Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 “यहूदाच्या लोकांस ही वार्ता कळवा आणि यरूशलेमला हे ऐकू जाऊ द्या: ‘देशात रणशिंगे फुंका, घोषीत करा, एकत्र या. आपण सर्व मजबूत शहराकडे जाऊ या.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 यहूदात पुकारा, यरुशलेमेत जाहीर करा, आणि म्हणा की, “देशात रणशिंग फुंका; जोराने ओरडून म्हणा, ‘एकत्र व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात जाऊ.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “यहूदीयात याची घोषणा करा आणि यरुशलेमात जाहीर करा व सांगा: ‘संपूर्ण राष्ट्रांत रणशिंगे फुंका!’ मोठ्याने ओरडून सांगा: ‘सर्वजण एकत्र या! तटबंदीच्या नगरात शरण घ्या!’

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:5
16 Iomraidhean Croise  

जेव्हा तो पार जाईल तेव्हा तो तुला झाकून टाकेल. आणि रोज रोज सकाळी, दिवसा आणि रात्री तो पार जाईल. आणि जेव्हा संदेश कळेल, तर ते भयच असे होईल.


“यिर्मया, या कराराची वचने ऐक, आणि यहूदाच्या प्रत्येक मनुष्यास आणि यरूशलेममध्ये राहणाऱ्या हे घोषीत कर.


पण जेव्हा बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने देशावर हल्ला केल्यावर, आम्ही म्हणालो, खास्द्यांच्या व अराम्यांच्या सैन्यापासून आपण यरूशलेमेला निसटून जाऊ. म्हणून आम्ही यरूशलेमेमध्ये राहत आहोत.”


याकोबाच्या घराण्याला ही वार्ता कळव आणि यहूदाला हे ऐकू दे.


बन्यामीनच्या लोकांनो, जीव वाचविण्यासाठी पळा. यरूशलेमपासून दूर पळा. तकोवामध्ये तुतारी फुंका. बेथ-हक्करेमवर धोक्याचा इशारा देणारे निशाण उभारा. हे सर्व करा कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे. भयानक नाश तुमच्याकडे येत आहे.


आपण येथे नुसतेच का बसलो आहोत? या भक्कम शहराकडे पळून जाऊ या आणि आम्ही मृत्यूमध्ये तिथे गप्प बसू परमेश्वर आमचा देव याने आम्हास गप्प केले आहे, कारण आम्ही त्याच्याविरुध्द पाप केले आहे, म्हणून त्याने आम्हांला विषारी पाणी प्यायला दिले आहे.


या गोष्टी समजण्याइतका सुज्ञ कोणी आहे का? परमेश्वराच्या मुखाने जे काही घोषीत केले, म्हणजे ते तो कळवू शकेल काय? या भूमीचा नाश का झाला? जेथे कोणीही जात नाही अशा वाळवंटासारखी ती का केली गेली.


ते तुताऱ्यांचा नाद करतील आणि तयारी करतील तरी लढाई करण्यास कोणी तयार होणार नाही. तथापि माझा क्रोध पूर्ण समुदायावर आला आहे.


“मुखाला तुतारी लाव, परमेश्वराच्या, घरावर गरुड येत आहे, हे यासाठी घडत आहे कारण लोकांनी माझा करार मोडून माझ्या नियम शास्त्राच्या विरोधात बंड केले आहे.


सियोनात कर्णा फुंका, आणि माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने गजर करा! या देशात राहणाऱ्यांचा भीतीने थरकाप उडू द्या, कारण परमेश्वराचा दिवस येत आहे; खरोखर, तो जवळ आहे.


रणशिंगे फुंकली गेली, तर लोक भिणार नाहीत काय? नगरावर संकट आले आणि ते परमेश्वराने घडवून आणले नाही असे होईल का?


सिंहाने डरकाळी फोडल्यास, कोण भिणार नाही? परमेश्वर बोलला आहे; तर कोणाच्याने भविष्य सांगितल्यावाचून राहवेल?


चांदीचे दोन कर्णे बनव. चांदी ठोकून ते बनव. मंडळीला एकत्र बोलवण्यासाठी आणि त्यांचा तळ हलविण्यासाठी या कर्ण्यांचा उपयोग करावा.


सर्व मंडळीला दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र बोलविण्यासाठी याजकाने कर्णे वाजवावे.


यहोशवा आणि इस्राएल लोक यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले; पण त्यांच्यातले काही लोक बचावून तटबंदीच्या नगरांत गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan