Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 “आणि परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजांचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे हृदय मरून जाईल, याजक घाबरतील आणि संदेष्टे भयभीत होतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 “परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजाचे व सरदारांचे काळीज ठाव सोडील; याजकांची त्रेधा उडेल आणि संदेष्टे भयचकित होतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 याहवेह असे म्हणतात, “त्या दिवशी असे घडेल,” “राजा आणि अधिकारी भीतीने गर्भगळीत होतील, याजकांना भयाने धडकी भरेल आणि संदेष्टे भीतीने गांगरून जातील,”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:9
20 Iomraidhean Croise  

मग नगराच्या तटाला एक खिंड पाडण्यात आली; दोन्ही तटांच्यामध्ये जी वेस राजाच्या बागेजवळ होती त्या वाटेने सर्व योद्धे रातोरात पळून गेले; नगरास खास्द्यांचा वेढा पडलाच होता; इकडे राजाने अराबाचा रस्ता धरला.


माझे हृदय चिरडून गेले आहे आणि मी गवताप्रमाणे कोमेजून गेलो आहे. मी जेवण खाण्यास असमर्थ आहे.


त्या दिवशी मिसरी बायकांसारखे होतील. ते थरथर कापतील आणि भयभीत होतील कारण सेनाधीश परमेश्वर आपला हात वर उंचावेल तो त्यांच्यावर उगारील.


मिसराचा उत्साह त्याच्यामध्ये कमजोर होईल. मी त्यांचा सल्ला नष्ट करील, जरी ते मूर्तीना, मृत मनुष्याच्या आत्म्याला, व मांत्रिकाजवळ व भूतवैद्यांचा सल्ला शोधतील.


जेव्हा तो पार जाईल तेव्हा तो तुला झाकून टाकेल. आणि रोज रोज सकाळी, दिवसा आणि रात्री तो पार जाईल. आणि जेव्हा संदेश कळेल, तर ते भयच असे होईल.


चोराला लोकांनी पकडताच तो तसा लज्जीत होतो, त्याचप्रमाणे इस्राएलाचे घराने लाजले आहे. ते, त्यांचे राजे आणि त्यांचे अधिकारी, याजक आणि संदेष्टे लज्जित झाले आहेत.


मेंढपाळांनो विलाप करा आणि मदतीसाठी रडा. कळपातील धन्यांनो जमिनीवर लोळा. कारण ही तुला मारल्या जाण्याचा आणि विखरण्याचा दिवस आला आहे. तुम्ही फुटक्या मडक्याच्या तुकड्याप्रमाणे सगळीकडे पडाल.


तुझे संदेष्टे कोठे आहेत, ज्यांनी तुला भविष्य सांगितले आणि म्हणाले बाबेलचा राजा तुम्हावर किंवा या देशाविरूद्ध येणार नाही?


करोयोथ काबीज झाले आहे आणि त्यांचे बालेकिल्ले जप्त झाले आहेत. कारण त्या दिवशी मवाबी सैनिकांचे हृदय, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल.


भविष्यवादी खोटेपणाने भविष्य सांगतात, आणि याजक त्यांच्या शक्तीने अधिकार गाजवतात. ते काम ते करणार नाहीत. आणि माझ्या लोकांस हे प्रिय आहे! पण शेवटी काय होणार?”


मग नगराच्या तटाला खिंडार पाडण्यात आले आणि सर्व लढणारे माणसे पळाले राजाच्या बागेजवळ दोहो तटामध्ये जी वेस होती तिच्या वाटेने ते रात्री नगरातून निघून गेले आणि खास्दी लोक नगराच्यासभोवती होते, म्हणून ते अराब्याच्या वाटेने निघून गेले.


अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पाहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळामध्ये मी एक कार्य करतो, ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कोणी ते स्पष्ट करून सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan