Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 38:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मग त्यांनी यिर्मयाला घेतले आणि राजाचा मुलगा मल्कीया याच्या पाण्याच्या टाकीत टाकले. पाण्याची टाकी पहारेकऱ्यांच्या चौकात होती. त्यांनी यिर्मयाला दोरीने खाली सोडले. कैदखानेत पाणी नव्हते पण चिखल होता आणि तो त्या चिखलात रुतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मग राजपुत्र मल्कीया ह्याची पहारेकर्‍यांच्या चौकात विहीर होती, तिच्यात त्यांनी यिर्मयाला नेऊन टाकले; त्यांनी यिर्मयाला दोरांनी खाली उतरवले. त्या विहिरीत पाणी नव्हते, चिखल होता; यिर्मया त्या चिखलात रुतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मग त्यांनी यिर्मयाहला बाहेर काढले व त्याला दोरांच्या साहाय्याने राजपुत्र मल्कीयाह याच्या राजवाड्याच्या आवारातील एका अंधार विहिरीत सोडले; त्यात पाणी नव्हते, पण तळाशी खूप गाळ होता आणि यिर्मयाह त्या गाळात रुतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 38:6
19 Iomraidhean Croise  

नंतर त्यांनी त्यास एका खोल खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा रिकामा होता, त्यामध्ये पाणी नव्हते.


मी केलेल्या चांगल्यासाठी वाईट, आणि त्यांनी माझ्या प्रीतीची फेड द्वेषाने केली.


त्याने मला भयानक खाचेतून दलदलीच्या चिखलातून बाहेर काढले, आणि त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थीर केली.


मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, तेथे पुराचे पाणी माझ्यावरून वाहत आहे.


त्यावेळी, बाबेलाच्या सैन्याने यरूशलेमेला वेढा घातला होता आणि यिर्मया संदेष्टा यहूदाच्या राजाच्या घरात पहाऱ्यांच्या चौकात कैद होता.


यहोयाकीम राजाने लेखक बारूखाला व यिर्मया संदेष्ट्याला अटक करण्यासाठी हम्मेलेखाचा मुलगा यरहमेल व अज्रीएलाचा मुलगा सराया व अब्देलचा मुलगा शलेम्या यांना आज्ञा केली. पण त्यांना परमेश्वराने लपविले होते.


म्हणून यिर्मयाला तळघरातील कोठडीत ठेवले, तेथे तो पुष्कळ दिवस राहिला.


म्हणून सिद्कीया राजाने हुकूम दिला. त्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या अंगणात ठेवले. नगरातील सर्व भाकर संपेपर्यंत त्यास रस्त्यावरील रोटीवाल्याकडून भाकर द्यावी. अशा रीतीने यिर्मया पहारेकऱ्याच्या अंगणात राहिला.


नंतर त्यांनी यिर्मयाला दोरांनी ओढून पाण्याच्या टाकीबाहेर काढले. मग यिर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात राहिला.


यहूदाच्या घरात ज्या स्त्रिया मागे राहिल्या आहेत त्या सर्वांना बाहेर बाबेलाच्या राजाच्या अधिकाऱ्याकडे आणले जाईल. नंतर पाहा! त्या स्त्रिया तुला म्हणतील, तुला तुझ्या मित्रांनी फसवले आहे; त्यांनी तुझा नाश केला आहे. तुझे पाय आता चिखलात रुतले आहेत आणि तुझे मित्र पळून गेले आहेत.


नंतर राजदेशानुसार दानीएलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले राजा दानीएलास म्हणाला, “ज्या देवाची तू सेवा करतोस तो तुला सोडवो.”


आणि तुझ्याविषयी म्हटले तर, तुझ्याशी मी केलेल्या माझ्या कराराच्या रक्तामुळे, निर्जल खड्ड्यांतून तुझ्या बंधकांना मुक्त केले आहे.


त्यास असा हुकूम मिळाल्यावर त्यांने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालू त्यांचे पाय खोडयात अडकवले.


तुम्ही धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हास दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्हास प्रतिफळ मिळावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan