Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 38:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आता राजाच्या घरात एबद-मलेख हा एक कुशी षंढ होता. त्यांनी यिर्मयाला पाण्याच्या टाकीत टाकले आहे हे त्याने ऐकले. त्यासमयी राजा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराशी बसला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्यांनी यिर्मयाला विहिरीत टाकले असे राजगृहातला कूशी खोजा एबद-मलेख ह्याने ऐकले; त्या प्रसंगी राजा बन्यामिनी वेशीत बसला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 यिर्मयाहला राजवाड्यातील अंधार विहिरीत टाकले आहे, हे वृत्त यरुशलेमच्या राजवाड्यातील एबेद-मेलेख नावाच्या एका प्रमुख अधिकार्‍याने ऐकले. तो कूशी देशाचा मूळ रहिवासी होता. यावेळी राजा बिन्यामीन वेशीपाशी बसला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 38:7
22 Iomraidhean Croise  

यहोयाखीनाला नबुखद्नेस्सरने बाबेलला कैदी म्हणून नेले. राजाची आई, स्त्रिया, सेवक, आणि गावातील प्रतिष्ठित लोक यांनाही यरूशलेमेत त्याचे कैदी होते.


मिसरमधून सरदार येतील; कूश आपले हात देवाकडे पसरण्याची घाई करील.


रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात, आणि सरळ मनुष्यास ठार मारण्यासाठी ते त्याचा शोध घेतात.


जो विदेशी परमेश्वराचा अनुयायी झाला आहे त्याने असे म्हणू नये, परमेश्वर कदाचित आपल्या लोकांपासून मला वेगळे करील. षंढाने असे म्हणू नये पाहा, मी झाडासारखा शुष्क आहे.


कुशी लोक त्यांच्या कातडीचा रंग बदलू शकतील काय? किंवा चित्ता त्याच्यावरील ठिपके बदलू शकेल काय? त्याचप्रमाणे तुम्हास, जी नेहमीच वाईट करण्याची सवय आहे, ते तुम्ही चांगले करणार काय.


म्हणून पशहूराने यिर्मया या संदेष्ट्याला मारले व परमेश्वराच्या मंदिरात, बन्यामीनच्या वरच्या प्रवेशद्वाराच्या खोड्यात त्यास घातले.


मग अधिकारी आणि सर्व लोक याजकांना व संदेष्ट्यांना बोलले, “यिर्मयाला अजिबात मारु नका. त्याने आपल्याला सांगितलेल्या गोष्टी परमेश्वराच्या नावाने आम्हाला ही वचने घोषीत केली आहे.”


राजा यकन्या, राजमाता, व उच्च अधिकारी, यहूदाचे व यरूशलेमेचे नेते, व कारागीर हे यरूशलेमेमधून निघून गेल्यावर यिर्मयाने हे पत्र पाठवले.


जे यहूदा आणि यरूशलेमेचे सरदार, षंढ, याजक व देशातले सर्व लोक जे वासराच्या दोन भागांमधून चालत गेले.


तो जसा बन्यामिनाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहताच, तेथे पहारेकऱ्यांचा प्रमुख होता. तेव्हा हनन्याचा मुलगा शलेम्या याचा मुलगा इरीया त्याचे नाव होते. त्याने यिर्मया संदेष्ट्याला धरले व म्हणाला, “तू फितून खास्द्यांकडे जात आहेस.”


म्हणून एबद-मलेख राजाच्या घरातून निघाला आणि राजाबरोबर बोलला. तो म्हणाला,


जे त्यांना वेशींवर सरळ करु ईच्छीतात, त्यांचा ते द्वेष करतात, आणि जे सत्य बोलतात त्यांचा ते तिरस्कार करतात.


तेव्हा सर्व देश यरूशलेमेच्या दक्षिणेस असलेली गिबा ते रिम्मोन ह्यांमधील अराबाप्रमाणे होईल; यरूशलेम मात्र पुन्हा उभारले जाईल; अगदी बन्यामीनच्या प्रवेशद्वारापासून ते पाहिल्या प्रवेशद्वारापर्यंत आणि हनानेलच्या मनोऱ्यापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत; अशी ती आपल्या स्थळी वसेल.


म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणि पहिले ते शेवटचे होतील.”


अशावेळी आईवडीलांनी त्यास गावच्या चावडीवर वडीलधाऱ्यांपुढे न्यावे.


आणि त्याने त्यातल्या एका नगराकडे पळून गेल्यावर नगराच्या वेशीच्या दाराशी उभे राहून आपले प्रकरण त्या नगराच्या वडिलांना सांगावे; मग त्यांनी त्यास आपल्या नगरात घेऊन त्यास ठिकाण नेमून द्यावे, आणि त्याने त्यांच्यामध्ये रहावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan