Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 परमेश्वर असे म्हणाला: “संपूर्ण देशाची नासधूस होईल, पण मी त्यांचा संपूर्ण नाश करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 परमेश्वर म्हणतो, “सर्व देश उजाड होईल; पण मी त्याचा पुरा अंत करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 याहवेह असे म्हणतात: “संपूर्ण भूमी उजाड होईल, तरीपण मी त्याचा पूर्ण अंत करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:27
29 Iomraidhean Croise  

अशाप्रकारे, यिर्मयाकडून इस्राएलाबद्दल परमेश्वराने जे वदवले ते प्रत्यक्षात घडले. परमेश्वर यिर्मयाद्वारे म्हणाला होता: हे ठिकाण सत्तर वर्षे निर्मनुष्य आणि उजाड राहील. लोकांनी न पाळलेल्या शब्बाथाच्या भरपाईसाठी असे होईल.


पण तू दयाळू आहेस म्हणून तू त्यांचा समूळ संहार केला नाहीस, त्यांचा तू त्याग केला नाहीस कारण देवा, तू कृपाळू आणि दयाळू आहेस.


जसे जेव्हा जैतून झाड हलविले असता त्यावर काही फळे शिल्लक राहतात, दोन किंवा तीन फळे सर्वाहून उंच शेंड्यावर राहतात, चार किंवा पाच त्याच्या उंचावरच्या फलदायी फांद्यावर राहतात, असे परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो.


पाहा परमेश्वर पृथ्वीला ओसाड व रिकामी करीत आहे, तो त्यातील राहणाऱ्यांची पागांपांग करीत आहे.


यास्तव जे राष्ट्र भयानक आणि सर्वकाळासाठी फुत्काराची गोष्ट असा होईल. तिच्याजवळून जाणारा प्रत्येक हादरेल आणि आपले डोके हालवेल.


आणि ती सगळी भूमी वैराण व वाळवंट होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षांपर्यंत बाबेलाच्या राजाचे दास होतील.


कारण परमेश्वर असे म्हणतो, मी तुला तारायला तुम्हाबरोबर आहे. मग मी ज्या राष्ट्रातून तुझी पांगापांग केली आहे. त्या सर्वांचा मी पूर्ण शेवट करीन, पण मी खात्रीने तुझा शेवट करणार नाही, तरी मी तुला न्यायाने शासन करीन आणि खचीत तुला शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.


अरिष्टामागून अरिष्ट घोषीत करण्यात आले आहे. कारण संपूर्ण देशाचा नाश झाला आहे. एकाएकी त्यांनी माझ्या तंबूचा व कनातींचा नाश केला आहे.


सिंह त्याच्या झाडीतून बाहेर आला आहे, आणि राष्ट्रांचा नाश करणारा निघाला आहे. जिथे कोणी राहत नाही असे, तुमच्या शहरांना भयामध्ये आणि ओसाडी मध्ये पालटायला तो आपल्या स्थानांतून निघून येत आहे.


म्हणून माझा क्रोध व संताप ओतला गेला आणि यहूदाच्या नगरांत व यरूशलेमेच्या रस्त्यावर अग्नी पेटला. यास्तव ती ओसाड व उजाड झाली आहेत.


परमेश्वर म्हणतो, तू, माझ्या सेवका, याकोबा घाबरु नकोस. कारण मी तुजबरोबर आहे, ज्या राष्ट्रांमध्ये मी तुला विखरले आहे त्या सर्वांचा मी पूर्ण नाश करीन. पण मी तुझा पूर्ण नाश करणार नाही. तरी मी तुला न्यायाने शिक्षा करीन आणि तुला अगदीच शिक्षा केल्यावाचून सोडणार नाही.”


तिच्या द्राक्षवेलींच्या माळीवर चढून जा आणि नाश कर, परंतू त्यांचा संपूर्ण नाश करु नकोस. तिच्या द्राक्षवेलीची काटछाट कर, कारण ती द्राक्षवेल परमेश्वराकडून नाही.


“पण तरीही त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे शेवट करणार नाही. असे परमेश्वर म्हणतो.


यहूदाच्या गावांतील व यरूशलेमेच्या रस्त्यांवरील उल्हासाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. वधू वरांचा शब्द उमटणार नाही, कारण भूमी ओसाड होईल.”


म्हणून मी यरूशलेम नगरी कचऱ्याचा ढीग करीन. ते कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल. मी यहूदातील नगरे नष्ट करीन. मग तेथे कोणीही राहणार नाही.”


परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे; त्याने आपल्या पवित्रस्थानाचा वीट मानला आहे. त्याने तिच्या राजवाड्याच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत. परमेश्वराच्या मंदिरात शत्रूने जयघोष केला. सणाचा दिवस असल्याप्रमाणे त्यांनी गोंगाट केला.


मी केलेल्या भाकीतानुसार बाहेर ये, पलट्याचा मुलगा बनाया मरण पावला. मग मी पालथा पडून मोठ्या आवाजाने म्हणालो, “आहा! हे प्रभू परमेश्वर देवा तू उरलेल्या इस्राएलाच्या लोकांस पूर्ण शेवट केलास काय?”


तरी मी त्यांच्यावर कृपादृष्टी केली, कारण त्यांची होणारी हानी पाहून त्यांचा रानात सर्वनाश करणार नाही.


मग मी ती भूमी ओसाड व निर्जन करीन आणि त्याच्या सामर्थ्याचा गर्वाचा अंत होईल. इस्राएलचे पर्वत ओसाड होतील. तेथून कोणीही जाणारसुद्धा नाही.


मी आपले सामर्थ्य त्यांना दाखवीन, आणि त्यांच्या भूमीचा पूर्ण विध्वंस करेन, त्यांचे राहण्याची ठिकाणे दिबलायाकडे व ज्या जागी ते राहत होते जवळपास सर्व ठिकाणे वाया घालवीन, मग त्यांना समजेल मी परमेश्वर देव आहे.”


मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक द्रव्याचा वास मी घेणार नाही.


इतके असताही ते त्यांच्या शत्रुंच्या देशात असताना, त्यांचा सपूंर्ण नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा, एवढा त्यांचा मी नकार करणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे.


परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचे सोनेचांदी त्यांना वाचवू शकणार नाही. तर त्याच्या क्रोधाच्या अग्नीने सारी भूमी खाऊन टकली जाईल, कारण देशांतल्या सर्व राहणाऱ्यांविरुद्ध जो नाश तो आणणार आहे, तो भयानक असेल!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan