Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 34:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तो करार म्हणजे प्रत्येकाने आपल्या इब्री दासास, पुरुष व स्त्रिला मोकळे करावे. कोणीही आपल्या इब्री बंधूकडून दास्य करून घेऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ज्या कोणाचा दास अथवा दासी इब्री असेल त्याने त्याची सुटका करावी; कोणी आपल्या यहूदी बांधवांकडून दास्य करवून घेऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 प्रत्येकाने आपआपले इब्री दास व दासी यांना मुक्त करावे; कोणत्याही यहूदी मनुष्याने दुसर्‍या यहूदी मनुष्यास बंदी बनवून ठेऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 34:9
16 Iomraidhean Croise  

तेथून पळून आलेल्या एकाने अब्राम इब्रीला हे सांगितले. तो तर अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ मम्रे अमोरी याच्या एलोन झाडांजवळ राहत होता आणि ते सर्व अब्रामाचे सहकारी होते.


कारण मला माझ्या इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणले आहे. मी येथे तुरुंगात रहावे असा कोणाचा काहीच अपराध मी केला नाही.”


तिने ती पेटी उघडली तेव्हा तिला तिच्यात एक लहान बाळ दिसले. ते बाळ रडत होते. तिला त्याचा कळवळा आला, ती म्हणाली, “खात्रीने हे इब्र्याच्या मुलांपैकी आहे.”


ते तुझे ऐकतील, मग तू व इस्राएलाचे वडीलजन मिळून तुम्ही मिसराच्या राजाकडे जा व त्यास सांगा, इब्री लोकांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे. आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यासाठी म्हणून आम्हांला तीन दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ दे.


त्यांना राष्ट्रांचे आणि मोठ्या राजांचे दास्य करावे लागेल. त्यांच्या कृत्यांबद्दल योग्य अशीच शिक्षा त्यांना मी देईन.


आणि त्याच्या देशाची वेळ येईपर्यंत सर्व राष्ट्रे त्याची, त्याच्या मुलाची आणि त्याच्या मुलांच्या मुलांची सेवा करतील. मग अनेक राष्ट्रे व महान राजे त्याच्याकडून आपली सेवा करून घेतील.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो त्या दिवशी असे होईल की, मी तुमच्या मानेवरील जोखड मोडीन आणि तुमची बंधने तोडीन, यापुढे परके तुला गुलाम करणार नाहीत.


म्हणून सर्व नेत्यांनी व लोकांनी या कराराचे पालन करण्यास मान्यता दिली. प्रत्येकजण आपल्याकडील स्त्री वा पुरुष गुलामांना ह्यापुढे गुलाम म्हणून न ठेवता मुक्त करावे. त्यांनी ऐकले आणि त्यांना पाठवून दिले.


उलट तुम्ही दुसऱ्यावर आणि स्वतःच्या भावावर अन्याय करता आणि फसवता.


ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्राएली आहेत काय? मीहि आहे. ते अब्राहामाचे संतान आहेत काय? मीहि आहे.


एखादी इब्री स्त्री किंवा पुरुष तुम्ही दास म्हणून विकत घेतलेला असेल तर सहा वर्षे चाकरी झाल्यावर, सातव्या वर्षी त्यास मुक्त करा.


मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्य्रांचा इब्री, नियमशास्त्रदृष्टीने परूशी;


मग त्या दोघांनी आपणांला पलिष्ट्यांच्या ठाण्यातील मनुष्यांना प्रगट केले. पलिष्ट्यांनी म्हटले, “पाहा ज्या गुहांमध्ये इब्री लपले होते त्यातून ते निघून येत आहेत.”


तेव्हा पलिष्टी या मोठ्या ओरडण्याचा आवाज ऐकून म्हणाले, “इब्र्यांच्या छावणीत हा मोठा पुकारा कशाचा असेल?” मग त्यांना कळले की, परमेश्वराचा कोश छावणीत आला आहे.


अहो पलिष्ट्यांनो धैर्य धरा, व शूर व्हा; जसे इब्री तुमचे दास झाले तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नये म्हणून शूर होऊन लढा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan