यिर्मया 40:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग ते मिस्पा येथे गदल्याकडे गेले. ती माणसे नथन्याचा मुलगा इश्माएलाची होती; कारेहाचे मुले योहानान व योनाथान; तन्हुमेथाचा मुलगा सराया; रफैची मुले नटोफाथी आणि माकाथाचा मुलगा याजन्या ते व त्यांची माणसे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा ते, म्हणजे इश्माएल बिन नथन्या, कारेहपुत्र योहानान व योनाथान, सराया बिन तान्हुमेथ, नटोफाथी रफै ह्याचे पुत्र व याजन्या (हा एका माकाथीचा पुत्र) हे व त्याचे लोक गदल्याकडे मिस्पास आले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कोरहाचे पुत्र योहानान व योनाथान, तन्हुमेथचा पुत्र सेरायाह, नटोफाथी एफै याचे पुत्र, व माकाथी यजन्याह व त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले. Faic an caibideil |
मग मिस्पा येथे एकांतात कारेहाचा मुलगा योहानान गदल्याशी बोलला की, “मला नथन्याचा मुलगा इश्माएल याला ठार मारण्याची परवानगी दे. कोणी माझ्यावर संशय घेणार नाही. त्याने तुला का मारावे? जे सर्व यहूदी तुझ्याभोवती गोळा झाले आहेत त्यांना देशात पांगण्याची आणि यहूदाचे उरलेले अवशेष नष्ट होण्याची परवानगी का देतोस?”