी अम्रीचा पुत्र अहाब इस्राएलचा राजा झाला. शोमरोन या नगरातून त्याने इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले.


या नबुजरदानने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा आणि यरूशलेममधील सर्व घरे जाळून टाकली. मोठमोठे वाडेही त्याने उद्ध्वस्त केले.


हे ऐकून हानूनाने दावीदाच्या दूतांना अटक केली आणि त्यांचे मुंडन केले. त्यांची कमरेपर्यंतची वस्रेही फाडली आणि त्यांना वाटेला लावले.


कारण तुझे सेवक तिच्या दगडांची आवड धरतात, आणि तिच्या नासधूसाची धूळ पाहून त्यांना कळवळा येतो.


त्याने शिलोतले पवित्रस्थान सोडून दिले, ज्या तंबूत लोकांच्यामध्ये तो राहत होता.


दीबोनाचे लोक मंदिरापर्यंत, उच्चस्थानावर रडण्यास चढून गेले; नबो व मेदबा यांच्यासाठी मवाब विलाप करत आहे. त्यांच्या सर्वांची डोकी मुंडिलेली आहेत व त्यांच्या सर्वांच्या दाढ्या कापलेल्या आहेत.


म्हणून या देशातील मोठे आणि लहान मरतील. ते पुरले जाणार नाहीत किंवा त्यांच्याबद्दल कोणी शोक करणार नाही. त्यांच्याकरिता कोणी आपल्याला कापून घेणार नाही किंवा आपले केस कापणार नाहीत.


गदल्याला मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी, परंतु कोणालाही माहीत नसता असे झाले की,


गज्जाला टक्कल पडले आहे. त्यांच्या खोऱ्यातील उरलेले अष्कलोनाचे लोक शांत झाले आहेत. तुम्ही कोठवर शोकाने आपल्या स्वत:ला जखमा करून घेणार?


कारण प्रत्येक मस्तक टक्कल झाले आहे व प्रत्येक दाढी मुंडली आहेत. प्रत्येकाच्या हातावर जखमा आहेत व तागाची वस्त्रे त्यांच्या कमरेभोवती आहे.


तर तुम्ही शिलो येथील जे माझे ठिकाण होते तेथे जा, ज्यात पहिल्याने माझे नाव वसविले आणि त्याचे मी आपले लोक, इस्राएल यांच्या दुष्कृत्यांमुळे जे केले ते पाहा.


म्हणून, शिलोचे जसे मी केले, त्याचप्रकारे ज्या घरास माझे नाव आहे आणि ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे ठिकाण मी तुम्हास व तुमच्या पूर्वजांना दिले तसे करीन.


आणि तुम्ही आपले कपडेच फाडू नका, तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याकडे वळा, कारण तो कृपाळू व दयाळू आहे, तो रागावण्यास मंद आणि विपुल प्रेम करणारा आहे, आणि त्याने लादलेल्या शिक्षेपासून तो मागे फिरेल.


तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. तेव्हा कोणी मरण पावले तर अंगावर वार करून घेणे, मुंडण करणे असे करु नका.


मग इस्राएलाची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली, आणि तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला, आणि त्यांच्यापुढे सर्व देश जिंकलेला होता.


आणि शखेमात जो शेतभूमीचा भाग याकोबाने शखेमाचा बाप हमोर याच्या संतानांजवळून शंभर रुप्याच्या तुकड्यावर विकत घेतला होता, आणि जो योसेफाच्या संतानांच्या वतनाचा झाला त्यामध्ये, योसेफाची जी हाडे इस्राएली लोकांनी मिसर देशातून वर आणली होती, ती त्यांनी पुरली.


देवाचे मंदिर शिलोमध्ये होते, तोपर्यंत त्यांनी आपल्यासाठी मीखाची कोरीव मूर्ती जी त्याने केली होती तिची उपासना केली.


यरूब्बालाचा मुलगा अबीमलेख, याने शखेमास आपल्या आईच्या नातेवाईकांजवळ जाऊन त्यास आणि त्याच्या आईच्या घरातील सर्व परिवाराला म्हटले,


ती प्रतिवर्षी असेच करीत असे, ती आपल्या परिवारासोबत परमेश्वराच्या मंदिरात जाई तेव्हा तिची सवत तिला असाच त्रास देई म्हणून ती रडत असे व काही खात नसे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan