Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 4:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 कारण देव म्हणतो, “माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत. ती मूर्ख लोक आहेत आणि त्यांना काहीएक समजत नाही. दुष्कृत्ये करण्यात ते पटाईत आहेत पण चांगले करायचे त्यांना ज्ञान नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 “कारण माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत; ती निर्बुद्ध, असमंजस अशी मुले आहेत; वाईट करण्यात ती हुशार आहेत, पण बरे करण्याचे त्यांना ज्ञान नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 “माझे लोक मूर्ख आहेत; ते मला ओळखत नाही. ते असमंजस मुलांसारखे आहेत. त्यांना समज अजिबात नाही. दुष्ट कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे; त्यांना चांगले कार्य करावयाचे माहीत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 4:22
42 Iomraidhean Croise  

तेव्हा त्याचा धनी घरी येईपर्यंत तिने त्याचे वस्त्र आपल्याजवळ ठेवले.


अम्नोनाला योनादाब नावाचा मित्र होता. दावीदाचा भाऊ शिमा याचा हा मुलगा. योनादाब धूर्त होता.


त्याचे शब्द कपटी आणि पापमय असतात. तो शहाणा होण्यास किंवा सत्कृत्ये करण्यास इच्छीत नाही.


तो आपल्या बिछान्यावर पडून असता, तो अपराधाच्या योजना आखतो. तो वाईट मार्गाच्या योजना करतो, तो वाईटाचा धिक्कार करत नाही.


ज्यांनी अन्याय केला, त्यांना काहीही माहित नव्हते काय? ज्यांनी माझ्या लोकांस भाकरीप्रमाणे खाल्ले, पण ते देवाला हाक मारत नाही.


“ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत; ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात; पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.”


दुष्ट मनुष्यांना न्याय समजत नाही, पण जे परमेश्वरास शोधतात त्यांना सर्वकाही कळते.


बैल आपल्या धन्याला ओळखतो, आणि गाढव आपल्या मालकाचे खाण्याचे कुंड ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, इस्राएलास समजत नाही.”


त्याच्या फांद्या सुकतील तेव्हा त्या तोडल्या जातील, स्त्रिया त्या सरपणासाठी वापरतील. कारण हे लोक समजदार नाहीत. म्हणून त्यांना घडविणारा देव ह्यास्तव यांच्यावर दया करणार नाही, आणि त्यांचा निर्माणकरता यांच्यावर कृपा दाखवणार नाही.


ते सर्व पशूसारखे आणि मूर्ख आहेत, दीड दमडीच्या लाकडाच्या मूर्तींचे अनुयायी आहेत.


कुशी लोक त्यांच्या कातडीचा रंग बदलू शकतील काय? किंवा चित्ता त्याच्यावरील ठिपके बदलू शकेल काय? त्याचप्रमाणे तुम्हास, जी नेहमीच वाईट करण्याची सवय आहे, ते तुम्ही चांगले करणार काय.


“याजकांनी ‘परमेश्वर कोठे आहे’ असे विचारले नाही. आणि नियमशास्त्रातील तज्ञांना माझ्या बद्दल काळजी नाही! राज्यकर्त्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला, संदेष्ट्यांनी बआल देवाच्या नावाने याच्या नावे भविष्य वर्तविले आणि निरर्थक गोष्टींच्या मागे लागले.”


युद्धाचा झेंडा मी किती काळ पाहू? काय मला रणशिंग्याचा आवाज ऐकायला मिळेल?


मूर्ख लोकांनो, जे तुम्हास डोळे असून पाहत नाही व कान असून ऐकत नाही ते तुम्ही हे ऐका.


तेव्हा मी म्हणालो, “खचित ते गरिब आहेत. ते मूर्ख आहेत, कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग व आपल्या देवाचा नियम माहीत नाही.


जर वाळवंटात माझासाठी एक ठिकाण असते, तर मी माझ्या लोकांस सोडून त्यांच्यापासून खूप दूर गेलो असतो, कारण ते सर्व व्यभिचारी आणि विद्रोही असे आहेत.


कारण ते त्यांच्या जिभेने खोटे बाण सोडतात, पण ते या पृथ्वीवर विश्वासूपणात मोठे नाहीत. ते एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात. ते मला ओळखत नाही, परमेश्वर असे म्हणातो.


प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याची थट्टा करतो आणि सत्य बोलत नाही. त्यांची जीभ खोटे बोलते. दुष्टाई करण्यासाठी ते आपणाला दमवतात.


तुझे हृदय इतके कमजोर का? “असे परमेश्वर प्रभू देव जाहीरपणे सांगतो” तू स्वतःच्या मना प्रमाणे निर्लज्ज स्त्री सारखे सर्व काही केले.


इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वराचा शब्द ऐका, या देशातील लोकांविरुध्द परमेश्वराचा वाद आहे; कारण या देशामध्ये सत्यता किंवा करारबध्द विश्वासूपणा, देवाचे ज्ञान नाही.


माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहेत. कारण तुम्ही ज्ञानास नाकारले म्हणून मी सुध्दा तुम्हास माझे याजक म्हणून नाकारीन. माझे, तुमच्या देवाचे नियमशास्त्र तुम्ही विसरलात म्हणून मी ही तुमच्या मुलांना विसरेन.


त्यांचे कृत्य त्यांना माझ्याकडे त्यांच्या देवाकडे परत येऊ देत नाही, कारण त्यामध्ये व्यभिचारी आत्मा राहतो; आणि ते आपला देव परमेश्वर यास ओळखत नाहीत.


परमेश्वर असे म्हणतो, ते आपल्या राजवाड्यात हिंसा व नाश साठवतात, ते योग्य आचरण जाणत नाहीत.”


जे पाप करण्याचे योजीतात व आपल्या पलंगावर दुष्ट बेत करतात, त्यांना हायहाय. आणि सकाळ होताच ते आपले योजलेले वाईट काम करतात, कारण त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे.


त्यांचे हात दुष्कृत्ये करण्यात पटाईत आहेत. अधिकारी पैसे मागतात व न्यायाधीश लाच घेण्यास तयार आहेत. सामर्थ्यवान मनुष्या दुसऱ्याला आपल्या जिवाची वाईट इच्छा बोलून दाखवतो. असे ते एकत्र येऊन योजना करतात.


अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले. यावरुन धन्याने त्याची वाहवा केली; कारण या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.


त्यांनी पित्याला आणि मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील.


स्वतःला ज्ञानी म्हणता म्हणता ते मूर्ख बनले.


आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.


कारण तुमचे आज्ञापालन सर्वत्र सर्वांना कळले आहे म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो. पण तुम्ही चांगल्याविषयी ज्ञानी व्हावे आणि वाईटाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा आहे.


ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही,


बंधूनो, तुम्ही विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा.


इस्राएल राष्ट्र विचारशून्य आहे, त्यास समज म्हणून नाहीच.


मूर्ख आणि निर्बुद्ध जन हो, परमेश्वराशी असे वागता? तो तर तुमचा पिता, निर्माता कर्ता आणि धर्ता तोच आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan