यिर्मया 39:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
1 यहूदाचा राजा सिद्कीया याच्या नवव्या वर्षात आणि दहाव्या महिन्यात, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर आपले संपूर्ण सैन्य घेऊन यरूशलेमाविरूद्ध चालून आला आणि त्यास वेढा घातला.
1 यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या मासी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमेवर चालून आले व त्यांनी त्याला वेढा घातला;
1 यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला व त्याभोवती वेढा घातला.
तेव्हा खास्दी राजाला देवाने यहूदा व यरूशलेमेवर स्वारी करायला लावले. त्याने मंदिरात असलेल्या तरुणांनाही ठार केले. यहूदा व यरूशलेममधील लोकांवर त्याने दयामाया दाखवली नाही. लोकांस जिवे मारताना तरुण, कुमारी, वृध्द स्त्री-पुरुष, यावर त्याने तलवार चालवावी. देवानेच नबुखद्नेस्सराला यहूदा व यरूशलेमेच्या लोकांस शासन करायची मुभा दिली होती.
परमेश्वरापासून यिर्मयाकडे वचन आले. नबुखद्नेस्सर बाबेलाचा राजा व त्याचे सर्व सैन्य व त्याच्या सत्तेखाली असलेली पृथ्वीवरील सर्व राज्ये व सर्व लोक यरूशलेमेशी व त्याच्या सर्व नगरांशी लढत होते तेव्हा हे वचन आले. ते या प्रमाणे,
परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आज्ञा देत आहे आणि ते नगराकडे परत येतील असे करीन, तेव्हा ते त्याविरूद्ध लढतील व ते घेतील व ते जाळून टाकतील; कारण मी यहूदाची नगरे रहिवासीहीन ओसाड करीन.”
कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, जसा माझा क्रोध व माझा संताप यरूशलेमेवरचा माझा राग व्यक्त करून दाखविला. यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांवर ओतला आहे तसा माझा क्रोध जर तुम्ही मिसरमध्ये जाल तेव्हा तुम्हावर ओतला जाईल. तुम्ही शापाची वस्तू व्हाल व भयचकीत, शाप बोलण्याचा विषय आणि काहीतरी निंदनीय व्हाल. आणि हे ठिकाण तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही.
सिद्कीया राज्य करू लागला तेव्हा तो एकवीस वर्षाचा होता; अकरा वर्षे त्याने यरूशलेमेवर राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्नाकर यिर्मयाची मुलगी होती.
कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, शक्तीमान परमेश्वर असे म्हणतो, “झाडे कापा आणि यरूशलेमविरूद्ध मोर्चा बांधा. या नगरीला शिक्षा व्हावीच, कारण या नगरीच्या आत जुलुमाशिवाय काहीही नाही.
आमच्या बंदिवासाच्या बाराव्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी असे झाले की, यरूशलेमेमधून एक फरारी माझ्याकडे आला व म्हणाला, “नगर काबीज झाले आहे.”
तू आपल्याकरता लोखंडाची कढई घेऊन ती लोखंडी भिंत असी तुझ्यामध्ये आणि नगराच्यामध्ये ठेव आणि तू आपले मुख तिच्याकडे कर, म्हणजे तिला घेरा पडेल आणि तू तिला वेढा घालशील. इस्राएलाच्या घराण्याला चिन्ह होईल.
आमच्या बाबेलच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षात, वर्षाच्या आरंभी, महिन्याच्या दहाव्या दिवशी, यरूशलेम नगर काबीज झाल्यानंतर साधारण चौदाव्या वर्षी, परमेश्वराचा हात माझ्यावर होता आणि त्याने मला तेथे नेले.
वेढा दिलेला समय समाप्त झाल्यावर त्यातील तिसरा भाग शहराच्या मध्य भागी जाळून टाक. आणि तिसरा भाग तलवारीने कापून टाक व तिसरा भाग वाऱ्यावर उडवून टाक आणि या प्रकारे त्या लोकांचा पाठलाग तलवार करेल.
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुम्ही चौथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्याच्या विशिष्ट दिवशी शोक प्रकट करता, उपवास करता. ते यहूदाच्या घराण्यास छान, आनंदाचे, मोठ्या चांगुलपणाचे दिवस होतील. म्हणून तुम्ही सत्य आणि शांती ह्यावर प्रेम केलेच पाहिजे.”
तुम्ही, तुमच्या पूर्वजांनी कधी न पाहिलेल्या अशा देशात तुमची व तुमच्या राजाची रवानगी परमेश्वर करील. तुम्ही तेथे काष्ठपाषाणाच्या अन्य देवतांची पूजाअर्चा कराल.