Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 40:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि पाहा, जे खास्दी आम्हाजवळ येतील त्यांना भेटण्यास मी मिस्पात राहीन. म्हणून तुम्ही द्राक्षरस, उन्हाळी फळ व तेल यांचे उत्पादन करून आपल्या पात्रात साठवून ठेवावे. जी नगरे तुम्ही ताब्यात घेतली आहेत त्यामध्ये तुम्ही राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 पाहा, मी तर जे खास्दी आपल्याकडे येतील त्यांच्या तैनातीसाठी मिस्पा येथे राहतो; पण तुम्ही द्राक्षारस, ग्रीष्म ऋतूतील फळे व तेल ह्यांचा संचय करून आपल्या भांड्यांत भरून ठेवा व तुम्ही ताब्यात घेतलेल्या नगरात राहा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मी स्वतः मिस्पाह येथे राहीन. माझ्या कारभाराची पाहणी करावयास बाबिलोनचे अधिकारी येतील, तेव्हा त्यांच्याकडे मी तुमच्यासाठी मध्यस्थी करेन. द्राक्षांचे पीक गोळा करा, उन्हाळी फळे व जैतुनाची फळे गोळा करा व ती साठवून ठेवा. तुमच्या मनाला येईल त्या शहरात राहा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 40:10
15 Iomraidhean Croise  

डोंगरमाथ्याच्या थोडे पुढे गेल्यावर, मफीबोशेथाचा सेवक सीबा दावीदाला भेटला. सीबाजवळ खोगीर घातलेली दोन गाढवे होती दोनशे भाकरी, किसमिसाचे शंभर घड, अंजिरांच्या शंभर ढेपा आणि द्राक्षरसाचा बुधला एवढे सामान गाढवांवर लादलेले होते.


तुझे लोक आणि सेवक खरेच फार धन्य आहेत. तुझे सेवक, जे तुझ्यासमोर ऊभे राहून, ज्यांना तुझ्या ज्ञानाचा लाभ होतो ते धन्य.


जो आपल्या कामात तरबेज अशा मनुष्यास तू पाहिले आहे का? तो राजासमोर उभा राहील; तो सामान्य लोकांसमोर उभा राहणार नाही.


गवत जाते आणि पुन्हा नवीन उगवते. आणि डोंगरावरील हिरवळ कापून गुरांढोरासाठी गोळा करण्यात येते.


यामुळे मी खरोखर याजेराबरोबर सिब्मेच्या द्राक्षवेलीकरता रडेल. मी आपल्या अश्रूंनी हेशबोन व एलाले तुम्हास पाणी घालीन. कारण तुझ्या शेतातील उन्हाळी फळांनी आणि तुझ्या कापणीच्या आनंदाच्या आरोळीचा मी शेवट केला आहे.


म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, रेखाबाचा मुलगा योनादाब याच्या वंशजांपैकी कोणीतरी एक नेहमीच माझ्या सेवेत राहील.”


पण राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदान याने ज्यांच्याजवळ स्वतःचे काहीच नव्हते अशा गरीब लोकांस यहूदा देशात राहण्याची परवानगी दिली. त्याने त्याच दिवशी त्यांना द्राक्षमळे व शेते दिली.


तेव्हा जे सर्व प्रत्येक ठिकाणी पांगले होते ते सर्व यहूदी परत यहूदा देशात मिस्पात गदल्याकडे आले. त्यांनी द्राक्षरस आणि उन्हाळी फळांचा हंगाम मोठ्या विपुलतेने साठा केला.


मग यिर्मया, मिस्पा येथे अहीकामाचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे गेला. तो देशात मागे राहिलेल्या लोकांमध्ये जाऊन राहिला.


पण कारेहाचा मुलगा योहानान व सैन्यांचे सर्व अधिकारी यांनी वाचलेले सर्व यहूदी जे ज्या सर्व राष्ट्रांत पसरले होते. त्यातून यहूदा देशात राहण्यास परत आले होते त्यांना आपल्याबरोबर घेतले.


हे सिब्मेच्या द्राक्षवेली, मी याजेरासाठी रडलो त्यापेक्षा तुझ्यासाठी मी अधिक रडेन. तुझ्या फांद्या क्षारसमुद्रापलीकडे गेल्या होत्या आणि त्या याजेरापर्यंत पोहोचल्या होत्या; पण विनाशकाने तुझ्या उन्हाळी फळांवर व तुझ्या द्राक्षांवर हल्ला केला आहे.


मला हायहाय! मी अस्वस्थ झालो आहे, कारण माझी स्थिती उन्हाळ्यातल्या वगळ फळांसारखी झाली आहे, काढणीच्या द्राक्षांसारखी झाली आहे, खायला एकही घोंस नाही, पण तरीही प्रथम पिकलेल्या अंजीर फळाची हाव आहे.


यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा.”


पण तुझ्या सेवेस हजर राहणारा, नूनाचा मुलगा यहोशवा तेथे जाईल त्यास तू प्रोत्साहन दे, कारण तो इस्राएलांना देश वतन म्हणून मिळवून देईल.


खळ्यातील आणि द्राक्षकुंडामधील उत्पन्न जमा केल्यावर सात दिवसानी मंडपाचा सण साजरा करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan