Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 40:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जेव्हा यिर्मयाने काही उत्तर दिले नाही, नबूजरदान म्हणाला, शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या ज्याला बाबेलाच्या राजाने त्यास यहूदातील नगरांचा अधिकारी नेमले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याच्याबरोबर लोकांमध्ये राहा. किंवा जेथे कोठे तुझ्या दृष्टीने तुला योग्य वाटेल तेथे तू जा.” राजाच्या अंगरक्षकाच्या नायकाने त्यास अन्न व बक्षीस दिले आणि त्यास दूर पाठवून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तो परतला नाही तोच तो त्याला म्हणाला, “गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याला बाबेलच्या राजाने यहूदाच्या नगरांवर अधिपती नेमले आहे, त्याच्याकडे परत जा व त्याच्याबरोबर लोकांमध्ये जाऊन वस्ती कर; किंवा तुला सोईचे वाटेल तेथे जा.” मग गारद्यांच्या नायकाने त्याला अन्नसामग्री व इनाम देऊन रवाना केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 यिर्मयाह वळून त्याच्यापुढून जाण्याआधी नबुजरदान म्हणाला, “शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याच्याकडे परत जा. त्याला बाबेलच्या राजाने यहूदीया प्रांतातील नगरांवर राज्यपाल नेमले आहे. त्याच्यासह या लोकांबरोबर राहा किंवा तुझ्या मर्जीप्रमाणे तुला पाहिजे तिकडे जा.” नंतर नबुजरदानने त्याला शिदोरी व भेट दिली व त्याला सोडून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 40:5
24 Iomraidhean Croise  

मग राजाने याजक हिल्कीया, शाफानचा मुलगा अहीकाम, मिखायाचा मुलगा अखबोर, शाफान चिटणीस आणि सेवक असाया यांना आज्ञा केली की,


मग हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया हे सर्व हुल्दा या संदेष्ट्रीकडे गेले. हरहसचा मुलगा तिकवा याचा मुलगा शल्लूम याची ती पत्नी. शल्लूम याजकांच्या कपड्यांचे खाते सांभाळी, हुल्दा यरूशलेमामध्ये दुसऱ्या भागात राहत होती. हे सर्वजण तिच्याकडे गेले आणि तिच्याशी बोलले.”


आणि हिल्कीया, शाफानचा पुत्र अहीकाम, मीखाचा पुत्र अब्दोन, चिटणीस शाफान आणि आपला सेवक असाया यांना योशीयाने आज्ञा केली की.


परमेश्वर आमच्या पूर्वजांचा देव धन्यवादित असो. यरूशलेमेमधील जे देवाचे मंदिर ते शोभिवंत करावे अशी इच्छा देवानेच राजाच्या मनात घातली.


हाच एज्रा बाबेलाहून गेला. परमेश्वर इस्राएलचा देव याने जे मोशेचे नियमशास्त्र दिले होते त्यामध्ये एज्रा निपुण नियमशास्त्र शिक्षक होता. परमेश्वर देवाचा हात त्याच्यावर असल्यामुळे त्याने जे काही मागितले ते सर्व राजाने त्यास दिले.


तेव्हा, हे परमेश्वरा, मी तुला विनवणी करतो की, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे आणि जे तुझे सेवक तुझ्या नावाचे भय धरून आदर दाखवित आहेत त्या सेवकांची ही प्रार्थना तू ऐक. आता आज तुझ्या सेवकाला यश दे आणि या मनुष्यावर त्याची कृपादृष्टी होईल असे कर. मी राजाचा पेला धरणारा असा सेवक होतो.


देव गर्वीष्ठांना नम्र करील, आणि तो नम्र लोंकाची सुटका करील.


मनुष्याचे मार्ग परमेश्वरास आवडले म्हणजे, त्या मनुष्याच्या शत्रूलाही त्याच्याशी समेट करण्यास भाग पाडतो.


राजाचे मन पाण्याच्या प्रवाहासारखे परमेश्वराच्या हातात आहे; तो त्यास वाटेल तेथे वळवतो.


परमेश्वर म्हणाला, तुझ्या चांगल्यासाठी मी तुला तारले नाही काय? खचित संकटे आणि दुःखाच्यावेळी शत्रू तुझ्याजवळ मदतीस विनंती करत येतील असे मी करीन.


पण अहीकाम या प्रतिष्ठित व्यक्तीने यिर्मयाला पाठिंबा दिला अहीकाम शाफानचा मुलगा होता. त्याने यिर्मयाला याजक व संदेष्टे यांच्या हातातून सोडवले, जे त्यास मारणार होते.


त्यांच्या मनुष्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणातून काढले आणि शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या याने त्यास घरी न्यावे म्हणून त्यांच्या स्वाधीन केले. मग यिर्मया लोकांमध्ये राहू लागला.


पण आता पाहा, मी तुझ्या हातात असलेल्या बेड्यापासून तुला आज सोडवत आहे. जर तुझ्या दृष्टीने तू माझ्याबरोबर बाबेलास येणे चांगले असले तर, ये, आणि मी तुझी काळजी घेईन. पण जर तुझ्या दृष्टीने तू माझ्याबरोबर बाबेलास येणे चांगले नसेल तर मग येऊ नको. तुझ्यादृष्टीने जेथे चांगले आणि योग्य आहे तेथे तू जा.


पण सातव्या महिन्यात असे झाले की, अलीशामाचा मुलगा नथन्या, याचा मुलगा इश्माएल, जो राजघराण्यातला होता आणि राजाचे काही अधिकारी, त्याच्याबरोबर त्याच्या दहा मनुष्यांना घेऊन मिस्पात अहीकामाचा मुलगा गदल्याकडे आले. त्यांनी मिस्पा येथे एकत्रित बसून भोजन केले.


खास्द्यांच्या भीतीमुळे त्यांनी असे केले. कारण अहीकामाचा मुलगा गदल्या ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास नथन्याचा मुलगा इश्माएल याने जिवे मारले होते.


पण नथन्याचा मुलगा इश्माएल व त्याच्याबरोबरची दहा माणसे होते त्यांनी उठून शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या, ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास तलवारीने ठार मारले.


दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोन नगराला पोहचलो, युल्य पौलाशी फार चांगला वागला, पौलाच्या मित्रांना त्याची काळजी घेता यावी म्हणून त्याने मोकळीक दिली.


परंतु शताधिपतीला पौलाला वाचवायचे होते म्हणून त्याने शिपायांना तो विचार सोडून देण्यास सांगितले आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी जहाजातून उड्या टाकून किनाऱ्याला जावे अशी आज्ञा केली.


त्यांनी आम्हास सन्मानपूर्वक पुष्कळ वस्तू भेटीदाखल दिल्या आणि जेव्हा आम्ही परत प्रवासास निघालो तेव्हा आम्हास लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरविल्या.


म्हणून आपण धैर्याने म्हणू शकतो, “देव माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan