Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मी पाहिले आणि पाहा! फळबागेचे वाळवंट झाले होते आणि सर्व शहरे परमेश्वरा समोर, त्याच्या संतप्त क्रोधासमोर खाली ओढले गेले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 मी पाहिले तर पाहा, बागाईत वैराण झाली आहे व परमेश्वरासमक्ष, त्याच्या तीव्र कोपाने तेथील सर्व नगरे नष्ट झाली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 सुपीक जमीन ही एक वाळवंट झाली होती; आणि येथील सर्व नगरे उद्ध्वस्त होती याहवेहच्या समोर, त्यांच्या भयंकर क्रोधाग्नीपुढे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:26
15 Iomraidhean Croise  

आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो. कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे.


तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस. असा कोण आहे कि तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील?


त्यांनी गहू पेरला पण काटेरी झाडांची कापणी केली, त्यांनी दमेपर्यंत कष्ट केले, पण काही मिळवले नाही. परमेश्वराच्या कोपामुळे ते त्यांच्या पिकाबाबत लज्जित होतील.”


किती काळ राष्ट्र शोक करणार? आणि साऱ्या देशाचे गवत सुकून जाईल? त्यामध्ये राहणाऱ्यांच्या दुष्टाई मुळे पशू व पक्षी मरुन गेले आहेत. कारण ते लोक म्हणाले “आमचे काय होईल हे देवाला माहीत नाही.”


आणि ती सगळी भूमी वैराण व वाळवंट होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षांपर्यंत बाबेलाच्या राजाचे दास होतील.


यहूदाच्या गावांतील व यरूशलेमेच्या रस्त्यांवरील उल्हासाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. वधू वरांचा शब्द उमटणार नाही, कारण भूमी ओसाड होईल.”


मी डोंगरासाठी आकांत व विलाप करीन आणि मी कुरणांसाठी शोकगीत गाईन. कारण ती जाळून टकली आहे, तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही. त्यांना गुरांचा आवाजही ऐकू येत नाही. आकाशातील पक्षी आणि प्राणी दूर निघून गेले आहेत.


परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे; त्याने आपल्या पवित्रस्थानाचा वीट मानला आहे. त्याने तिच्या राजवाड्याच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत. परमेश्वराच्या मंदिरात शत्रूने जयघोष केला. सणाचा दिवस असल्याप्रमाणे त्यांनी गोंगाट केला.


मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक द्रव्याचा वास मी घेणार नाही.


ह्यास्तव, तुमच्यामुळे सियोन शेतासारखे नांगरले जाईल, यरूशलेम नासधुशीचा ढीग होईल, आणि मंदिराचा पर्वत जंगलातल्या टेकडीसारखा होईल.


परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी त्यांचे सोनेचांदी त्यांना वाचवू शकणार नाही. तर त्याच्या क्रोधाच्या अग्नीने सारी भूमी खाऊन टकली जाईल, कारण देशांतल्या सर्व राहणाऱ्यांविरुद्ध जो नाश तो आणणार आहे, तो भयानक असेल!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan