यिर्मया 36:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कदाचित यहूदाचे लोक मी जे अरिष्ट त्यांच्यावर आणण्याचे योजले आहे, ते ऐकतील. कदाचित प्रत्येकजण आपल्या कुमार्गापासून वळेल, मग मी त्यांच्या अन्यायाची व पापांची क्षमा करीन. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 न जाणो यहूदाच्या घराण्यावर जे सर्व अरिष्ट आणण्याचा माझा बेत आहे ते ऐकून ते सर्व आपापल्या कुमार्गापासून वळतील आणि मी त्यांच्या दुष्कर्माची व त्यांच्या पापाची त्यांना क्षमा करीन.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जी भयानक संकटे मी यहूदीयाच्या लोकांवर आणणार आहे, ती त्यांनी चर्मपत्रावर लिहिलेली प्रत्यक्ष पाहिली, तर कदाचित ते त्यांच्या दुष्टकर्मापासून मागे वळतील; मग मी त्यांच्या दुष्कर्माची व पापांची क्षमा करेन.” Faic an caibideil |
इस्राएल आणि यहूदा येथील लोकांकडे मी माझे सर्व सेवक, संदेष्टे पाठविले. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगण्यास पाठविले, प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गापासून वळा आणि चांगली कृत्ये करा. दुसऱ्या देवांना अनुसरू नका आणि त्यांची पूजा करु नका. त्याऐवजी, तुमच्या पूर्वजांना व तुम्हास जो देश दिला आहे त्यामध्ये परत माघारी या. पण या लोकांनी माझे ऐकले नाही.