Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 33:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वर जो हे करतो, परमेश्वर जो हे स्थापित करण्यासाठी योजितो, परमेश्वर हे त्याचे नाव आहे, तो असे म्हणतो,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “हे करणारा परमेश्वर, हे घडवून स्थापणारा परमेश्वर, परमेश्वर हे नाम धारण करणारा तुला म्हणतो की,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “याहवेह असे म्हणतात, आकाश व पृथ्वी ज्यांनी निर्माण केली व स्थापित केली—ज्यांचे नाव याहवेह आहे, ते म्हणतात:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 33:2
21 Iomraidhean Croise  

परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल, आणि तो आपल्या गौरवाने प्रगट होईल.


सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता; आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.


परमेश्वर महान योद्धा आहे; त्याचे नाव परमेश्वर आहे.


मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो; परंतु मी त्यांना परमेश्वर या माझ्या नावाने त्यांना माहीत नव्हतो.


तर त्या राष्ट्राच्या दूताला कोण एक उत्तर देईल? परमेश्वराने सीयोन स्थापले आहे आणि त्याच्या लोकांतले पीडीत त्यामध्ये आश्रय घेतील.


मी हे मागच्या काळात कसे केले आणि प्राचीन दिवसात हे कसे योजिल्याप्रमाणे केले, हे तू ऐकले नाही काय? आता हे मी घडवून आणले आहे. तू अजिंक्य नगरे घटवून त्यांचे नासाडीचे ढीग करण्यास येथे आहे.


“मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे; आणि मी आपले गौरव दुसऱ्यांबरोबर किंवा कोरीव मूर्तीबरोबर आपली स्तुती वाटून घेणार नाही.


तर आता हे याकोबा, ज्या कोणी तुला उत्पन्न केले आणि हे इस्राएला, ज्या कोणी तुला घडवले, तो परमेश्वर असे म्हणतो, भिऊ नकोस, कारण मी तुला खंडणी भरून सोडवले आहे; मी तुला नाव घेऊन बोलावले आहे, तू माझा आहेस.


या लोकांस मी आपल्यासाठी निर्मिले, त्यांनी माझी स्तुतिस्तोत्रे कथन करावी.


यरूशलेमेला पुन:स्थापीपर्यंत आणि पृथ्वीवर तिला प्रशंसनीय करीपर्यंत, त्यास विसावा घेऊ देऊ नका.


पण देव, याकोबाचा वाटा, त्यांसारखा नाही, कारण तो सर्व गोष्टी घडवणारा आहे. इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे.


यास्तव पाहा! परमेश्वर म्हणतो “मी त्यांना कळवीन, या एकदाच मी अपला हात व आपले सामर्थ्य त्यांना कळवीन, म्हणजे ते जाणतील की माझे नाव परमेश्वर आहे.”


परमेश्वर, तू हजारोंना विश्वासाचा करार दाखवतो व मनुष्यांचे अन्याय त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांच्या पदरी ओततो. तू थोर व सामर्थ्यवान देव आहेस. सेनाधीश परमेश्वर तुझे नाव आहे.


पण देव, याकोबाचा हिस्सा, त्यासारखा नाही, कारण तो सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे. इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे; त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे.


ते तुम्ही, ज्याने कृत्तिका व मृगशीर्ष ही नक्षत्रे बनवली, तोच दिवसाचे परिवर्तन काळोख्या रात्रीत करतो; आणि दिवसास रात्रीने अंधकारमय करतो; समुद्रातील पाण्याला बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाव “परमेश्वर” आहे.


ज्याने आकाशामध्ये आपल्या माड्या बांधल्या, आणि आपला घुमट पृथ्वीत स्थापिला आहे, जो समुद्राच्या पाण्याला बोलवून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाव परमेश्वर आहे.


कारण, ज्याचा योजणारा व बांधणारा देव आहे अशा नगराची अब्राहाम वाट पाहत होता.


पण आता, ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची इच्छा धरतात, ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घेण्यास देवाला त्यांची लाज वाटत नाही कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.


तेव्हा त्याने मला आत्म्याने एका मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि त्याने मला ती पवित्र नगरी यरूशलेम देवाकडून स्वर्गातून खाली उतरतांना दाखवली.


आणि मी ती पवित्र नगरी, नवे यरूशलेम, देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून सजविलेल्या वधूप्रमाणे दिसत होती;


Lean sinn:

Sanasan


Sanasan